Flash

Wednesday, 19 April 2017

महात्मा गांधी -बाबासाहेब वाद

माझा बहुतेक वेळ गांधीजींची अस्पृश्यता निवारक पत्रके वाचण्यात जातो.
पत्रकांतील विचार वाचून गांधीजींच्या विचारांत केवढी तरी क्रांती घडून आल्याचे दिसून येते. *गांधीजींना आता _`आपला माणूस'_ म्हणावे. कारण ते आता आपली भाषा व आपले विचार बोलू लागले आहेत.*
अस्पृश्यांच्या हालअपेष्टांचे गांधीजींनी एका पत्रकात केलेले यथार्थ वर्णन वाचीत असता मला वाटते की _`समता'_ अगर _`बहिष्कृत भारत'_ या आपल्या पत्रातील काही लेखांचे इंग्लिश भाषांतरच जणू वाचत आहोत.
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर* 
(१४. ११.१९३२ रोजीचे बोटीवरून पत्र )
- [डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा
*- शंकरराव खरात*
- पृ १७७]

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...