Flash

Wednesday, 19 April 2017

संत तुकाराम

वार करी 🚩🚩
तुकोबांनी सांगितले देव कुठे असतो आणि देव कशात असतो. तसेच पाखंडाचे भांडाफोडही केले आहे.....
पण तरीही हे उच्चशिक्षित देव देवळात पहातात.
हे आहेत त्यांच्या अभंगातील
नास्तिकतेचे अत्युच्च बिंदू :-
आहे ऐसा देव वदवावी वाणी ।
नाही ऐसा मनी अनुभवावा ।।
अर्थ :- जगात देव, ईश्वराचे अस्तित्व असल्याचा मला कधी अनुभवच आला नाही. किवा देवाचे अस्तित्व सांगणारा एखाद्या व्यक्तीने पुरावादेखील दिला नाही.
" जे कां रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।"
अर्थ:- जे या जगी दु:खी,कष्टी,दीन,दुबळे आहेत त्यांना आपले मानून जवळ करणारा खरा साधू आहे आणि देव सुद्धा त्याच्यामध्येच आहे.
"नवसे कन्यापुत्र होती। तरी का कारणे लागे पती।।"
अर्थ:- देवाला नवस केल्याने जर मुलंबाळं होत असतील तर लग्नाची (पतीची) काय आवश्यकता आहे? असा खडा सवाल तुकोबांनी या अभंगात केला आहे.
" तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी।।"
अर्थ:- तिर्थक्षेत्री आणि धार्मिकस्थळी नुसते दगड,धोंडे आणि पाणी आहे.देव तर सज्जन माणसांत वसलेला आहे.
"वेदांचा तो अर्थ आम्हांसची ठावा।
इतरांनी वाहावा भार माथा ।।"
अर्थ:- वेद काय ,आणि त्यांचा खरा अर्थ काय हे फक्त आम्हीच जाणतो.भटांनी फक्त वेद डोक्यावर घेवुन हमाली करावी.
"जळो त्याचे तोंड।बघतो तो ब्राम्हण । काय त्याची रांड प्रसवली।।"
अर्थ:- जगात निच,कपटी,विषमतावादी,स्वार्थी जात ब्राम्हण आहे. हे तुकोबांनी वेळोवेळी आपल्या अभंगाद्वारे सांगितले आहे.ब्राम्हण स्त्रिने कसा यांना जन्म दिला असेल?
"बरा कुणबी केला देवा।i
नाहीतरी दंभेची असतो मेला।।"
अर्थ:- बरं झाले देवा कुणबी या कर्तबगार,पराक्रमी,कष्टी जातीत माझा जन्म झाला.नाही तर ब्राम्हणांसारखा व्यर्थ अहंकारानेच मेलो असतो........
- संत तुकाराम ( सन्दर्भ: शासकीय तुकारामगाथा, प्रकाशक : महाराष्ट्र शासन.)

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...