कामजिज्ञासा पेजवरील सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की, आजपासून लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील (कोल्हापूर) यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे.
त्यांचा अल्प परिचय खालीलप्रमाणे :
त्यांचा अल्प परिचय खालीलप्रमाणे :
डॉ. राहुल पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील पहिले विवाहपूर्व मार्गदर्शन, लैंगिक समस्या निवारण केंद्र स्थापित करणारे डॉ. राहुल पाटील हे 'आधुनिक कामशास्त्र' या विषयातील एक तज्ञ म्हणून ज्ञात आहेत.
२००१ साली त्यांनी कोल्हापूर येथे आकांक्षा कन्सल्टन्सी हे विवाहपूर्व मार्गदर्शन, लैंगिक समस्या निवारण केंद्र स्थापन केलेे आहे.
कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर 'लैंगिक शिक्षण कशासाठी ?' या विषयावर व्याख्यान प्रसारित झाले आहे.
२००१ ते २००९ या काळात तरुण भारत, पुढारी, रत्नागिरी टाइम्स, पोलीस टाइम्स या दैनिकांतून त्यांचे हजारो लेख प्रकाशित झाले आहेत.
आजपर्यंत त्यांची कामजिज्ञासा, ऑल अबाउट सेक्स, ऑल अबाउट सेक्स पोजिशन्स, निरामय कामजिज्ञासा ही चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
वृत्तपत्रातील खोट्या जाहिराती देणाऱ्या दोन भोंदू डॉक्टरांना त्यांच्या मदतीने अटक झाली आहे.
अधिक माहितीसाठी :
डॉ. राहुल पाटील
लैंगिक समस्या तज्ञ,
कोल्हापूर
संपर्क क्रमांक - ९८२२५३४७५४
आजचा सवाल
स्त्रियांना पण लैंगिक समस्या असते का ?
स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक इच्छा असते, त्यातून मिळणारे समाधानही दोघांच्या वाट्याचे असते त्यामुळे दोघांनाही लैंगिक समस्या उद्भवू शकते. बऱ्याच लोकांना लैंगिक समस्या फक्त पुरुषांमधील नपुंसकता, शीघ्रवीर्यपतन या दोनच माहित असतात.
स्त्री मध्ये कामवासना कमी असणे, कामवासना बिलकुल नसणे, अति कामवासना असणे, कामपूर्ती जलद होणे, कामपूर्ती उशिरा होणे, कामपूर्ती बिलकुल न मिळणे, वेदनायुक्त सम्भोग, सर्वात महत्वाचे म्हणजे योनिआकर्षण या प्रकारच्या समस्या असतात. अशा समस्यांमागे मानसिक व शारीरिक अशी कारणे आहेत. तसेच स्त्री पुरुष दोघांनाही कामजीवनाचे शास्त्रीय ज्ञान अजिबातच नसते किंवा अर्धवट असते. यात एक गंमत अशी की, स्त्रीला योनी आकर्षण असेल तर ती योनी प्रवेश करू देत नाही आणि पुरुषाला प्रयत्न करून पण सम्भोग जमत नाही त्यामुळे लिंगाची ताठरता नष्ट होते, त्यामुळे पुरुष स्वतःला नपुंसक समजतो, त्याचं कारण तो हस्तमैथुन, झोपेतील वीर्यपतन आहे असे समजतो. नको ते उपचार करत बसतो, पण समस्या वेगळी असते. खरा रुग्ण घरात बसलेला असतो. (उपचाराची खरी गरज स्त्रीला असते.) काही केसेस मध्ये ही समस्या घटस्फोटापर्यंत जाते.
हे सगळं वाचवता येऊ शकते...फक्त त्यासाठी हवं विवाहपूर्व मार्गदर्शन आणि लैंगिक शिक्षण
(डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर )
लिंगवर्धक यंत्र...कितपत सत्य ?
स्वतःला धाडसी समजणारे पुरुष त्यांच्या लिंग आकारा विषयी मात्र घाबरतात. लिंग लहान आहे असे ऐकले की त्याला निद्रानाश सुरू होतो. याचा योग्य तो फायदा घेत वृत्तपत्रांमध्ये खोट्या जाहिराती दिल्या जातात. त्या वाचून ३०० रुपयांपासून लाखो रुपये खर्च करणारे लोक आहेत.
आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की लैंगिक समस्यांवर उपचारांसाठी वृत्तपत्रांमधून रोज अशा प्रकारच्या जाहिराती येत असतील तर नक्कीच त्यात फसवणूक जास्त असते. त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नये. लिंगाचा आकार हा आनुवंशिकतेनुसार ठरलेला असतो. तो औषध, क्रीम किंवा इतर उपचारांनी बदलत नाही. लिंग आकार शिथिल असताना मोजू नये. लिंगाला ताठरता आल्यानंतर त्याची लांबी मोजावी. ती कमीत कमी ५ सें.मी ते १७ सें.मी इतकी असते. कधी कधी जाड पुरुषांमधील वाढलेले पोट हे खाली आल्याने लिंग त्यात रूतते आणि लिंग लहान असल्याचा भास होतो. अशा पुरुषांना हे जाहिरात देणारे, हॉटेलवर थांबून उपचार देणारे भोंदू छानपैकी लूटतात. अशा लोकांनी लिंग वाढवण्यापेक्षा पोट कमी करणे गरजेचे असते.
पोर्नोमध्ये मोठं लिंग असलेलेे आफ्रिकन पुरुष दाखवतात. त्या पुरुषांची लिंग मोठे असतात ते ही आनुवंशिकतेनुसारच. लिंग ५ सें.मी पेक्षा लहान असणे हा रोग आहे पण हे जन्मजात आहे याला उपाय नाही. खूप मोठे लिंग असणे हे देखील रोगच आहे. कारण असे लिंग योनीमार्गे आत गेल्यावर स्त्रीला वेदना होतात. दुसऱ्याच्या लिंगाशी तुलना करू नये. पण आपल्याकडचे पुरुष नेमके तेच करतात आणि मग निराश होतात.
लिंगवर्धक यंत्र पूर्ण बोगस आहे. त्यावर विश्वास ठेऊ नका. ऑनलाइन मागवलेले यंत्र वापरून लिंगाला इजा झालेले पुरुष आहेत. लिंगवर्धन करण्यापेक्षा कामशास्त्र विषयी खरी माहिती घेऊन जास्त सुख मिळेल. लिंगवर्धक यंत्राची कुठेही, कितीही आकर्षक जाहिरात वाचली, पाहिली तरी विश्वास ठेऊ नका.
लिंग एकच असतं...... त्याची योग्य काळजी घ्या....
(डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर )
विवाहानंतरच्या पहिल्या रात्री सम्भोग चुकतोच हे खरे आहे का ?
फक्त सम्भोगच काय, इतर कोणत्याही बाबतीत माणूस चुकतो, कारण त्याचा त्या बाबतीतला अभ्यास कमी असतो, ज्ञान कमी असतं किंवा अजिबातच नसतं.
पहिल्या रात्री सम्भोग चुकतोच हा खरं तर गैरसमज आहे. अगदी डॉ सुध्दा असे समजतात. प्रत्यक्षात जर पती-पत्नींनी पहिल्या सम्भोगापूर्वी विवाहपूर्व मार्गदर्शन घेऊन कामजीवनाची सर्व शास्त्रीय माहिती घेतली तर पहिला सम्भोग पण चांगला होतो. इथे पती-पत्नी किती शिकलेले आहेत, किती श्रीमंत आहेत याचा काही संबंध नसतो. विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये स्त्री पुरुष शरीर रचना, कार्य, विविधता, आसन हे समजून घ्यावे लागते. दोघांची वासना, वय, ऊंची, जाडी, यानुसार त्यांना माहिती देणे महत्वाचे असते.
पहिल्या रात्री सम्भोग चुकतोच हा खरं तर गैरसमज आहे. अगदी डॉ सुध्दा असे समजतात. प्रत्यक्षात जर पती-पत्नींनी पहिल्या सम्भोगापूर्वी विवाहपूर्व मार्गदर्शन घेऊन कामजीवनाची सर्व शास्त्रीय माहिती घेतली तर पहिला सम्भोग पण चांगला होतो. इथे पती-पत्नी किती शिकलेले आहेत, किती श्रीमंत आहेत याचा काही संबंध नसतो. विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये स्त्री पुरुष शरीर रचना, कार्य, विविधता, आसन हे समजून घ्यावे लागते. दोघांची वासना, वय, ऊंची, जाडी, यानुसार त्यांना माहिती देणे महत्वाचे असते.
काही लोकांचा "आम्हाला कशाला सेक्सची माहिती पाहिजे?" असा सवाल असतो. त्यांना वाटतं की आम्हाला मुलं-बाळं झाली म्हणजे आम्हाला सेक्स कळतं. त्यानी स्वतः सेक्सबद्दल माहिती समजून घेतली की लैंगिक शिक्षणाची गरज कळते. पॉर्न फिल्म्स पाहिल्या की आपोआप समजते असेही लोक म्हणातात. पँ जर तसं असतं, तर सेक्सॉलॉजिस्ट्ट पोर्नोग्राफीच्या cd, dvd विकत बसले असते ना ? पोर्नो पाहणे वेगळे आणि कामशास्त्र अभ्यास वेगळा. हे खरे आहे की लैंगिक शिक्षण, लैंगिक समस्या यांची माहिती घेताना काही कामुक चित्रपटांचा वापर करतात. फक्त डॉ त्यातले तज्ञ असावे लागतात.
निरर्थक कर्मकांड मन लावून करतील....पण विवाहपूर्व मार्गदर्शन घेणार नाहीत असा हा समाज खऱ्या अर्थाने सुखी, सुंदर कामजीवनापासून लांब राहतो. परंतु असे न करता सर्व मानव स्त्री पुरुषांनी कामशात्र अभ्यासावा.
(डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर )
कोणतीही लैंगिक समस्या मानसीक असते का ?
स्त्री-पुरुष लैंगिक समस्यांमागे मानसिकक व शारीरिक कारणे आहेत. बऱ्याचदा डॉॅक्टर "काही नाही रे, सगळे मानसिक आहे", असे म्हणून बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या देत असतात. आता नवीन allopathy औषध उपलब्ध झाल्याने त्याचा वापर जास्त सुरू झाला आहे.
मानसिक पेक्षा शारीरिक कारणांमुळे लैंगिक समस्या जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी नुसत्या viagra गोळ्या खाऊन फायदा होत नाही तर मुळ कारण शोधून त्यावर उपचार करावा लागतो. रक्तातील दोष, रक्तदाब, मधुमेह, लिवर, किडनी यांचे आजार, रक्तातील संप्रेरक पातळी कमी अधिक होणे, जन्मजात विकृती, इतर काही आजारावर सुरू असलेली औषधे त्यांचा दुष्परिणाम, मेंदूतील आजार, मेंदूवर झालेला आघात अशा कारणांनी लैंगिक समस्या निर्माण होत असतात.
योग्य केस टेकिंग घेऊन लैंगिक समस्या मागील कारण शोधता येते व त्यानुसार उपचार सहजपणे करता येतो. नुसतेच sildenafil गोळी सर्व लैंगिक समस्या वर उपयोगी नसते. तरीही नाव प्रसिध्द झाल्यामुळे काही डॉॅक्टर फक्त तेच लिहून देतात. गुण येत नाही....आणि "गोळी बादच होती रे "असे समजतात. खरेतर योग्य डॉ ने हा उपचार केलेला नसतो.
उपचार तज्ञ डॉ कडून करून घ्या. सेक्स पॉवर हा शब्द फार मोघमपणे वापरला जातॊ त्यामुळे हा सगळा घोळ होतो. हाच प्रकार स्त्री समस्या मध्ये पण दिसून येतो. "हिचा सेक्स कमी आहे" एवढे बोलले जाते.त्यावर अंदाज करून उपचार दिला जातो आणि लाजून स्त्री डॉ कडे जात नाही तर तिचा नवरा जातो....विचार करा असा कसा उपचार करता येईल.??
समाज आणि डॉ मध्ये लैंगिक समस्येबद्दल असा गोंधळ आहे. त्यामुळे उपचारांमध्ये चाल ढकल केली जाते. बरेच वेळा लोक उपचारांशिवाय राहतात. पेपर मधील जाहिरातीवर बंदी आणली पहिजे, तज्ञ डॉ कडून मानसिक किंवा शारीरिक समस्या वर उपचार केला पहिजे.
*गरज आहे ती डॉक्टर समोर नि:संकोचपणे आपली समस्या बोलून दाखवण्याची.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (9822534754)
हस्तमैथून चांगले की वाईट ? काही मर्यादा?
स्वतःच्या हाताने लिंग उद्दीपीत करून वीर्यपतन करने याला हस्तमैथुन म्हणतात. तरी देखील मऊ इतर भागावर उदा. गादी यावर लिंग घर्षण करून वीर्यपतन करने याला सुद्धा हस्तमैथुन म्हटलं जातं. या क्रियेविषयी खूप गैरसमज अजूनही लहान, मोठयाच्या मनात घर करून आहेत.
वयात आल्यावर प्रत्येकाला वाढलेली वासना शमवण्यासाठी जोडीदार मिळेलच असे नाही. त्या वेळी लैंगिक इच्छा दाबून ठेवण्यापेक्षा हस्तमैथुन हा निर्धोक मार्ग आहे. ते कितीवेळा करावे याला मर्यादा नाही. प्रत्येकाच्या लैंगिक भुकेनुसार ते करावे. लिंग किंवा वृषणग्रंथी दुखू लागले की त्यावेळी करू नये. काहींना १ वेळा तर काहींना ३-४ वेळा करावे वाटेल, दोन्ही नॉर्मलच.
हस्तमैथुन करून लिंग आकार कमी होत नाही. विवाहित, अविवाहित स्त्री-पुरुष हस्तमैथुन करतात. हे केल्याने वीर्यपतन संपत नसते. हे केल्याने लिंग वाकडे होणे, नपुंसकता येणे, वजन कमी होणे अशा काही तक्रारी होत नसतात.
पुरुषांप्रमाणे स्त्रीया देखील हस्तमैथुन करतात. फक्त त्यांच्यात वीर्य होत नसते. त्या शिश्निका आणि स्तन कुरुवाळून कामपूर्ती मिळवतात.
हस्तमैथुन किंवा झोपेत होणारे वीर्यपतन हे वाईट आहे असे म्हणणारी प्रत्येक जाहिरात आणि असे म्हणणारे डॉ हे १००%भामटे आहेत, हे कधीही विसरू नका.
२४ तास दैनंदिन काम सोडून सतत हस्तमैथुन करणे ही मात्र मानसिक विकृती आहे. शुक्राणुची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी नियमित हस्तमैथुन करणे उत्तम उपाय आहे. वंध्यत्वांमागे हस्तमैथुन कारण नसून दारू, सिगारेट, गुटखा अशी व्यसनं कारणीभूत आहेत.
हस्तमैथुन शाप म्हणणारा डॉ हा स्वतः मनोशारीरिक आजाराने त्रस्त असू शकतो.अशा पासून सावध !
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (9822534754)
कांदा, लसूण खाल्यास वीर्य वाढते ?
वयाच्या १३व्या वर्षापासून मुलाच्या वृषण ग्रंथीमध्ये सतत शुक्राणुची निर्मिती होत असते. ती काही रोगात कमी येते किंवा संपते.
वीर्यनाश झाला की ताकद कमी येते असा गैरसमज असतो. तामस आहार घेतला की सेक्स वाढतो असे म्हंटले जाते. त्या आहारात कांदा, लसूण, मांसाहारचा समावेश आहे. म्हणून कांदा, लसूण खाल्ला की वीर्य ताकद वाढते असा समज आहे.
विचार करण्यासारखे आहे की भारतात काही जाती-धर्मातील लोक कांदा लसूण खात नाहीत. त्यांच्यामध्ये वीर्यदोष जास्त आहेत का ? त्यांचे कामजीवन वाईट आहे का ? खरेतर असे काही दिसून येत नाही.
वीर्यदोष निर्माण होण्यामागील कारणांमध्ये हायड्रोसिल, वेरीकोसिल, जन्मजात विकृती, सम्प्रेरक मधील कमी अधिक पातळी आणि व्यसनाधीनता ह्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर अति गरम हवामानात सतत काम करणे व राहणे हे कारण आहेत.
प्रत्येक वेळा वीर्यपतन होते त्यात प्रति मिली २०-१२० मिलियन (दशलक्ष) शुक्राणु असतात. त्यातील ५५% पेक्षा जास्त शुक्राणू चांगल्या प्रतीचे असावे लागतात.
विटामिन सी, विटामिन ई, झिंक प्रोटीन यांची शुक्राणुला गरज असते. पुरेसे शाकाहार, मांसाहार, निरोगी शरीर आणि मन, नियमित व्यायाम हे शुक्राणु साठी पुष्कळ आहे.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (9822534754)
काय आहे हे वीर्य ?
मुलगा वयात आल्यावर म्हणजे साधारण वयाच्या १३ व्या वर्षापासून वृषणग्रंथींमध्ये शुक्राणु तयार होतात. एका वृषणग्रंथींमध्ये शुक्राणु निर्मिती योग्य होत असेल किंवा एक वृषण असेल तरी पुरेसे असते.
हस्तमैथुन, झोपेतले वीर्यपतन, सम्भोग या क्रियांमधून वीर्यपतन होते. त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. पुरस्थग्रंथी ,शुक्राणु कोश, कौपर्स ग्लेंड आणि शुक्राणु असे मिळून सर्व म्हणजे "वीर्य" होय. जेव्हा वीर्यपतन होते त्यावेळी २-५ मिली इतक्या प्रमाणात वीर्य बाहेर पडते. काही आजारामध्ये ही मात्रा कमी होते.
वीर्य घट्ट असले पाहिजे, पातळ असू नये, असा गैरसमज आहे. घट्ट असले तरी ते काही वेळानं ते पातळ होत असते. हे नॉर्मल आहे. पेपर मधील जाहिराती ह्या फक्त "टोपी" लावतात, त्यामुळे जाहिरात वर विश्वास नको. दोन हस्तमैथुन, सम्भोग यातील अंतर कमी काळाचं असेल तर वीर्य पातळ आणि कमी पडू शकेल, उलट बऱ्याच दिवसांनी वीर्यपतन झाले तर त्यावेळी वीर्यपतन घट्ट होते. वीर्यपतन चांगले म्हणजे सेक्स पॉवर चांगले असे काही नाही.
लग्नानंतर बाळ झाले नाही तर नशीबच वाईट असल्या थापा मारण्यापेक्षा विवाहपूर्वीच भावी पतीने वीर्य तपासणी करून घ्यावी हे केव्हाही उत्तम !
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर
(मोबाईल - 9822534754)
(मोबाईल - 9822534754)
पुरुषांमधील लैंगिक समस्या कोणत्या ?
नपुंसकता, शीघ्रवीर्यपतन, लिंग लहान असणे, लिंग खूप मोठे असणे, लिंग वाकडे असणे, वीर्यपतन होण्यास खूप वेळ लागणे, वीर्यपतन न होणे, कामवासना कमी किंवा बिलकुल नसणे, अति कामवासना असणे, सेक्स करताना लिंगामध्ये वेदना होणे या शारीरिक समस्या पुरुषांमध्ये असतात तसेच समलिंगी पुरुषांमध्ये देखील असतात. हस्तमैथुन, झोपेतील वीर्यपतन या विषयी मनात भीती बाळगल्यामुळे काही मानसिक समस्या निर्माण होतात.
या समस्यांमागील मानसिक व शारीरिक कारणं शोधून त्यावर उपचार करावा लागतो. बऱ्याच लैंगिक समस्यावर लैंगिक शिक्षण, मानसोपचार, allopathy उपचार असतो. पेशेंटला समस्या वाटणे आणि खरंच समस्या असणे वेगळे आहे. काहींना फक्त तसे वाटत असते. पण ते नॉर्मल असतात. डॉक्टर नेमके हेच सांगत नाहीत आणि मग उपचार चुकतात.
सध्या पेशेंट "गूगल मामा"च्या इतके प्रेमात पड्लेत की आजाराची माहिती गूगल सर्च करून डॉक्टरला शिकवण्यातच मोठेपणा मानतात. हे का चुकीचे आहे ते फक्त त्या त्या विषयातील डॉक्टरांनाच माहीत असते.
कोणतीही समस्या येऊदेत. त्यावर उपचार घ्या. काही गंभीर आणि जन्मजात आजारात उपचार नाहीत. पेपर, रेलवेस्टेशन, बसस्थानक, पुरुष सार्वजनिक मुतारी या मधील जाहिरातींवर अजिबात विश्वास ठेऊ नका. समस्या निर्माण झाल्यावर घाबरू नका, त्याने जीवाला धोका नसतो हे लक्षात घ्या.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
विविध सेक्स पोजिशन्सचा फायदा होतो का ? स्त्रीला की पुरुषाला ?
स्त्री-पुरुष दोघांना कामसुख घेताना विविध सेक्स पोजिशन्सचा फायदा होत असतो. कामसूत्र मध्ये ८४ वेगवेगळी कामआसने सांगितली आहेत. पण त्यातील काही आसने हातापायांची स्थिती बदलल्याने आसनांची संख्या वाढवली आहे असे वाटते. योनी-शिश्न प्रवेश सगळ्यात आहेच फक्त इतर शरीर वेगळे वेगळे ठिकाणी झुकलेले असते.
पुरुष वर आणि स्त्री खाली असे मेन ऑन टॉप ही पोजिशन जास्त प्रसिध्द आहे. खरेतर हे आसन सतत केल्याने सेक्स मधील एकूणच रस गेलेले जोडपी असतात.
स्त्री-पुरुषांच्या उंची, जाडी आणि वय यांचा विचार करून विविध पोजिशन्सचा वापर करावा लागतो. गरोदरपणात किंवा दोघांपैकी कोणाचं पोट मोठे असेल तर त्यानुसार वेगळ्या पोजिशन्स कराव्या लागतात. दमा, गुडघ्यांची शस्त्रक्रिया, हृदयरोग, संधिवात, यामधे पाय दुमडता येत नसतो किंवा त्रास होतो त्यावेळेस निरोगी पार्टनर हा सक्रिय सहभाग घेतो अर्थात तेव्हा नवीन पोजिशन वापरणे योग्य असते. नेमके घडते असे, की वर नमूद केलेल्या कोणत्याही समस्या झाल्या तरी लोक मेन ऑन टॉप पोजिशनचा वापर करतात, त्यात फारसे सुख मिळाले नाही की गप्प बसतात आणि सेक्स पासून लांब राहतात.असे न करता तज्ञ डॉक्टर कडून सेक्स पोजिशन्स बद्दल माहिती घ्या आणि कामसुखाचा आनंद घ्या.
स्वर्गीय सुख वगैरे थापावर विश्वास नको.......कामसुख इथे पृथ्वीवरच चांगले घ्या
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
कामुक चित्रपटांमध्ये जास्त वेळ सम्भोग दाखवला जातो हे कसे शक्य आहे ?
ताठरलेले लिंग योनीमध्ये प्रवेशित होऊन वीर्यपतन होण्यापर्यंतचा काळ हा २ ते ५ मिनिटं इतका असतो. औषध वापरून हा वेळ वाढवता येतो. पुरुषांचा हा गैरसमज आहे की, जास्त वेळ सम्भोग चालला तर स्त्रीला कामपूर्ती मिळते. पेपर मधील जाहिराती चुकीची माहिती पसरवतात. "रात्रभर जोश दाखवा......." , यामुळे पुरुषांची अपेक्षा वाढते.
कामुक चित्रपटांमध्ये एकाच सम्भोगामध्ये शूटिंग मध्येच थांबवले जाते आणि थोड्या वेळाने परत शूटिंग केले जाते. चौकसपणे पाहिले तर एडिटिंग केलेले लक्षात येते. किंवा पुरुष त्यावेळी गोळी घेऊन करत असतो.
खरेतर स्त्री ला कामपूर्ती कशी द्यावी हे समजले की जास्त वेळ सम्भोग करायला हवा असे काही नाही. दोघांच्या गरजा, इच्छा लक्षात घेतल्या पाहिजेत.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
पहिल्यावेळी सेक्स करताना पुरुषाची शीर तुटते असे म्हणतात, हे खरे आहे का ?
पुरुष लिंगाचा पुढील गोलाकार मोठा भाग म्हणजे शिश्नमुंड होय. त्याच्या खालील बाजूला त्वचेचा एक पातळ पडदा असतो त्याला बोली भाषात शीर म्हणतात. पहिल्या वेळी सेक्स करताना ही शीर तुटते, पुरुषांचा समज आहे. ज्यांची तुटली नाही ते तोडण्यासाठी प्रयत्न करतात.
सेक्स मध्ये फायदेशीर असलेला हा भाग असून पुरुष त्याबद्दल गैरसमज करून घेतात. बळजबरीने केलेला सेक्स, बलात्कार, घाईत केलेले हस्तमैथुन यामुळे शीर तुटते. म्हणजे सेक्स मध्ये शीर तुटली हे अभिमान बाळगण्यासारखे नसून तो पुरुष सेक्स करताना चुकला आहे हे समजते. योग्य प्रकारे कोणत्याही आसनामध्ये कितीही वेळा सेक्स केला तरी शीर तुटत नसते हे लक्षात ठेवा.
कामजीवन विषयक माहिती मित्राकडून ऐकण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांकडून नीट समजून घ्या. तसेच स्वतःच्या लिंगाची स्वच्छता कशी करावी हे देखील बऱ्याच लोकांना माहित नसते. हा विनोद नसून कटु सत्य आहे. नाक स्वच्छ करायला थोडा वेळ देणारा पुरुष लिंग स्वच्छतेकडे मात्र तेवढा वेळ देत नाही.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
स्त्री हस्तमैथुन करते ?
पुरुषांप्रमाणे स्त्री देखील हस्तमैथुन करते. त्याचे प्रमाण आता वाढत चालले आहे ही आणि ही चांगली गोष्ट आहे. लैंगिक सुखात पुरुषाची मक्तेदारी नाही. तिची लैंगिक भूक शमवण्यासाठी हस्तमैथुन हा निर्धोक मार्ग आहे.
वासना वाढल्यानंतर स्त्री स्वतःचे स्तन, शिस्निका कुरुवाळते, काहीवेळा सम्भोग करते अशी कल्पना देखील करते, त्यासाठी योनीमार्गात बोटांचा, सेक्स टॉयचा वापर करू शकते. ही क्रिया तिला कामसुखाचा उच्चबिंदू मिळेपर्यंत चालते. त्याला कामपूर्ती म्हणतात. यात काहींची कंबर वर-खाली होते. काहींना जोरात झटका आल्यासारखे वाटते, तर काहींना एकदम शांतपणे शरीरातून लहर गेल्यासारखे वाटते. काहींना एकाच हस्तमैथुनामधून दोन वेळा कामपूर्ती मिळते.
पुरुषांप्रमाणे स्त्रीला सुद्धा हस्तमैथुन करणे हे फायदेशीर आहे. त्याचा भावी लैंगिक आयुष्यात कोणताही, कसलाही दुष्परिणाम होत नाही. उलट सम्भोगामध्ये कामपूर्ती मिळवताना फायदा होतो. याने कोणताही रोग होत नाही. स्त्री हस्तमैथुन करते असे म्हंटले की बहुसंख्य पुरुष आश्चर्यचकित होतात. कित्येकांना हे माहितच नसतं.
भारतातच स्त्रियांच्या हस्तमैथुनात वापरल्या जाणाऱ्या सेक्स टॉयची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. यावरूनच समजते की, स्त्री खाजगी जीवनामध्ये सजग होत चालली आहे.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
विवाहित स्त्री पुरुषांनी रोज किती वेळा सम्भोग करावा ?
आपल्याला भूक लागली की आपण जेवतो. पोट भरले की शांत होतो. तसेच दोघांची लैंगिक भूक किती आहे, एकमेकांस कामुक केल्यावर सम्भोगासाठी किती तयार होतात तसा सम्भोग होत जातॊ. मन आणि शरीराने साथ दिली तर दिवसातून १३ ते १५ वेळा सम्भोग केलेले लोकं आहेत. आकड्यांनी चकित होऊ नका, यासाठी त्या दोघांची तयारी, वय, वजन आणि लैंगिक वासना या बाबी महत्त्वाच्या आहेत.
विवाहित स्त्री पुरुषांनी विवाहपुर्व कधीही लैंगिक संबंध अनुभवले नसतील आणि वासना चांगली असेल तर दिवसाला १ ते ३ वेळा सम्भोग करतात. काही जणं ३ ते ४ वेळा सुद्धा करतात. वासना आहे पण नोकरी, व्यवसाय यामध्ये व्यस्त, खाजगी खोली नसेल तर तेवढा पण सम्भोग करता येत नाही.
इतर जणं किती वेळा करतात याची तुमच्याशी तुलना करू नका. जेवढ्या वेळा कराल त्यात दोघांना कामसुख मिळावे एवढीच अपेक्षा असावी..... आणि हो फक्त अपेक्षाच, हट्ट अजिबात नसावा.
संख्या वाढवून गोल्ड मेडल मिळणार नाही त्यामुळे कामसुख मिळतं का ते पाहणं जास्त महत्त्वाचं.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
स्त्री-पुरुष दोघांना एकाचवेळी कामपूर्ती मिळते का ?
आलिंगन, चुम्बन, शरीराच्या विविध भागाला कुरवाळणे, कामुक केंद्र ऊद्दिपित करणे यातून दोघांची कामवासना खूप वाढते. ताठरलेले लिंग योनीमार्गात प्रवेशित झाल्यावर सम्भोग, त्यात पुरुष कमरेची हालचाल मागेपुढे करतो आणि वीर्यपतन होते, याने पुरुषाला कामपूर्ती मिळते. परंतु याच वेळी स्त्रीला कामपूर्ती मिळते असे नाही. तिला कामपूर्ती मिळण्यासाठी शिष्निका बोटांनी कुरवाळावी लागते. ते पुरुष किवा स्त्री त्यांच्या बोटांनी करू शकते. स्त्री लाजत असेल तर ती शांत राहते. पुरुषाला समजत असेल तर तो प्रयत्न करतो. G spot हा स्त्री योनीमर्गात वरील भिंतीला दोन इंच अंतरावर असतो. फोरप्ले मध्ये हे करत असताना कामपूर्ती मिळते. मुखमैथून करून देखील स्त्रीला कामपूर्ति देता येते.
नेहमी पुरुषाने स्त्रीला कामपूर्ती द्यावी असे काही नाही स्त्री देखील स्वतः ती मिळवू शकते. दोघांची कामपूर्ती एकाचवेळी व्हावी असा हट्ट नसावा. नेहमी कामपूर्ती मिळावीच हा देखील हट्ट नसावा. मात्र स्त्रीला कधीच कामपूर्ती मिळत नसेल तर उपचार गरजेचे आहेत.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
विवाहा अंतर्गत बलात्कार खरेच होतात का ?
स्त्री वर बलात्कार झाल्याची, बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग झाल्याची बातमी पेपर मधून वाचायला मिळते. पण पतीने त्याच्या पत्नीवर बलात्कार केला अशी बातमी कुठे ऐकायला मिळत नाही. याचा अर्थ विवाहा अंतर्गत बलात्कार होत नाही असे नाही.
स्त्री ला मन आहे, तिच्याही लैंगिक इच्छा आहेत, लैंगिक सुख तिलाही मिळावे असे बऱ्याच पुरुषांना वाटत नाही किंवा माहित नसते. त्यामुळे रोज त्याला हवा तसा सेक्स करायचा, हवे तेव्हा स्त्री तयार असते असे समजून बळजबरीने सेक्स केला जातो बऱ्याच स्त्रीया हे प्रकार मुकाट्याने सहन करतात आणि स्त्री "सम्भोग सुख असेच असते"असे समजत राहते. शिक्षित कमावती स्त्री पण हे सहन करते. त्यांचे किती शिक्षण आहे याचा इथे काहीच सम्बन्ध नाही.
नवीन पिढीतील मुली आता हे उघडपणे बोलत आहेत, विरोध करत आहेत. याचं प्रमाण किती आहे हे सांगणे कठीण पण हळूहळू बदल होतोय हे मात्र निश्चित.
लहान मुला-मुलींना लहानपणापासूनच वयानुसार लैंगिक शिक्षण मिळालं तर हे प्रसंग घडणार नाहीत. ह्या देशात पूजा-अर्चा, देव-देव, मोठ्या प्रमाणात लग्नाचा थाट यातच पैसा खर्च केला जातो, पण लैंगिक जीवनावर शास्त्रीय माहिती घ्यावी हे बुद्धीत येत नाही. मोठ्या प्रमाणात लैंगिक छळ झाला की, नशीब वाईट असे म्हणायला मोकळे.
म्हणूनच विवाहपूर्ण मार्गदर्शन प्रत्येकाला गरजेचे आहे.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
सेक्स करताना HIV होऊ नये म्हणून दोन कंडोम्स वापरावे का?
कंडोम हा सरासरी १६ सेंमी लांब, ५ सेंमी रूंद व ०.०७ सेंमी जाड असतो. ताणल्यानंतर तो अजून काही प्रमाणात लांब होतो. चांगल्या प्रतीचा कंडोम बाजारात उपलब्ध करण्याआधी त्यावर काही टेस्टिंग होतात. मगच ते वापरण्यास योग्य ठरतात. बाद ठरलेले कंडोम्स बाजारात आणले जात नाहीत.
HIV बाधितांसोबत सेक्स करताना पुरुषाने लिंगावर एक कंडोम नीट लावला तर तो फाटत नाही. त्याला थुंकी किंवा तेल लावल्यास तर मात्र तो कंडोम फाटतो. जास्त सुरक्षिततेसाठी म्हणून एकावर एक दोन कंडोम्स लावले जातात. पण त्याची गरज नसते. उलट दोन कंडोम्स वापरले तर दोन कंडोम्सच्या मध्ये हवा राहते व सेक्स करताना तो फाटण्याची शक्यता जास्त असते.
थोडक्यात काय तर, योग्य पद्धतीने वापरलेला एक condom देखील HIV पासून संरक्षण देतो.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
स्त्री कामजीवनात खरेच थंड असते का ?
बरीच वर्षे चुकीचा संस्कार करत राहिले की नैसर्गिक क्रियेत पण कशी अडचण येते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. याचे सर्व श्रेय मुलींच्या पालकांना जाते. अव्वा, ईश्श्या, मुलींनी असे करायचे नाही, घाण फिल्म्स बघायच नाही, 'सु'च्या जागेला हात लावायचा नाही, अशी बरीच चुकीच्या शिकवणुकी पालक देत असतात. याचा परिणाम सेक्समध्ये, जननेंद्रियाबद्दल चुकीचा दृष्टिकोन तयार होतो.
खरा प्रॉब्लेम लग्नानंतरच्या सेक्स लाइफ मध्ये दिसून येतो. स्त्री अक्षरशः प्रेतासारखी पडून राहते, सेक्समध्ये सक्रिय सहभाग घेत नाही. हे नको, ते नको असे म्हणत पुरुष योग्य करत असेल तरी चुकीच्या विचाराने सेक्सपासून लांब राहते.
या उलट त्या स्त्रीने कामजीवनाविषयी शास्त्रीय माहिती घेतली तर ती सेक्सचा पूरेपूर फायदा घेते, कामसुख अनुभवते. कडक वातावरणात वाढत असताना मुली घरचं न ऐकता माहिती मिळवू शकते. याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे हे एक चांगली बाजू म्हणावी लागेल.
थोडक्यात स्त्री निसर्गता थंड नसते. तिला शिक्षण, कामशिक्षण दिलेच पाहिजे. सर्व क्षेत्रात पुरुषाची मक्तेदारी आता नको.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
पुरुषाने लिंग लहान आकाराचे असेल तर तो बाप बनू शकतो का?
सम्भोगात ताठरलेले लिंग योनीमार्गात प्रवेशित होऊन वीर्यपतन होत असते. बाप होण्यासाठी चांगल्या प्रतीचे योग्य प्रमाणात वीर्यपतन होणे गरजेचे असते. तसेच निरोगी स्त्री बीज हवे असते.
वीर्यपतन होताना वीर्य लिंगातून जोरात बाहेर टाकले जाते. स्त्री योनीमार्ग ८-११ सेंमी लांब असतो. लिंग ५ सेंमी लांब असले तरी वीर्य बरोबर आत जाते. त्यामुळे लिंगाचा आकार नॉर्मल लहान असला तरी चालते. फक्त काही स्त्री-पुरूषांच्या बाबतीत त्यांना वेगळे आसन करायला सांगावे लागते.
लिंग काहीवेळा जन्मतः विकृती असल्याने ताठरल्या नंतर ५ सेंमी पेक्षा कमी असेल तर त्या पुरुषाच्या वृषणग्रंथींमध्ये पण दोष असण्याची शक्यता जास्त असते. मेंदू मध्ये काही सम्प्रेरक तयार करण्यासाठी आवश्यक ग्रंथी सदोष असते. त्यामुळे तो बाप बनू शकत नाही.
विवाह करण्यापूर्वी स्त्री पुरूष तपासणी आवश्यक आहेच. पण ते लोकं मान्य करत नाहीत. त्यापेक्षा ज्योतिषीचा सल्ला त्यांना योग्य वाटतो.......काय म्हणायचे याला ???
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
कामुक चित्रपटांचा वापर लैंगिक समस्या वरील उपचारांसाठी करता येतो ?
निश्चितच करता येतो. कामुक चित्रपट विविध प्रकारचे असतात. त्यात असणाऱ्या सेक्स मधील विविधता असते. त्यामुळे ते कसे वापरायचे ह्याचे ज्ञान डॉक्टरला पाहिजे.(परंतु हे सर्व डॉक्टर्सना माहीत नसते.)
वासना कमी असणे, सेक्स बद्दल भिती असणे, नपुंसकता, संधिवात, दमा, शस्त्रक्रिया नंतरचे कामआसन यामध्ये अशा कामुक चित्रपटांचा वापर करता येतो. तसेच लैंगिक अवयवांबद्दल गैरसमज असले तर त्याची माहिती पटकन समजून सांगता येते. ह्याचा अर्थ परस्पर चित्रपट पाहिल्यावर सगळे कळेल असे नाही.
बाजारात मिळणारी सुरी ही एखाद्याला मारण्यासाठी वापरायची की भाजी कापायला वापरायची हे त्या वापरणारावर अवलंबून आहे.
कामुक चित्रपटांमध्ये बरेच शिकण्याला आहे. फक्त ती नजर आवश्यक आहे. ती नजर फक्त तज्ञ डॉक्टर देऊ शकतो.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
स्त्रीयांच्या लैंगिक समस्यांवर कोणते औषधउपचार असतात ?
वेदनायुक्त सम्भोग, कामपूर्तीचा अभाव, वासना खूप कमी किंवा अधिक यावर काहीवेळा allopathy औषध वापरता येते पण हे घडण्यामागे मूळ कारण शोधून ते किती व कसे द्यायचे हे ठरते. स्त्रीच्या समस्या असल्या तरी पुरुष तिला डॉक्टरकडे घेऊन जात नाही आणि मेडिकल मधून स्वतः औषध आणतो.
बऱ्याच समस्यांवर कामजीवनाबद्दल माहिती देणे, मानसोपचार करणे यांसारखे उपचार करावे लागतात. सध्या सेक्स समस्यांवर गोळ्या घेण्याचं वेड फार आहे. त्याचा फायदा "भोँदु" घेतात.
स्त्री ची लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी काही मेडिसीन उपलब्ध आहेत पण त्यावर तज्ज्ञांचा सल्ला अपेक्षित आहे.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
समलैंगिक असणे विकृती आहे का ?
जवळ जवळ सर्व सस्तन प्राण्यांमध्ये समलैंगिक सापडतात. अर्थात माणसात पण आहेच. पूर्वीपासून हे समलैंगिक आकर्षण दिसून आले आहे. काहींमध्ये हे आकर्षण कायम राहते तर काहींमध्ये तात्पुरते असते. १९७४ पासून अमेरिकन साइकोलॉजिकल असोसिएशनने समलैंगिकतेला नॉर्मल (नैसर्गिक) म्हणून स्वीकारले आहे.
विरुध्दलिंगी आकर्षणामध्ये पुढील पिढी निर्माण होते म्हणून तेच नॉर्मल असे समजले जाते. पण सेक्स हेफक्त पुढील पिढी निर्माण करण्यासाठी नसते. प्रेम ही भावना दोन्ही ठिकाणी दिसून येते. पुरुष समलिंगीला "गे" म्हणतात व स्त्री समलिंगीला "लेस्बीयन" म्हणतात. विरुध्दलिंगी लोकांप्रमाणे यांच्यामध्ये पण लैंगिक समस्या असतात त्यावर उपचार करता येतो. समलिंगी व्यक्ति विरुध्दलिंगी व्यक्तीशी लग्न करून आपोआप विरुध्दलिंगी होत नसतो. काहीजण समाजाला घाबरून लग्न करतात आणि जोडीदाराला फसवतात. मग सेक्स भावना नसल्याने विरुध्दलिंग आकर्षण होत नाही. असे न फसवता अविवाहित रहावे किंवा समलिंगी व्यक्ती बरोबर एकत्र राहणे उत्तम.
धर्म, संस्कृती यामुळे समलैंगिकांना काही देशात मान्यता आहे, काही मध्ये नाही. खरंतर माणूस म्हणून जगण्याचा आणि लैंगिक सुख घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्याची आवड काही असो. समलैंगिक हे विरुध्दलिंगी आकर्षित होण्यासाठी कोणतंही औषध नाही आणि त्यांना तशी गरज ही नाही, कारण ते नैसर्गिक आहे.
समलिंगी सम्भोग करताना गुदमैथुनाद्वारे केले जाते, हे पूर्ण सत्य नाही. समलिंगी मध्ये hiv प्रमाण जास्त आहे असे काही नाही. पण चित्रपटांमधून यावर विनोद केले जातात. समलिंगी पुरुष हे स्त्री सारखे हावभाव करतात, असे नाही. तो पूर्ण पुरूष असतो. स्त्री सुध्दा पूर्ण स्त्री असते फक्त त्यांचे आकर्षण विरुद्धलिंगी व्यक्तीकडे नसते एवढेच. समलिंगी आकर्षणामागे जन्मजात विकृती, सम्प्रेरकांमधील बिघाड, कुंडली दोष अशी वेगवेगळी कारणं सांगितली जातात. पण असं काहीही नसतं.
त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगण्याचा हक्क आहे. समलैंगिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
मासिक पाळी सुरू असताना सेक्स करावा का ?
स्त्रीला प्रति महिना ४-७ दिवस पाळी येते. थोड्या, मध्यम, तीव्र प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. या काळात पोटात दुखणे, अशक्तपणा येणे अशा प्रकारचे त्रास काही स्त्रीयांना होतात. त्यामुळे विश्रांतीची गरज असते. मात्र असं असून देखील काही स्त्रीयांची लैंगिक इच्छा खूप वाढते. पार्टनर तयार असेल तर दोघांच्या इच्छानुसार सेक्स करू शकता. महत्वाचे म्हणजे यातील कोणीही गुप्तरोगाने पीडित नसावे. लिंगाला रक्त लागू नये असे वाटत असेल तर पुरुषाने कंडोम वापरावा. अन्यथा तसाच सेक्स केला तरी चालतो.
मासिक पाळी मध्ये सेक्स करू नये असे ऐकलेले असते, पण दोघांना आवडत असेल तर काहीच हरकत नाही. फक्त त्यावेळी मुखमैथुन करू नये. बोटांचा वापर करून G-Spot ऊद्दिपन करू नये. सेक्स केल्यावर लिंग स्वच्छ धुवून घ्यावे. नाही धुतले तरी चालते. हेच नियम समलिंगी स्त्रीला पण लागू होतात.
पाळीतील रक्तस्त्राव हा विषारी नसतो. त्यामुळे मासिक पाळीला निषिद्ध मानणे चुकीचे.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
Viagra (व्हाएग्रा) हे सुरक्षित आहे का ? ते खाल्ल्याने मृत्यू येतो असे म्हणतात.
पुरुषांमधील फक्त "नपुंसकता" ह्या समस्येवर उपचार म्हणून viagra वापरतात. त्यातले मूळ औषध "सिल्डेनाफील" हे आहे. "सेक्स पॉवर" हा शब्द वापरून लोक कुठल्याही तक्रारीवर हे वापरतात. अर्थात हे चुकीचे आहे. याच्या सेवनाने रक्तदाब थोडा कमी येतो. तसे हे सुरक्षित असे औषध आहे.
हे खाल्ल्याने मृत्यू येण्यामागे कारण म्हणजे, आधी काही allopathy गोळ्या सुरू असतील तर सिल्डेनाफील घेऊ नये, तसेच जास्त प्रमाणात याचे सेवन केले की रक्तदाब खूपच कमी येतो. याची माहिती औषध विक्रेत्याला, पेशेंटला माहित नसते. जोश मध्ये स्ट्रॉंग डोस घेतला जातो आणि त्यामुळे मृत्यू होतो.
थोडक्यात गोळी तज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे घ्यावी लागते. सिल्डेनाफीलने नपुंसकता कायमची बरी होत नाही. पण गोळी मुळे लिंग ताठरता चांगली येते. याचा १-२ महीने घेणे असा कोर्स नसतो. एक ते तीन दिवस याचा परिणाम राहतो. हे नपुंसकता वर सर्वात सुंदर औषध आहे. मीडियाने यावर अर्धवट माहिती दिल्याने लोक या गोळीला घाबरतात. स्त्रीयांच्या काही समस्यांवर पण आता ही गोळी वापरता येते.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
गर्भारपणात सेक्स करावा का?
काही डॉक्टर सेक्स करू नका असे म्हणतात पण गरोदर स्त्रीची इच्छा असेल व गर्भाशय, त्यात वाढणारं बाळ, गर्भाशयाचे तोंड हे नॉर्मल असेल तर पोटावर दाब न देता अगदी ९व्या महिन्यापर्यंत सेक्स करता येतो. ते सुरक्षित आहे. फक्त मुखमैथुन, बोटांचा योनिमार्गात प्रवेश ह्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळणे महत्वाचे.
गरोदरपणात स्त्रीमध्ये भावनिक चढ-उतार होत असतो. यामध्ये काही स्त्रीया सेक्स मध्ये इंटरेस्ट घेतात, काही घेत नाहीत. सेक्स करू नये, असे जास्त ऐकलेले असल्याने काहीजणी घाबरून सेक्स करत नाहीत.
जर या पूर्वी गर्भपात झाला असेल, गर्भाची स्थिती योग्य नाही, placenta गर्भाशय ग्रीवेला चिकटून असेल, अशा वेळी सेक्स पूर्ण टाळावा. अशा वेळी पुरुषाने त्याची वाढलेली कामवासना शमवण्यासाठी हस्तमैथुन करावे. काही पुरुष इतर स्त्री बरोबर सम्भोग करतात. हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे, फक्त तेव्हा कंडोम वापरून सम्भोग करावा एवढेच. त्याच बरोबर गरोदर पत्नी बरोबर मुखमैथुन, परहस्तमैथुन करून कामपूर्ती मिळवू शकतो.
वेगवेगळी आसने तज्ञ डॉक्टर्स कडून समजून घ्या. पोटाचा घेर वाढल्याने स्त्रीला कंफर्टबल होईल, असे आसन करावे लागते.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
अनेक स्त्रियांसोबत सेक्स केला की AIDS (एडस्) होतो का ?
HIV आणि AIDS हे वेगवेगळे आहेत. HIV हे विषाणूचं नाव आहे आणि त्या विषाणूमुळे रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन वेगवेगळे आजार होतात, विविध रोगांची लक्षणे एकत्र दिसतात, त्याला AIDS (एडस्) म्हणतात.
किती स्त्री किंवा पुरुषांसोबत सेक्स केला याला महत्व नाही, तर त्यापैकी कोण HIV बाधित आहे का, हे महत्वाचे असते. तसेच सेक्स करताना सुरक्षिततेची काळजी घेतली नसेल तर रोग संक्रमण होणार. त्या अनेक स्त्रीया आणि एक पुरुष हे जर पूर्ण निरोगी आहेत तर HIV होणार नाही.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
वीर्य तपासणी कधी करायची असते आणि का ?
पुढील पिढी तयार होण्यासाठी पुरुष आणि स्त्री चे बीज निरोगी असणे आवश्यक असते. त्यात जर बिघाड असेल तर स्त्री गरोदर राहत नाही. पुरुषाचे वीर्य सदोष आहे का ? त्यातील शुक्राणुची संख्या किती आहे, हे समजण्यासाठी वीर्य तपासणी करावी लागते.
२-५ दिवस वीर्यपतन होऊ न देता नंतर हस्तमैथुन करून ते वीर्य तपासणी साठी द्यावे लागते. काही डॉक्टर्स २ दिवस वीर्यपतन करू नका असा सल्ला देतात तर काही ४ दिवस करु नका म्हणतात. जेणेकरून वीर्य साठा जास्त होईल. प्रत्यक्षात २४ तासांचा वेळ पुरेसा असतो. जे वीर्यपतन होते त्यात ५५% पेक्षा जास्त शुक्राणु चांगले पळणारे असावेत. हस्तमैथुन करताना एक काळजी घ्यावी. कोणतेही मलम, तेल, थुंकी लावून हस्तमैथुन करू नये त्यामुळे तपासणी सदोष येते.
तसेच, मुलगा पाहिजे ? मुलगाच होईल... असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका...ससुरा....ये रॉन्ग नंबर होता हैं.
-डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल - 9822534754)
सर माझे वय ३४ वर्षे आहे साधारणपणे मी वयाच्या १८वर्षापासून दारु पितो.अचानक मी दारु सोङली पण याचा परिणाम लिंगाच्या ताठरतेवर जाणवत आहे .कृपया उपाय सांगा.
ReplyDelete