Flash

Wednesday, 19 April 2017

मराठा समाज

महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला राज्याची सत्ता सदैव आपल्याच हाती असावी असे वाटत राहाणे तार्किक आणि सयुक्तिकच ठरते. स्वाभाविकच जेव्हां केव्हां राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठेतर व्यक्तीची योजना केली जाते तेव्हां तेव्हां मराठा समाज अस्वस्थ होऊन उठतो, हे प्राचीन वास्तव आहे. ज्यांना १९७२ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आठवत असेल त्यांना हेदेखील आठवत असेल की मुंबईतील मालाड मतदारसंघात खुद्द इंदिरा गांधी यांनी न्या.माधवराव परांजपे यांना उमेदवारी दिली होती व निवडून आले तर ते मुख्यमंत्री बनवले जातील अशी जोरात चर्चा काँग्रेस पक्षात सुरु झाली होती. पण परांजपे पडले. विरोधात मृणाल गोरे विजयी झाल्या. त्याच वेळी राज्यात काँग्रेसने २७० पैकी तब्बल २२२ जागा खिशात घातल्या होत्या. यात परांजपे कसे पडले याची उकल करण्याची गरज नाही. यातून एक झाले, इंदिरा गांधी यांच्या मनात राज्यातील प्रस्थापित काँग्रेस नेत्यांविषयी अढी बसली. हे प्रस्थापित कोण आहेत याची साऱ्या महाराष्ट्राला जाण आहे. स्वाभाविकच इंदिरा गांधींनी अंतुले, बाबासाहेब भोसले, शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले, पण या प्रस्थापिताना कधीच थारा दिला नाही. अर्थात त्यांच्या पुढ्यात या प्रस्थापितांचीही कधी डाळ शिजली नाही.

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...