भगतसिंग म्हणतात की
मालवीय सारखे समाजसुधारक आम्हाला नकोत.
जे दिवसभर अस्पृश्यता निवारण करतात आणि सायंकाळी घरी आल्यावर स्वताच्या अंगावर गोमूत्र शिंपडून स्वताला पवित्र करून घेतात.
जे दिवसभर अस्पृश्यता निवारण करतात आणि सायंकाळी घरी आल्यावर स्वताच्या अंगावर गोमूत्र शिंपडून स्वताला पवित्र करून घेतात.
*संदर्भ - भगतसिंग : समग्र वाड:मय*
क्रांतिकारी तसेच तत्वचिंतक शहीद-ए-आझम कॉ. भगत सिंग यांना विनम्र अभिवादन!
💐

धर्म
...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही. आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सदगृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, “ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे. मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे. असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायम स्वरूपी कमकुवत बनविणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच कमकुवत बनविणे आहे.....
(शहीद भगत सिंह समग्र वाड्मय. पृ. २०७)
मित्रांनो,माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच मी नास्तिक बनलो आहे.ईश्वरावर विश्वास आणि रोजची देवपूजा व प्रार्थना जीला मी माणसाचे सर्वात स्वार्थी आणि खालच्या दर्जाचे काम मानतो ह्यामुळे मला मदत होईल,का माझी परिस्थिती आणखी बिकट होईल मला माहीत नाही.सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देणा-या नास्तिकांबद्दल मी वाचले आहे,म्हणूनच,अगदी वधस्तंभाच्या अंतिम घटकेपर्यंत मी ताठ मानेनं उभा राहु इच्छितो.ज्या दिवशी अशा मानसिकतेचे भरपूर रत्री-पुरुष आपल्याला आढळतील,की जे मानवजातीची सेवा आणि पिडीत मानवाची मुक्ती याखेरीज दुस-या कशाही करता आपले आयुष्य वाहुन घेऊ शकणार नाहीत तो दिवस मुक्तीच्या युगाची नांदी ठरेल.माणसाला फक्त आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवायला लावा आणि मग त्यानंतर त्याची सर्व संपत्ती व मालमत्ता खुशाल लुबाडा! अजिबात कुरकुर न करता तो त्यामध्ये तुम्हाला मदत करेल.
- भगतसिंग
No comments:
Post a Comment