एक लग्न स्त्रीला अनेक प्रकारांनी उध्वस्त करतं. सप्तपदीच्या सातव्या पावलानं, नवरा सखा होईलच ह्याची शाश्वती नसताना, लज्जाहोमात मुलीला प्रथम माहेरच्या बालपणाची आहुती द्यावी लागते. ते आयुष्य पुन्हा नाही. झाडावरचं फूल म्हणजे आई-वडिलांच्या सान्निध्यात जगणारी मुलगी.खर्याखुर्या जीवनरसावर फुलणारी कळी. ती तोडली की संपलं. सासर फ्लाॅवरपाॅटसारखं असतं. तिथं मुलगी सजवली जाते, रुजवली जात नाही. स्मशानात गोवर्या जायची वेळ आली तरी बायका, माहेर म्हटलं की क्षणभर कात टाकतात. आई-वडिल अगदी साधे, भोळे, कदाचित संगोपनही नीट समजलेले नसले तरी मुली त्यांच्या आठवणीनं गहिवरतात.
[ ठिकरी.....व.पु. ]
No comments:
Post a Comment