हमीद दलवाई यांचे 250 sqft. चे घर होते ते मरेपर्यंत घर तेवढेच होते. पैसा, मालमत्ता, अन्य भौतिक सुविधा मिळवल्या नाहीत. आयुष्यात कधी वाढदिवस साजरा केला नाही. मुलींना लोणावळ्यात वसतीगृहात ठेवून समाज कार्य केले. मृत्यू नंतर कोणतेही स्मारक नको. शोकसभा नको अशी ईच्छा व्यक्त केली. जमलेच तर एखादी इस्लामचा अभ्यास करणारी संस्था व ग्रथालय असावे. अशी ईच्छा मृत्यू पत्रात लिहून मरणोत्तर कोणत्याही धर्माचे विधी न करता विद्युत दाहीनीत शरीर टाकावे. अशी ईच्छा प्रकट केली ही त्यांची वैयक्तिक भूमिका होती. ही मंडळाची भूमिका नाही. व्यक्ती स्वातंत्र्यची जाण होती. घक्कातंत्राचा वापर केला पण यात मुस्लिम द्वेश नव्हता. धर्मनिरपेक्षतेची पारदर्शकता आणि भगतसिंहा प्रमाणे आयुष्याच्या विचारसरणीशी प्रामाणिकता होती. अशी किंमत मोजणारे हिंदु समाजात ही सुधारक झाले नाहीत. हे आमचे नेते आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो. मी नास्तिक आहे मी दहन करणार असे म्हणत त्यांनी कोणतेही श्रेय घेतले नाही. प्रश्न पडतो तो हा की हमीद दलवाई यांनी दफन करण्याचा निर्णय घेतला असता तर मुस्लिमानी ते करू दिले असते का?
असाही एक विचार पुढे येतो की डायलेसिस आणि आजारपणात शरीरात असे काही उरले नव्हते की जे दान करून उपयोगी आणता आले असते.
आपल्या सुचने प्रमाणे मी रोज एक दलवाई विचार पोस्ट करीन आपणास आवडली तर वापर करा. पण हे अव्हानात्मक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुसलमान फुटीर वृत्तीने का वागले, किंवा आजही भारतातले मुसलमान मुख्य प्रवाहात का समरस होत नाहीत, याचे खापर केवळ हिंदुत्त्ववाद्यांवर फोडून चालणार नाही. मुसलमानांच्या इतिहासाचे नीट परिशीलन केल्यावर मुस्लीम राजकारणामागच्या शक्ती ध्यानात येतील. इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात त्याला पराभव जवळपास माहीत नव्हता. एका छोट्याशा, कोणाला माहीत नसलेल्या देशात हा धर्म उदय पावला आणि एकतृतीयांश जगावर त्याचे राज्य पसरले. भारतातही मुस्लीम नेतृत्वाला आपण राज्यकर्ती जमात आहोत, याचा अजूनही अहंकार आहे. तेव्हा या प्रवृत्ती ज्यांच्यात परंपरेने जोपासल्या गेल्या आहेत, त्यांना सेक्युलर कसे बनवायचे, या आव्हानाचा विचार करा.
................हमीद दलवाई
आयकल का ? धर्मग्रंथाच्या चौकटीत बुद्धिवाद करत बसणे हा मुर्खपणा आहे.तो तसाच चालू ठेवायची माझी बिलकुल इच्छा नाही . मुहम्मद पैगंबर जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारे थोर आणिकर्तुत्ववान पुरुष होते. हे मला मान्यच आहे पण . बस्स . पण .अल्ला , त्याचे देवदूत , ते देवदूत खाली येउन पैगंबराला सांगतात ते कुराण , कयामतचा दिवस , त्यादिवशी थडग्यातून उठणारे ते मृतदेह ,ते स्वर्ग ,ते नरक यापैकी कशावरही माझा विश्वास नाही .आणि यावर विश्वास ठेवतो तोच मुसलमान यावरही माझा विश्वास नाही.........................हमीद दलवाई#sharehamid dalvai thoughts

No comments:
Post a Comment