Flash

Wednesday, 19 April 2017

विवेकानंद

चमत्कारंवर आमचा मुळीच विश्वास नाही.
विज्ञान कार्यकारणभाव मानते.त्याचप्रमाणे धर्माचाही कार्यकारणभाव असतो.
विज्ञानाप्रमाणे धर्मातही चमत्कारांना स्थान नाही. धर्मग्रंथातील रूपखकथांना 
नंतर बेरकी लोक चमत्कार मानावयास लागले.मात्र अंधश्रद्धेपासून समाजाला 
मुक्त करणे ही प्राथमिक गरज आहे.
स्वामी विकेकानंद (15जानेवारी 1894)
दि.मेम्फिस कमर्शिअल्सच्या मुलाखती मध्ये.

जो धर्म, जो समाज स्त्रियांना समानतेचा हक्क देत नाही, तो धर्म, तो समाज
हा सैतानांचा बाजार आहे. पक्षी कधी एका पंखाने उडू शकत नाही.
अमेरिका संपन्न आहे, सुसंस्कृत आहे, श्रीमंत आहे कारण तेथील स्त्रिया
मुक्त आहेत. ..... ...

स्वामी विवेकानंद.
स्वित्झर्लंडमधून शिष्यांना पाठविलेल्या पत्रातून.



विवेकवादी विवेकानंद
विवेकानंदांनी चमत्कार नाकारलेत. विवेकानंदांनी 'दि मेम्फिस कमर्शियल' च्या १५ जानेवारी १८९४च्या अंकात एका मुलाखतीत सांगितले आहे:
" चमत्कारावर आमचा मुळीच विश्वास नाही." ते पुढे म्हणतात,
"विज्ञान कार्यकारणभाव मानते. त्याचप्रमाणे धर्मपण कार्यकारणभाव मानतात. त्यामुळे विज्ञानाप्रमाणे धर्मातही चमत्कारांना स्थान नाही. धर्मग्रंथातील रूपककथांना नंतर बेरकी लोक चमत्कार मानावयास लागले."
" जुन्या दंतकथांना रूपकांचा वेश देऊन त्यांना वेडपट महत्त्व दिल्याने अंधविश्वास व खुळचट समजुती बळावतात. हा मानवी समाजाचा दुबळेपणा आहे आणि भोंदू लोक त्याचाच फायदा घेऊन समाजाला नागवतात. कृपया कोणत्याही खुळचट समजुतीचे व अंधविश्वासाचे समर्थन करू नका. त्यांना विरोध करा." (२६ जुलै १८९५ रोजी बृहदारण्यक उपनिषदावर प्रवचन देताना)
अमेरिकेत पॅसिडोना येथे भाषण देताना ते म्हणाले:
"आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कतृत्वावर परिणाम करतात असे समजणे हा मानवी मनाला होणारा एक रोग आहे.
माणसाचे सामर्थ्य खच्ची करणारी यासारखी दुसरी भयावह गोष्ट नाही."
'विवेकवादी, विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद' या पुस्तकातुन
लेखक - दत्तप्रसाद दाभोळकर

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...