*"ब्राम्हणी ग्रंथांनी आमची मूळची नैसर्गिक संस्कृती विकृत करून टाकली. या आत्मनिष्ठ स्वार्थी पुरोहित शाहीचा बिमोड करून त्या ठिकाणी स्वाभाविक, नैसर्गिक मूल्यांची संस्थापना करणे मी माझे कर्तव्य समजतो.. आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृश्यता निवाराण्यासारख् या चिठ्या हिंदुधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चातुर्वर्ण्य- व्यवस्थेचा रांजण जर दुरुस्त झाला नाही तर तो रांजण फोडूनच टाकणे महत्वाचे आहे...*
देशाच्या बलसंवर्धनासाठी तरुणांच्या मनात चुकीच्या का असेना; ज्या कल्पना खेळत असतील त्यापुढे धनसंपत्तीची काय किंमत आहे?.. खेळण्याच्या गंजिफ्याच्या पत्त्यातील राजा-राणी होऊन बसण्यात काय अर्थ आहे?.. आम्ही सारे एक झालो तर आम्हाला गुलाम म्हणून वागविण्याची कोणात शक्ती आहे?.. राजकारण प्रखर संघर्षांचे क्षेत्र आहे. येथे हळवे मन ठेवून चालत नाही.. आज जरी प्रतिष्ठित शिष्टांचा तांडा आपली कुचेष्टा करीत असला तरी याची कदर भविष्याचा इतिहास करणारच आहे.’’
‘‘देवधर्म व अध्यात्मावर माझा मुळीच विश्वास नाही. मनुष्याची निर्मिती कोणत्याही ईश्वराने, कोणत्याही. आत्म्याने केली नसून ते सरळ सरळ उत्क्रांतीक्रमाचे फळ आहे.. स्वत:च्या पराक्रमावर विश्वास असल्याशिवाय जगातील कोणत्याही जमातीचे कल्याण झाले नाही. केवढीही बलाढय सत्ता असो तिच्या कपाळाला कपाळ घासून तुम्ही तुमचे भवितव्य उजळू शकत नाही.. समाजक्रांतीची बीजे पेरणे आणि जुनी मूल्ये टाकून देऊन नवीन मूल्यांना खतपणाी घालणे व त्यांची जोपासना करणे शिक्षक वर्गाच्या हाती आहे.. कोणत्याही समाजक्रांतीकारकाने आपल्या अज्ञ जमातीपासून स्वत:ला अलग पाडून घेतले तर तो समाजासाठी काही करू शकत नाही. म्हणून त्याने त्यांच्यातच राहून त्यांना न कळत परिवर्तन घडवून आणायचे असते.’’
*विचार- डॉ .पंजाबराव देशमुख. (भारताचे पहिले कृषी मंत्री)*
*संदर्भ- लोकसत्ता.२४.७.२०१४*
संदर्भ लिंक- http://www.loksatta.com/…/curiosity-cholesterol-and-oil-69…/
"ब्राम्हण व अस्पृश्य दोघेही आईच्या उदरातूनच जन्माला येतात, हा भेद जर नैसर्गिक असता तर अस्पृश्यांमध्ये ब्राम्हनांना लाजवतील असे विद्वान जन्माला आले नसते." - पंजाबराव देशमुख.....!
"ब्राम्हण व अस्पृश्य दोघेही आईच्या उदरातूनच जन्माला येतात, हा भेद जर नैसर्गिक असता तर अस्पृश्यांमध्ये ब्राम्हनांना लाजवतील असे विद्वान जन्माला आले नसते." - पंजाबराव देशमुख.....!
No comments:
Post a Comment