Flash

Wednesday, 26 April 2017

शोध मनोविकारांचा - डॉ. प्रदीप पाटकर

*शोध मनोविकारांचा ( भाग १ )**प्र. १. मन म्हणजे काय?*

मन हा शरीरात दाखवता येण्याजोगा अवयव नाही. विचार, संवेदना, भावना, स्मृती, झोप, जागृतावस्था अशा सर्व गोष्टींचा अनुभव म्हणजे मन म्हणता येईल. त्यामुळ मन हे दाखविता येत नसते, पण मनाचे अस्तित्व मात्र सतत जाणवते. हा मनाच्या आस्तित्वाचा अनुभव मेंदूच्या अस्तित्वावर पूर्णतया अवलंबून असल्याने, मेंदूच्या अस्तित्वाशिवाय मनाचे अस्तित्व असू शकत नाही. म्हणून मनाचे स्थान मेंदूत आहे, हे निश्चित. मेंदुतल्या पेशिंच्या कार्यावर मानवी मनाच्या प्रक्रिया (उदा. विचार, स्मृती, भावना, संवेदना इ.) अवलंबून असतात. मेंदूचे काम बिघडले की मनाचे काम बिघडते.
मनाचे दोन भाग कल्पिले आहेत. एक बाह्यमन जे जागृतावस्थेत बाह्य जगात आपल्याला जाणविनाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्याचे काम करते. बाह्यमन झोपेत काम करत नाही. पण अंतर्मन मात्र जागेपणी व झोपेतही सतत काम करीत असते. बाह्यमनाला मदत करण्याचे काम ते करते. त्याशिवाय आजवरचे आपले विचार, ज्ञान, इच्छा, आठवणी, भावना इ. अनेक गोष्टी अंतर्मनात साचलेल्या असतात.
*~डॉ. प्रदीप पाटकर*
©महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

==================================================================================================

*शोध मनोविकारांचा ( भाग २ )*
*प्र. २. मन आजारी पडते म्हणजे काय होते?*

मानवी मनाचे कार्य मेंदूमधल्या विशिष्ट पेशींच्या कार्यावर अवलंबून असते. जेव्हा मेंदूमधल्या पेशींच्या कार्यात वेगवेगळ्या कारणांमुळ बिघाड होतो वा पेशींचे एकमेकांशी संतुलन तुटते अथवा या पेशी मुळातच दोषपूर्ण असतात तेंव्हा मन आजारी पडते व मनोविकारांची लक्षणे दिसू लागतात.
मन आजारी पडते म्हणजे मनाच्या काही प्रक्रिया बिघडतात. वर्तन, भावना, विचार संवेदनांचा अर्थ लावणे, आठवण न राहणे, जाग येणे वा झोपणे अशा व इतर अनेक गोष्टींमधे बदल होतात. हे बदल त्या मानवाला व इतरांना त्रासदायक ठरतात.

*~डॉ. प्रदीप पाटकर*
©महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
================================================================================================

*शोध मनोविकारांचा ( भाग ३)*
*प्र. ३.- काही प्रमाणिक माणसे भूत दिसल्याचे सांगतात. जर जगात भूत नाही तर त्यांना ते कसे दिसते?*

वय वर्ष नऊपर्यंत जी काही माहिती मुलांना मिळते; ती माहिती अंतर्मनात जशीच्या तशी स्वीकारली जाते. ती माहिती खरी की खोटी हे समजून घेऊन मग खरी माहिती मनात ठेवणे व अनुभवास न येणारी ऐकीव माहिती न स्वीकारणे, लहान मुलास जमत नाही. मोठेपणी वैज्ञानिक दृष्टिकोणाचा उपयोग करुण जादू, चमत्कार, भूत इ. कल्पना तपासून अंतर्मनातील ही असत्ये दूर करण्याचे काम माणसे करत नाहीत. त्यामुळे अंतर्मनात ती माहिती तशीच साचून राहते.
विशिष्ट प्रसंगामधे बाह्य मनाला संवेदनांचे भास होतात त्यावेळी ही अंतर्मनातली माहिती त्या भासांना पूरक ठरते. भास खरा वाटू लागतो. भुताच्या रंग, रूप, ध्वनीविषयी जेव्हडे ऐकले असेल व तर्क न वापरता स्वीकारले असेल ते सर्व अशा वेळी अंतर्मन समोर मांडते.
प्रमाणिक माणूस त्या भासाला खरा अनुभव समजतो.
*~डॉ. प्रदीप पाटकर*
©महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
====================================================================================================

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...