Flash

Wednesday, 19 April 2017

"एक शून्य मी" लेखक पु.ल.देशपांडे

"एक शून्य मी" लेखक पु.ल.देशपांडे
र्देव आणि धर्म यांविषयी सुप्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांचे विचार.
("एक शून्य मी" हे पु.लं च्या काही वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. त्या लेखसंग्रहातून हे सुविचार टिपले आहेत.)
१)धर्म,ईश्वर,पूजा-अर्चा,यांत मला कधीही रस वाटला नाही.शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून कोणत्याही मूर्तीला मी नमस्कार केलेला नाही.
.......
२)पूर्वजन्म,पुनर्जन्म,या थोतांडांवर माझा विश्वास नाही.
.......
३) देव,धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही.
.......
४) आपल्या देशात इतके संत जन्माला आले त्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता.
.......
५)अनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला
कुठल्याही संतापेक्षा अधिक मोठा वाटतो.
.......
६) पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत होती.ते मरण लाखो लोकांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने थांबले नाही.ते थांबवले कॉलर्‍याची लस शोधून काढणार्‍या वैज्ञानिकाने.
.......
७) सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणीना कुणी ताला सुरांत सांगत असते.आणि इकडे गॅलरीत आल्यावर समोरच्या कचराकुंडीत बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसतात.रेडियोत देवावर विशेषणांची खैरात चालूच असते.
.......
८) देव दीनांचा वाली आहे आणि संकटकाळी तो भक्तांच्या मदतीला धावून येतो याचे पुरावे पौराणिक
कथांखेरीज अन्यत्र कुठेही सापडत नाहीत.
.......
९)देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.
.
......
१०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील.

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...