Flash

Wednesday, 19 April 2017

अनंगदान - मस्त्त्यपुराणातील ७० वा अध्याय लोकराजा राजर्षी छञपती शाहु महाराज

अनंगदान - मस्त्त्यपुराणातील ७० वा अध्याय
एकदा राजर्षी छञपती शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी "चातुर्मासात " घरात पोथी-पुराण लावण्याचा आग्रह धरला. महाराज त्यांना वारवांर समजावून सांगायचे की, पोथ्या- पुराणाचा काही उपयोग नाही. हे थोतांड आहे. त्यामुळे तुम्ही देखील या पोथ्या-पुराणे लावू नये, असे राणीसाहेबांना महाराज समजावून सांगायचे. परंतु राणीसाहेब काही ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी सासूबाईकडून म्हणजे मोठ्या राणीसाहेबांकडून पोथी-लावण्याची परवानगी घेतली. तेंव्हा छञपती शाहू महाराज राणी साहेबांना म्हणजे लक्ष्मीबाईंना म्हणाले, "आता तुम्ही पोथीलावतच आहात तर मत्स्यपुराणाची पोथी लावा." पोथी लावण्याची परवानगी मिळालेल्या राणीसाहेबांनी आनंदिने मत्स्यपुराणाची पोथी लावण्याचे ठरविले. त्यांनी इकडे पोथी सुरु केली आणि महाराज लंडनला निघून गेले. दररोज एक अध्याय या प्रमाणे हा धार्मिक कार्यक्रम घरी सुरु झाला.
आणि राजर्षि छञपती शाहु महाराज बरोबर ७० व्या दिवशी लंडनवरुन परत आले. सर्वांना आनंद झाला. मग महाराजच राणीसाहेबांना म्हणाले, "छञपती महाराजांना कोण विरोध करणार? आपन शांतपणे बसून हा ७०वा अध्याय ऐकावा म्हणजे तेवढेच पुण्य पदरात पडेल" त्या दिवशी राजवाड्यातील पोथी-पुराणे सांगणारा नियोजित भटजी तेथे आला. त्याची पाध्यपुजा झाली. म्हणजे त्या भटजीचे पाय धुण्यात आले. महाराज सोडून बाकीच्यांनी त्याचे दर्शन घेतले. तो पाटावर बसला. समई लावण्यात आली. उदबत्या लावण्यात आल्या. सर्व वातावरण अगदी मंगलमय झाले आणि अशा मंगलमय वातावरणात त्या भटजीने ७०वा अध्याय सांगायला सुरुवात केली. भटजी सांगू लागला. "चातुर्मासात श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणेत्तर स्ञीला सुगंधादि पाण्याने अांघोळ घालावी. तिला नवीन कपडे परिधान करण्यासद्यावीत. तिला अंलंकारादि भूषणाने नटवावे व हे सर्व झाल्यानंतर राञी भोगण्यासाठी ब्राह्मणाकडे सुपूर्द करावे व ब्राह्मणाने त्या ब्राह्मणेत्तर महिलेला यथेच्छ भोगावे,"
जशीही त्या मत्स्यपुराणातील ७०व्या अध्यायातील मुक्ताफळे भटजीच्या तोंडून राणी-साहेबांनी ऐकली. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांच्या पायाची आग मस्तकाला भिडली. त्यांचे सर्वांग थरथरु लागले. त्या रागाने बेभान झाल्या व पायातील पायताण घेऊन भटजीच्या अंगावर धावून गेल्या. तेंव्हा शाहू महाराज राणी सांहेबांना म्हणाले, "असू द्या राणी साहेब ते आपलेच काका आहेत." परंतु राणीसाहेबांणी माञ भटजींना हाकलून दिले. तेंव्हापासून राजवाड्यातील पोथ्या-पुराणे बंद झाली. असे होते महाराज! ते प्रत्येक गोष्ट उदाहरणाने पटवून देण्याचा प्रयत्न करायचे, जिज्ञासू वाचकांनी मत्स्यपुराणातील७०वा अध्याय जरुर पहावा. केवळ मत्स्यपुराणांच नव्हे तर युरेशियन ब्राह्मणांनी लिहिलेला कोणताही धर्मग्रंथ पाहा. त्यात मुलनिवासी बहुजनांची आणि सर्व महिलांची केवळ बदनामीच आहे. दुसरे-तिसरे काही नाही. चारवेद, रामायण, महाभारत, गीता, मनुस्मृती, श्रुती, स्मृती, १८पुराणे काहीही वाचा त्यामध्ये आपली बदनामीच आहे. कारण हे सर्व साहित्य-युरेशियन ब्राह्मणांना महत्व देण्यासाठी, त्यांना श्रेष्ठ ठरविण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी, लिहिले आहे. व त्या सोबतच मुलनिवासी बहुजनांची बदनामी करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी, त्यांना कनिष्ठ समजण्याठी हे साहित्य निर्माण केले आहे. आणि मनुस्मृतीमध्ये तर मुलनिवासी बहुजनांची त्यातल्या-त्यात स्ञियांची सर्वाधिक बदनामी करण्यात आली आहे.
संदर्भ ः- राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छञपती शाहु महाराज
लेखक :— डी. आर. ओहोळ

1 comment:

  1. त्या पानाचा फोटो मिळेल का ???

    ReplyDelete

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...