माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्या पासून तुटून पडण्यावारही माझा विश्वास नाही. त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र करणार नाही. याच कारण अस आहे की विचार हे तुम्हाला कोणीकडे जायचं आहे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तिथपर्यंत तुम्हाला टप्या टप्याने खेचून नेण्यासाठी असतो.
....... नरहर कुरुंदकर
....... नरहर कुरुंदकर
धर्म म्हणजे एखाद्या समाजात प्रतिष्ठा पावलेल्या, स्थिर झालेल्या सामाजीक परंपरांचा बनलेला असतो.
या परंपरा समाजरचनेच्या असतात, अर्थव्यवहाराच्या असतात, सामाजीक चालीरीती च्या असतात, त्यात प्रतिष्ठीत श्रद्धा व कायदे येतात, उपासना व समजुती येतात.
हा सार्वजनिक जीवनातील पसारा दोन दृष्टीने सदोष असतो.
एक म्हणजे ज्या काळाला, अर्थव्यवस्तेला व समाजाला अनुसरून ही पद्धत असते, ती काळ बदलला की ती पद्धत समाजाची शत्रू होते हे आपण समजून घेत नाही.
"जी आई जन्मलेल्या मुलाला स्तनपान देत नाही, ती आई मुलाची शत्रू असते. हे पहीले सत्य."
" पण जी आई वर्ष भरानंतर मुलाला अंगावरच्या दुधाखेरीज काही पिऊ देत नाही ती मुलाचीही शत्रू असते, स्वत:चीही शत्रू असते.
"बारा दिवसा च्या आत मुलास भात खाउ घालणे म्हणजे विष खाउ घालणे पण बारा महिन्याच्या मुलास भात न खाउ घालणे म्हणजे उपाशी मारणे.
"जे एके काळी हिताचे ते काळ बदलला की अहीताचे होउन जाते".
"पण परंपरा एकदा प्रतिष्ठित झाली, त्या परंपरेविशयी ममत्व निर्माण झाले म्हणजे ममत्वाचे पोटी समाजाची शत्रू झालेली ही चौकट आपण सर्व शक्तीनिशी जतन करण्याचा प्रयत्न करतो.
अशा वेळी धर्म हा आपल्याच कक्षेतील प्रजेचा विकास अडवून ठेवणारा व स्वत:च्या अपत्याचा शत्रू झालेला असतो.... "
संदर्भ पुस्तक -
*'जागर'* - नरहर कुरुंदकर
(पान क्र १३०)
___________________
*'जागर'* - नरहर कुरुंदकर
(पान क्र १३०)
___________________
No comments:
Post a Comment