Flash

Wednesday, 19 April 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*आपण जातीने अलग आहोत असे कोणी हवे त्याने समजावे. पण इतर जातीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे समजून आपला श्रेष्ठपणा इतर जातीस भासवून त्यांची मने दुखवू नयेत. नाहीतर दुखावलेला सर्प जसा दंश करण्यास विसरत नाही तसा दुखावलेला माणूस सूड घेण्यास विसरणार नाही.*
*विचार- डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
*संदर्भ- बहिष्कृत भारत, १५ जुलै १९२७.*


माझा जरी महार जातीत जन्म झाला असला तरी मी सर्वस्वी महार लोकांसाठीच प्रयत्न करीन असे कधीच होणार नाही. उलट माझ्या समाजाला कहीच मिळाले नाही तरी चालेल. परंतु इतरांसाठी मी वाटेल ते करू शकेन, मात्र त्यांचे मला माझ्या कार्यात जीवाभावाचे सहकार्य पाहीजे. आपल्या कार्यात आपल्या समाजातील निरनिराळ्या जातीची एकी झाल्यावर पुढील गोष्ट एकमेकाच्या संमतीने व गुण्यागोविंदाने सोडविणे मला अशक्य असे वाटत नाही.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दि.२९ जानेवारी १९३२ परळ, मुबंई 
Ref:- जनता, दि. ३० जाने. १९३२



भारतातील दलित समाजाची उन्नति करने म्हणजे त्यांच्या अन्न,वस्त्र व निवाऱ्यांची सोय करून पुर्विप्रमानेच त्याना उच्च वर्गाची सेवा करण्यास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगति खूंटून त्याना दुसर्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यापासून नाहीसा करने, चालु समाजपध्द्तिमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपने लुबडन्यात आले आहे. त्याचे त्यांच्या स्वता:च्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे याची त्याना जाणीव करून देने हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे.
'उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरिज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखन्यावर, माझ्या मताप्रमाने हेच औषध आहे.'

संदर्भ- जनता, २२ सप्टेम्बर १९५१
- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

ज्योतिबा फुले त्यांना मी आपला गुरु मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला व पुष्कळ मराठेही त्यांचे शिष्य होते. परंतू आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झाली आहे. ज्योतिबाचे नाव आज कोणीच घेत नाही. आज मांग-चांभार हे निव्वळ उष्ट्याचे धनी झाले आहेत. प्रगतीचे खरे मालक आम्ही आहोत. आज आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीप्रमाणे पाहात आहे. परंतु आमची चळवळ निष्काम बुध्दीने व फळाची आसक्ती न धरता चालू आहे. आम्हाला आशा आहे की एक दिवस असा येईल की या वृक्षाचे धनी आम्हीही होऊ. आज जे काही एक न करता चैन करतात, आपण कमविलेले खात आहेत. त्यांनाच पुढे शरम वाटेल.
संदर्भ - दि. 13 जून 1953, मुंबई, रावळी कॅम्पमधील भाषण.
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपल्या ह्या हिंदुस्थानात राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो, हि दुर्दैवाची गोष्ट आहे. हिन्दुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हे असे असावे हि दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिश: माझा वाढदिवस साजरा व्हावा, हे मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतीपूजा कशी आवडेल ? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर ह्या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्याचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे. पण पुढाऱ्याची देवाप्रमाणे पूजा करने हि गोष्ट मला बिलकुल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अध:पात होतो....
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ-५५ व्या वाढदिवसानिमित्ताने नवयुग विशेषांकास संदेश देताना


डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात..
"रस्त्यावर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात. मुस्लिम स्त्रियात अनिमिया, टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत. पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा-मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही"

"ब्राह्मणशाही व भांडवलशाही हेच मुख्य दोन कामगारांचे शत्रु आहेत."
ब्राह्मणशाहीचा अर्थ या ब्राह्मणांना लाभलेली सत्ता त्यांचे विशेष हक्क
अगर जात असा मी करीत नाही. माझ्या मते समता, स्वातंत्र्य, बंधूभाव आणि
न्याय यांचा अभाव म्हणजे ब्राह्मणशाही." ब्राह्मणशाहीचे उत्पादक
ब्राह्मणच असले तरी तिची मर्यादा ब्राह्मण समाजापर्यंत नाही.
ब्राह्मणशाहीचे दुष्परिणाम केवळ सामाजिक हक्क, आंतरजातीय विवाह आणि
सहभोजने यावर होत नाहीत, तर या ब्राह्मणशाहीने सामाजिक हक्क, नागरिक हक्क
नाकारले आहेत. याची नोंद घेतली पाहीजे.

-१२ फेब्रुवारी १९३८ रेल्वे कामगार परिषद मनमाड येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"ब्राह्मण्य ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वच जातींमध्ये आहे. ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत. माञ ब्राह्मण्यवृत्तीने ग्रासलेल्या ब्राह्मणेत्तर व्यक्तींना मी जवळ करणार नाही."
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बहीष्कृत भारत, 1 जुलै 1927...!



भारतीय समाजव्यवस्था जाती-उपजातींनी पोखरल्या गेली आहे. सर्वाँची जातीसाठी माती खाण्याची मानसिकता असल्याने मरण, जेवण, विवाह या गोष्टी जातीनिष्ठ होऊन जातात. यातून रोटीबंदी, बेटीबंदी अशा चूकीच्या अटी पाळण्यात येतात. जातीबाह्य चांगल्या प्रथांचा विचार करणेही पाप समजले जाते. सर्वांना घेऊन चालणारा, जातीभेद न पाळणारा येथे जातीभ्रष्ट ठरतो. कारण जातीच जातीच्या वैरी असतात. अशा वैमनस्यातून परस्पर गैरसमज वाढतात. यातूनच परकीय राजा चालतो पण स्वदेशी राजा नाकारल्या जातो. यामुळे समाज सतत दुभंगल्या जातो. त्यांच्यात कधीच एकजूट निर्माण होत नाही. या जातीभेदाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे स्वराज्य, स्वातंत्र्य याविषयी आस्था, कळकळ कुणालाच वाटत नाही. कारण स्वराज्यात दुस-या जातीच्या हातात सत्ता गेल्यास आपल्या जातीचे काय होईल, ही चिंता वाटते, जातीद्वेषाला खतपाणी मिळते आणि द्वेषभावना पिढ्यान् पिढ्या सुरु राहते..!!

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.



खेदाची गोष्ट आहे की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. आजचा विद्यार्थी वर्ग फुटबॉल, क्रिकेट आणि पोकळ राजकारनात दंग असतो. विद्यार्जन याला एक मोठा अर्थ असतो, त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी, दृष्टीतून त्यांनी खर्‍या जीवन मूल्यांचा शोध व बोध घ्यावा. पन आजचे विद्यार्थी क्रिडेच्या आणि राजकारणाच्या फंदात गुरफटून ती दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतच नाही.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सोमवार दी. 15 डिसेंबर 1952 मुंबई एल्फिन्स्टंन कॉलेज येथील भाषण.
(जनता : दी. 20 डिसेंबर 1952 )




इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय ?
याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरुपातील आपल्या जुन्या शत्रूनसोबतच भिन्न परस्परविरोधी विचारप्रणाली असणार्‍या बर्‍याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. ह्या वास्तवच्या जाणिवेने मी अधिकच चिंतातुर झालो आहे. भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणाली मोठे मानतील ? मला माहीत नाही. परंतु येवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसर्‍यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.

विशारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे, “क्रांतिसूर्य” (मुखपृष्ठ)



आपण जातीने अलग आहोत असे कोणी हवे त्याने समजावे. पण इतर जातीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे समजून आपला श्रेष्ठपणा इतर जातीस भासवून त्यांची मने दुखवू नयेत. नाहीतर दुखावलेला सर्प जसा दंश करण्यास विसरत नाही तसा दुखावलेला माणूस सूड घेण्यास विसरणार नाही.
विचार- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संदर्भ- बहिष्कृत भारत, १५ जुलै १९२७.

" हिंदू लोकांची अंतःकरणे दगडविटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत .त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची , इतरांना बरोबरीचा हक्क देण्याची चाड नाही. दगडाच्या भिंतीवर डोके आपटून आपण कपाळमोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार , परंतु त्या भिंतीची कठोरता नाहीशी होणार नाही. " 
--डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
( माझी आत्मकथा- राउंड टेबल कॉन्फरन्स )



नवीन हक्क, मोठ्या नोकर्या वगैरे मिळवायच्या तर त्याला स्वतची लायकी लागत असते. ती लायकी वाढविण्याचे मुख्य काम विद्यार्थीदशेत करत असताना तुम्ही इतर कोणत्याही चळवळीत पडणे चूकीचे होईल.
-विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ- ठाणे २ एप्रिल १९३३




हिँदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषत: ब्राह्मण लोक यांनी आपल्या देश बांधवांना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चेपून ठेवले व हेच लोक हिँदू, मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्याँ चे पाय चाटून ऐषारामी जीवन जगत आले. याच लोकांनी स्वार्थाँधपणे आपल्या धर्मबांधवाना व देशबांधवांना परक्याच्या व स्वत:च्या गुलामगिरीत डांबून ठेवले व ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्षे टिकवून ठेवली आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरी विरुध्द बकवा करीत आहेत. हेच लोक काँग्रेसच्या झेँड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत. हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक समता देण्यास तयार नाहीत. या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरीने सत्यानाश केला आहे. तुम्हाला धार्मिक हक्क नाहीत, ब्राह्मणांपेक्षा तुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातभाईँनी पुराणादी धर्मशास्रांत लिहून, त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्याँ कडून करविली. आता ते म्हणतात, "देशाभिमान हा फक्त ब्राह्मणांचाच सदगुण आहे. म्हणून ब्राह्मण लोक देशासाठी तुरुंगवास, देहदंड व सुळावरची शिक्षा सोसत आलेले आहेत."

ब्राह्मणेतर व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राह्मण लोक म्हणतील "तुम्हाला राजकारण समजत नाही." सरकारी नोकय्रांतील बहुतेक सर्व मोक्याची ठिकाणे ब्राह्मणेतर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करु लागले, की हे ब्राह्मण म्हणतील, की या जागा भूषविण्यास तुम्ही लायक (एफिशिअंट) नाही. सांगण्याचा हेतू असा, की धर्म, राजकारण, इ. गोष्टीँतही आम्हीच काय ते श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून अतापर्यँत ब्राह्मण वागत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मानसिक माजोरीपण आणि बौध्दिक व्यभिचारीपणा आलेला आहे.
ब्राह्मणेतर समाज व अस्पृश्य समाज हे आतापर्यँत ब्राह्मणांच्या या मानसिक माजोरीपणाला व बौध्दिक व्यभिचाराला भिऊन, त्यांचे गुलाम म्हणून गुपचूपणे वागत आलेले आहेत. परंतू या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील, तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील. तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका. मी मनाने व बुध्दीने ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे. मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे. ही जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते. तिच्या बौध्दिक लबाड्या चव्हाट्यावर मांडून, अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कारण, मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहेँ या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली, तर ती सोमणांसारख्या भोँदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खडड्यात पडणार नाही.
-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
संदर्भ - मे 1926 सातारा जिल्हा महापरिषद अधिवेशन मधील अध्यक्षिय भाषण ।

"शेतकरयानं एका मुलाला उदयोग व्यापारात, दुसर्या मुलाला सेवाक्षेञात किंवा मुलीला शिक्षणक्षेत्रात पाठवावं व फक्त एकाच अपत्याला शेतीव्यवसाय करु द्यावा. शेती सुधारली नाही तर शेतकरयांना आत्महत्या कराव्या लागतील".
- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सन 1918, पुस्तक - स्माॅल होल्डींग्ज इन इंडिया अॅन्ड देअर रेमीडीज".
(शेतकरयांच्या आत्महत्यांचा इशारा बाबासाहेबांनी सुमारे शंभर वर्षे अगोदरच दिला होता, तसेच राज्यघटनेत शेती आणि खेड्यांसाठी विशेष तरतुदी सुचविल्या होत्या परंतु संविधान सभेने हिंदू कोड बिला प्रमाणे त्याही नाकारल्या )



बाबासाहेब म्हणतात, ""ब्राह्मण्य ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वच जातींमध्ये आहे. ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत. माञ ब्राह्मण्यवृत्तीने ग्रासलेल्या ब्राह्मणेत्तर व्यक्तींना मी जवळ करणार नाही."

संदर्भ - बहीष्कृत भारत, 1 जुलै 1927



"...मी कोणत्याच हिन्दू मंदिरात जात नाही. मला शंभर वेळा प्रार्थना केलि असती तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते. जी व्यक्ति देवांवर विश्वास करीत नाही, तिने तसे करणे म्हणजे स्वतःच्याच मनाची फसवणूक करने होय . बौद्धांनी कधीही हिंदूंच्या देवळात जाऊ नये. बौद्ध विहारात सर्व समान आहेत . कोणाचाही तेथे निषेध करू नये. जे अस्पृश्य हिन्दू धर्मात राहून मंदिर प्रवेश करू इच्छितात हा त्यांचा नुसता दुराग्रह आहे. त्यांना अन्याय , अपमान व विटम्बना करुण घ्यायची असेल तर याबाबतीत मला बोलायचे नाही पण बौध्दांनी या भानगडित पडू नये. आपल्या रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतो, "नत्थी में सरणं अय्यं,बुद्धो में सरणं वरं ! ". मी बुद्धा शिवाय इतर कोणाला शरण जाणार नाही, असे म्हणाणार्यांनी हिन्दू मंदिरात जाण्याचा हट्ट का पकडावा.
काशी येथील मंदिर प्रवेश हा राजकीय स्टंट, डाव आहे. त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हावयाचा नाही, म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करुणच बन्धुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करने एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे."

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(सन्दर्भ : डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड १८ भाग ३)



*हिंदू लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तु आहे. असा सर्वसाधारण समज आहे आणि पुरुषांच्या ईच्छेनुसार स्त्रियांनी वागावे अशी सर्वांची समजुत असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तु समजली गेल्यामुळे तिच्या शरिराला वस्त्रप्रावरणांनी व दाग-दागीण्यांनी शृंगारण्यात धनाचा व प्रेमाचा व्यय होतो हे खरे आहे. तथापी माणुस समजुन तीला कोणत्याच प्रकारचे हक्क हिंदु धर्मात देण्यात आलेले नाहीत. जड जीवाची जोपासना करण्यास संपत्तीचा वारसा तीला नाही तो नाहीच पण शिक्षण घेउन मन सुसंस्कृत करण्याचा अधिकारही तीला नाही. आमच्या शास्त्रात गाईला आत्मा आहे असे सांगुन ख्रिस्ती लोकांना लाजवु पाहणारे हिंदु लोक स्त्रिला आत्मा आहे असे जरी मानत असले तरी कृतीने तसे दाखवित नव्हते हे खरे. आता कोठे त्यांना हे उमगत आहे. परंतु त्यातही त्यांचे ध्येय मोठेेसे उच्च नाही. स्त्रियांनी गृहलक्ष्मी तेव्हढे व्हावे.. त्याच्या पुढे स्त्रियांच्या प्रगतीची मजल जाउ नये.. ही मर्यादा अबला-उन्नती प्रित्यर्थ झटणीऱ्या बर्याच सुधारकांनी आपल्यापुढे ठेवील्याचे दृष्टोत्पतीस येते. आमच्या मते अशाप्रकारचे संकुचीत ध्येय स्त्री वर्गापुढे ठेवणे अनुदारपणाचे द्योतक आहे. दरेक व्यक्तिमात्राला पुर्णावस्थेस जाण्यास समाजाने अवसर दिला पाहीजे हे तत्व जर एकदा मान्य झाले तर मग स्त्रियापुढे असले हलके ध्येय ठेवण्यात यावे याचे आम्हाला नवल वाटते....!!*

*डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*संदर्भ- बहीष्कृत भारत ..१५ जुलै १९२७*


असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठोकरीने केली पाहिजे आणि आपला खरा हितकर्ता कोण हे निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा। तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली आहे। त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण, कोणता पक्ष तुमच्यासाठी प्रणाचीही पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे , याची तुम्ही निवड करा।
*डॉ बाबासाहेब आंबेडकर*
खण्ड 18 भाग 2

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...