सावरकर लिहितात - " अकराशे आठ सत्यनारायणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाहि. …. सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज परम बलिष्ठ म्हणून यशस्वी झालेला आहे. …. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली , प्रत्यक्ष मादिनेतली मशीद घोडशाळा बनली , जेहोवा चे सुवर्ण मंदिर तडकले , जीजसला रोमने कृसिफाय केले …। रामास हराम समजणारे सुद्धा …वैज्ञानिक बळाने यश मिळवू शकतात.…. अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे … चळवळीत ते सामर्थ्य असेल तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसेल तर कोटि कोटि जप केले तरी काही फरक पडत नाही . हाच सिद्धांत !''
(समग्र सावरकर वाडमय २००१ - संदर्भ ६:१३)
(समग्र सावरकर वाडमय २००१ - संदर्भ ६:१३)
"श्रृती-स्मृती इ ग्रंथानां आज अवास्तव महत्त्व द्यायचे कारण नाही" ," गाय हा पशू आहे, पशू सारखे वाटले तर मारावे व खावे", "पंचंगव्याला जे महत्त्व देतात ते माणसाला पशू हून हिण वागवतात व पशूला देवस्थानी माणतात", " गायीच्या शरीरात जर ३३ कोटी देव असले तर, एखाद्याने जर सहज तिला काठी मारली तर पाच पन्नास देव धारातिर्थी पडायचे, हे कसे परवडेल? आणि तो देवच काय जो स्वतःचे रक्षण करू शकणार नाही?" "गायीच्या पोटात हा देव, पाठीत हा देव इतकेच काय पायात हा देव असे माणने म्हणजे देवालाही पशूपेक्षा हिण समजणे हे होय",
सावरकर म्हणतात...
एक अनाथालय उभारणे हे हजार सत्यनारायणांहून श्रेष्ठ आहे !!
*विचार- विनायक दामोदर सावरकर*
*संदर्भ- समग्र वांग्मय,खंड३,पान क्र.३३९*
No comments:
Post a Comment