"--------पण पुढे जर मोंगलाप्रमाणे इंग्रज लोक या देशातील प्रजेला छळतील तर विद्या शिकून शहाणे झालेले शूद्र अति शूद्र लोक पूर्वी शूद्रांत झालेल्या जहाँमर्द शिवाजीप्रमाणे आपले शुद्रादी अति शूद्रांचे राज्य स्थापन करुन अमेरीकेतील लोकांप्रमाणे आपला राज्यकारभार आपण पाहतील."
----ज्योतिराव फुले.
(संदर्भ: 'तृतीय रत्न', पृष्ठ क्र. ३१, सन १८५५. महात्मा फुले समग्र वाड़मय.)
कृपया वाचा व विचार करा. या वरुन स्पष्ट व स्वच्छ होते की, म्हातारीने कोंबडे झाकले होते तरी सूर्य उगवायचा राहिला नव्हता. भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय प्रजासत्ताकाचा आणि मानवी मुल्यें व मूलभूत अधिकारांचा आद्य भारतीय द्रष्टा, प्रणेता व उदगाता सन १८५५ मध्येच गर्ज़ला होता. त्यांसाठी झुंजला होता. आणि तेही जेव्हांकी भुरट्या स्वयंघोषित स्वराज्य/स्वातंत्र्य/देशभक्त/राष्ट्रवादी वाल्यांचा व मक्तेदारांचा जन्मही झाला नव्हता. तथाकथित स्वराज्य --स्वातंत्र्य --राष्ट्रभक्ती-- देशभक्ती-- राष्ट्रवादी असे शब्दांचे बुडबुडे उडविणारा तो साधारण माणूस नव्हता तर स्वराज्य, स्वातंत्र्य,राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद जन्मजातच रक्तात असलेला, त्यासाठी जगलेला आणि सर्व सामर्थ्यानिशी लढलेला तो संत तुकाराम आणि शिवछत्रपतींचा अस्सल वारसदार होता. भारताच्या राजकीय स्वातंत्र्याची पुर्वतयारी म्हणून बहुजनांना व स्रियांना शिक्षणाचे स्वातंत्र्य; अन्याया पासून, अज्ञाना पासून व अंधश्रध्दा पासून स्वातंत्र्य; दुष्ट धार्मिक व सामाजिक पध्दती व परंपरा पासून स्वातंत्र्य आणि तथाकथित उच्चवर्णियांच्या मानसिक, वैचारिक व बौद्धिक गुलामगिरीतून स्वातंत्र्य यांची त्यांनी पायाभरणी केली. त्यांचेच कार्य पुढे डॅा. बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्या महान वारसदाराने पुढे नेले, हे सर्वश्रुत आहे.

No comments:
Post a Comment