मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे
म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल.

हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?
सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आपण एक राष्ट्र नाही
याची आपल्याला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल.
त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू.

या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही.
भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी असतात.
पहिली गोष्ट, त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी असतात,
कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात.
आपल्याला वास्तवात राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर
आपण मात केलीच पाहिजे.

राष्ट्रनिर्मितीनंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगांच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.
(डॉ. आंबेडकर ह्यांच्या २५ नोव्हें. १९४९ ला केलेल्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणातून)
केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या आस्तित्वात राहणार नाहीत,
बाबासाहेबांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
*बाबासाहेबांनी सांगितलेले धोक्याचे इशारे*
*आपल्या भोवती जाती आणि पंथ या रूपाने आपले जुनेच शत्रू वावरत होते त्यात आता परस्पर विरोधी नाटकात विसंवादी राजकीय ध्येय असलेल्या राजकीय पक्षांची भर पडणार आहे. हिंदी जनता आपल्या पंथापेक्षा देशाला अधिक महत्व देईल काय? की देशापेक्षा आपला पंथच श्रेष्ठ समजतील? मला काही सांगता येणार नाही. पण ही गोष्ट मात्र निश्चित आहे की, देशातल्या पक्षापक्षांनी देशहितापेक्षा आपल्या पंथाला प्राधान्य दिले तर देश पुन्हा एकदा संकटात सापडल्यावाचून राहणार नाही आणि मग आपले वर्चस्व कायमचे नष्ट होईल. या आपत्तीपासून आपण दृढनिश्चयपूर्वक आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे. रक्ताचा शेवटचा बिंदू असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे प्राणपणाने संरक्षण केले पाहिजे.*
...डॉ बाबासाहेब आंबेडकर
(२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेले शेवटचे भाषण.)
(२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेले शेवटचे भाषण.)
*बाबासाहेबांनी सांगितलेले धोक्याचे इशारे*
*आपण करावयाची दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाहीचे रक्षण करू इच्छिणार्यांना जॉन स्टुअर्टने जो इशारा दिला तो असा आहे: कोणत्याही मोठ्या माणसाच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पण न करणे व आपली संघटना उलथून टाकता येईल अशा प्रकारची सत्ता त्यांच्या हाती न सोपविणे. ज्या थोर मानवांनी देशाची आमरण सेवा केली त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणे मुळीच चुकीचे नाही पण कृतज्ञतेलाही मर्यादा आहेत.*
*आयरिश देशभक्त डॅनिअल ओकोनने म्हटल्याप्रमाणे आपल्या मानाच्या मोबदल्यात, आपल्या शीलाच्या मोबदल्यात व राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात आपण कृतज्ञ असू शकणार नाही. कारण या देशाच्या राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा जितकी आढळते तितकी जगाच्या कुठल्याही देशाच्या राजकारणात आढळणार नाही. राजकारणातील भक्ती किंवा विभूतीपूजा हा अधोगतीचा व अंती हुकुमशाहीचा निश्चित मार्ग आहे यात संशय नाही.*
*आयरिश देशभक्त डॅनिअल ओकोनने म्हटल्याप्रमाणे आपल्या मानाच्या मोबदल्यात, आपल्या शीलाच्या मोबदल्यात व राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात आपण कृतज्ञ असू शकणार नाही. कारण या देशाच्या राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा जितकी आढळते तितकी जगाच्या कुठल्याही देशाच्या राजकारणात आढळणार नाही. राजकारणातील भक्ती किंवा विभूतीपूजा हा अधोगतीचा व अंती हुकुमशाहीचा निश्चित मार्ग आहे यात संशय नाही.*
...डॉ बाबासाहेब आंबेडकर
(२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेले शेवटचे भाषण.)
(२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेले शेवटचे भाषण.)
*बाबासाहेबांनी सांगितलेले धोक्याचे इशारे*
*स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे वेगवेगळी नाहीत त्या तिघांचा मिळून एक संच आहे. त्या तिघांची मिळून एक त्रिगुणात्मक मूर्ती आहे. की एकमेकापासून अलग करण्याचा प्रयत्न केला तर लोकशाहीचा मूळ हेतू नष्ट होऊन जाईल.*
*स्वातंत्र्य समतेपासून वेगळे करता येणार नाही व समतेची स्वातंत्र्याची फारकत करता येणार नाही. स्वातंत्र्य म्हणजे बहुसंख्याकांवर अल्पसंख्याकांचे प्रभुत्व होय. स्वातंत्र्याशिवाय नुसतीच समता असेल तर ती वैयक्तिक कर्तृत्वशक्ती नाहीशी करू शकेल आणि बंधुभाव नसेल तर समता ऴ स्वातंत्र्य यांचा नैसर्गिक विकास होऊ शकणार नाही.*
*हिंदी समाजात दोन गोष्टींचा संपूर्ण अभाव आहे. यापैकी समता ही एक आहे. सामाजिकदृष्ट्या आपला समाज क्रमशील विषमतेच्या तत्वावर उभा आहे. म्हणजे काहींना उच्च स्थान मिळाले आहे व इतरांना आज हीन अवस्था प्राप्त झाली आहे. आर्थिक क्षेत्रातही अशीच विषमता आहे. ज्यांच्याजवळ शिगोशिग संपत्ती आहे असे काही लोक आहेत, तर हजारो (खरंतर कोट्यावधी) लोक भयंकर दारिद्य्रात खितपत पडले आहेत.*
*२६ जानेवारी रोजी आपण ज्या जीवनाला प्रारंभ करणार आहोत ते विरोधाने भरलेले आहे. राजकारणात आपल्याला समता मिळालेली आहे, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमताच दिसेल. राजकारणात दरडोई एक मत आणि एका मताचे मूल्य हे तत्व आपण मान्य करीत आहोत ,पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्या विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक समाजरचनेमुळे व्यक्तीमूल्याचे हे तत्व पूर्वीप्रमाणेच नाकारले जाणार आहे.*
*हे विरोधात्मक जीवन आपण किती दिवस असेच घालवणार आहोत? आर्थिक आणि सामाजिक जीवनात आपण आणखी किती दिवस समतेला थोपवून धरणार आहोत? आपण अधिक काळपर्यंत या समतेला विरोध करत राहिलो तर त्यायोगे आपली राजकीय लोकशाही संकटात आल्यावाचून राहणार नाही. आपण ही विषमता शक्य तितक्या लवकर नष्ट केली पाहिजे, नाहीतर विषमतेने गांजलेले लोक या घटना परिषदेने मोठ्या परिश्रमाने उभे केलेले हे राजकीय लोकशाहीचे मंदीर उध्वस्त केल्यावाचून राहणार नाहीत.*

No comments:
Post a Comment