Flash

Showing posts with label डॉ. आ. ह. साळुंखे. Show all posts
Showing posts with label डॉ. आ. ह. साळुंखे. Show all posts

Wednesday, 19 April 2017

"बळीवंश" डॉ. आ. ह.साळुंखे.

शिव-पार्वती :-बहुजनांना प्रेरक असे एक महान आद्य दांपत्य...!
शिव हे व्यक्तीत्व मूळचे आर्यांचे नाहीच हे बहुतेक सर्व संस्कृती अभ्यासकांनी मान्य केले आहे...सिंधुजन संस्कृतीत देखील शिवाचे अस्तित्व होते...!
शिव-पार्वती हे बहुजनांनाचे अतिप्राचीन काळातील अत्यंत गुणसंपन्न असे पूर्वज दांपत्य होय...त्यांच्या आधीचा इतिहास सापडणे अवघड आहे त्यामुळे एका दृष्टीने त्यांना तसे मानता येईल...!
आर्य आल्यानंतरच्या काळात त्यांचे दैवतीकरण करण्यात आले...शिवाला शंकर,महादेव,ईश,ईशान,रुद्र,भव,भर्व,सांब अशी विविध नावे देण्यात आली... पार्वतीला दुर्गा,उमा,चंडी
,काली,गौरी इत्यादी नावे प्राप्त झाली...!
शिव हा सदैव "असुरांचा पाठीराखा" होता आणि विष्णू नेहमी असुरांचा नाश करण्याच्या प्रयत्नांत होता असेच आपल्याला आढळते....!
वैदिकांनी नंतरच्या काळात काही ठिकाणी शिवाविषयी आदर व्यक्त केल्याची वर्णने पाहायला मिळतात तरीदेखील त्याच्याविषयी "पुन्हा पुन्हा अनादरही" व्यक्त केलेला दिसून येतोच...!
शंकराचे वर्णन करताना अनेकदा "भोळा सांब" हे शब्द वापरले जातात...शंकराचे एकूण चरित्र पाहता हे भोळेपण भोळसटपणाचे नसून त्याची निष्कपट मनोवृत्ती असल्याचे दिसून येते...!
वैदिक परंपरेने बहुतेकवेळा "शिवापेक्षा विष्णूला श्रेष्ठ" मानले आहे..विष्णूचे खोटे दहा अवतार लोकांच्या मनात जसे रुजवण्यात आले तसे शिवाच्या बाबतीत झाले नाही...!
शिवाला स्मशानात राहणारा,भूतां खेतांचा नेता...राक्षसांचा तारणहार म्हणूनच समोर आणले गेले आहे...यामागे "शिवाची कुचेष्टा" करणे हेच वैदिकांचे धोरण होते...!
वास्तवात शिवाने ज्यांना मदत केल्याची वर्णने आढळतात ते सर्व नाग,असुर,दैत्य,दानव,राक्षस,पिश
ाच,भूत,खेचर किंकर इत्यादि येथील मूळचे मानवसमूह असल्याचे दिसून येते...याचा अर्थ सरळ आहे...आर्य आणि अनार्य या लढाईत शंकर नेहमीच "अनार्य" लोकांच्या बाजूने उभा राहत होता...!
शंकराच्या गळ्यात सदैव "नाग" असल्याचे दिसून येते तर विष्णूचे वाहन गरुड आहे याचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घेतला तरी समजून येईल "नागांना मारणारा त्यांचे भक्षण करणारा" म्हणून विष्णुसाठी नागांचा शत्रू गरुड हे वाहन निवडले आहे...!
नागाचे स्थान शंकराच्या गळ्यात आहे,हे त्या दोघांमधील एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे...एखादी व्यक्ती प्रिय असली कि तिचा उल्लेख "गळ्यातील ताईत" म्हणून करतात...!
वासुकी हा नाग शिवभक्त आहे...शेष या नागाच्या हातात "नांगर आणि कोयता" असणे आणि शंकराचे वाहन नंदी असणे यावरून त्या दोघांचाही "कृषीसंस्कृतीशी" असलेला संबंध स्पष्ट होतो...!
अवैदिक गणपती शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख हे सूत्र आपण लक्षात घ्यावे लागेल..गणपती हे केवळ एका व्यक्तीचे वा देवतेचे नाव या दृष्टीने पाहणे यापेक्षा "गणपती" हे एक "अत्यंत महत्वाचे पद" म्हणून पाहणे हा खरा ऐतिहासिक दृष्टिकोन होय...काळाच्या ओघात शंकराचे वैदिकिकरण झाले त्यामुळे गणपतीचेही होणे स्वाभाविक आहे...!
"मूळ क्षेत्रपती" असणाऱ्या आपल्या अनार्य लोकांची आज झालेली सांस्कृतिक दुराव्यस्था कशामुळे झाली ते समजून घ्यावीच लागेल...!
आमच्या रक्तवहिन्यांमधून "असुर दैत्यांचे रक्त" वाहत असेल तर ते आम्ही का नाकारावे...? आपल्या देशात लहानपनापासून मुलांना औपचारिक शिक्षण देताना त्यांची मने आत्मद्वेषाने भरून टाकण्याचा उद्योग केला जातो...आपण आर्य आहोत अनार्य मागास होते म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असा खोटा अभिमान मनावर बिंबवला जातो...!
आज महाशिवरात्रीला शंकराचे स्मरण करताना स्वतःला प्रश्न विचारू आपण आर्य कि अनार्य...मग सगळेच आर्य आहोत तर अनार्य गेले कुठे...? स्वतःच्या नजरेने स्वतःचा इतिहास पाहूयात...!
सर्वच बहुजन दैवतांचा संदर्भ शंकराशी कसा काय जोडला जातो...जोतिबा,ख
ंडोबा,बिरोबा,भैरोबा,म्हसोबा आदी सर्वच देवांना "सदाशिवाचे रूप" का मानले जातेय याचाही मागोवा घेण्याचा संकल्प करूयात...!
स्वतःला स्वतःच्या महान इतिहासापासून अलग करून टाकण्याच्या "आत्मघातकी" विचारापासून मुक्त होण्याची गरज आहे...ज्या दिवशी आपण आपल्या नजरेने स्वतःकडे पाहू त्यावेळी आपली आपल्याला ओळख पटेल आणि तो दिवस आपल्या "आत्मज्ञानाचा" असेल...!
संदर्भ "बळीवंश" डॉ. आ. ह.साळुंखे.

विद्रोही तुकाराम डाॅ.आ.ह.साळुखे

वयाच्या विशीत असलेला तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला,हे खरे आहे.पण हा साक्षात्कार आध्यात्मिक स्वरुपाचा नव्हता,तर सामाजिक न्यायाच्या स्वरुपाचा होता.या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले,ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे होय.त्यांनी हे कृत्य संसाराला विटल्यामुळे नव्हे,तर संसाराला चिकटणारा शोषणाचा घटक छाटून टाकण्यासाठी केले,अन्नान्न दशा झाल्यामुळे ते ईश्वरभक्तीकडे वळले,हे काही लेखकांचे म्हणणेही खरे नव्हे.कारण,मी जनार्दनाकडे आलो,ते काही अन्नाला महाग झालो होतो म्हणून नव्हे,असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.मी वेदांचा अंकित नाही,भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो,सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रम्हाचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय,अशी भूमिका त्यांनी घेतली.सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा,वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे,गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय,असे प्रश्न त्यांनी विचारले.महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रम्हज्ञानी ब्राम्हण नव्हे,त्याने देहान्त प्रायश्र्चित घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही,असे त्यांनी म्हटले.
त्यांनी सोवळ्या-आेवळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या आणि जो परद्रव्य व परनारी यांच्या बाबतीत सोवळा असतो तोच खरा सोवळा,अशी नैतिक कसोटी सांगितली.जो जानवे व शेंडी यांच्याबरोबरचा संबंध तोडेल,त्याला कसलीही बाधा हाेणार नाही,असे म्हटले.विधिनि
षेध,यज्ञ,श्राध्द,पूजा,भविष्यकथन,शुभाशुभ,नवस,कौल,योग,समाधी,उपवास,तीर्थयात्रा,वनवास,गुहेतील ज्ञान, संन्यास,मोक्ष,यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्व असायचे सांगितले.त्यांचा ईश्वरही पारलौकिक मूल्यांवर नव्हे, तर माणूसकीवर आधारलेला होता.रंजल्या -गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो,तो खरा साधू आणि देव अशा साधूजवळच राहतो,असे त्यांनी म्हटले.देवपूजा करताना असे संत घरी आले असता देवांना सारून या संतांची पूजा करावी,असे त्यांनी लोकांना सांगितले.
थोडक्यात म्हणजे समाजव्यवस्थेला न्यायाचे अधिष्ठान देऊन तिचे निर्मलीकरण करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस युध्द केले आणि तत्वासाठी, काही मूल्यांसाठी स्वत:च्या हातांनी एका समाजाच्या वैराचा ज्वालामुखी स्वत:च्या उरावर आेढवून घेतला...!
संदर्भ: विद्रोही तुकाराम
डाॅ.आ.ह.साळुखे सर

Tuesday, 18 April 2017

गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे




*"हिंदू समाजाने ब्राह्मणांवर इतका विश्वास टाकला, परंतु त्याला ब्राह्मणांनी जो प्रतिसाद दिला, तो पाहिल्यावर मात्र मन कमालीचे उद्विग्न होऊन जाते. त्यांनी या विश्वासाचे उत्तर विश्वासघाताने दिले, हीच हिंदूंच्या धार्मिक जीवनाची एक महान शोकांतिका आहे.* ब्राह्मणांनी आपल्याच धर्माच्या अनुयायांना अक्षरश: ओरबडले. ज्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या हिताची व्यवस्था करण्याऐवजी फक्त स्वतःच्या वर्णातील लोकांचा फायदा पाहणारे नियम केले. *ब्राह्मणांखेरीज इतर लोक अज्ञानातच गुरफटलेले कसे राहतील, हे पाहिले. त्यांना अपमानित करणारे, लाचार बनवणारे नियम केले. त्यांच्यावर पिढ्यान् पिढ्या आपले वर्चस्व अबाधित रहावे, अशी व्यवस्था केली.* त्यासाठी सर्व प्रकारची नैतिकता धाब्यावर बसवली. माणूसकीला काळिमा फासणारे नियम केले. न्यायाची चाड बाळगली नाही. विवेकाचा अंकुश स्वतःला लावला नाही. खोटा इतिहास लिहिला. *आपल्याच धर्मातील असंख्य लोकांना त्यांच्या पराभवाचे क्षण हे उत्सव म्हणून साजरे करायला लावले.* सामान्य माणसांना दूर लोटले आणि जेव्हा गरजेपोटी त्यांना जवळ केले, तेव्हा आपल्या दुष्ट हेतूंच्या पूर्तीसाठी त्यांना वापरून घेतले. आपल्या दुष्कृत्यांचेही उदात्तीकरण करून घेतले. *स्वाभाविकच हिंदू धर्माला एक हृदयविदारक स्वरूप प्राप्त झाले. तो अंतर्बाह्य कलंकित झाला.*"

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*


"हिंदू धर्माचे एक महत्वाचे वैशिष्टय असे, की धार्मिक क्षेत्रातील सर्व बाबी हिंदूंनी आपल्याच धर्मातील ब्राह्मणांच्या स्वाधीन केल्या, धर्मग्रंथ लिहिणे, आपल्या आचाराचे नियम ठरवणे, कर्मकांड तयार करणे, व्रतवैकल्ये निर्माण करणे, धर्माचे तत्वज्ञान ठरवणे, पुराणकथा रचणे इ. प्रकार धर्माचे स्वरूप निश्चित करण्याची जबाबदारी, जवळजवळ पूर्णांशाने त्यांच्यावर सोपवली. त्यांच्यावर अपार विश्वास ठेवला. त्यांना पूज्य मानले. त्यांना देवांचे पृथ्वीवरचे केवळ प्रतिनिधीच नव्हे, तर साक्षात भूदेव म्हणजेच पृथ्वीवरचे देवच मानले. त्यांचा शब्द-न-शब्द झेलला. त्यांचा संदेश स्वीकारला. त्यांचा आदेश मानला. त्यांच्या आदेशानुसार आपल्या समग्र वर्तनाला आकार दिला. त्यांच्या कोणत्याही कृतीबद्दल शंका घेतली नाही. त्यांना आपल्या जीवनात जणू काही सर्वोच्च स्थान देऊन टाकले. त्या बाबतीत त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य बहाल केले."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*


*"बहुजन समाजातील लोक ब्राह्मणी वर्चस्वावर सामान्यतः खाजगीत किंवा क्वचित जाहीररित्याही टीका करतात, कुरकुरतात, निंदा करतात, नावे ठेवतात आणि प्रत्यक्ष व्यवहारात मात्र जीवनातील महत्वाचा असा कोणताही प्रसंग ब्राम्हण भटजीच्या उपस्थितीशिवाय पार पाडायला तयार होत नाहीत.* ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली त्यांच्या मनात भीतीची इतकी बीजे पेरली आहेत, की त्या बीजापासून अंकुरलेल्या अंधश्रद्धांचे पीक फोफावले आहे. *बहुसंख्य अब्राह्मणांच्या मनात ब्राम्हणधर्माची इतकी दहशत आहे, की ते त्याच्यापासून फारकत घेण्याची कल्पनाही करू शकत नाहीत.* त्या धर्माच्या नियमांचे काटे बोचून रक्तबंबाळ झालेले लोकही ते काटे छाटण्याऐवजी वा त्यांच्यापासून दूर होण्याऐवजी ते काटे आपल्या शरीरात घुसवून ठेवण्यासाठीच सदैव सज्ज असतात."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*


"आपल्या विरोधकाला कमालीचे अपमानित करायचे असेल, तर त्याच्या नात्यातील त्याची आई, बहीण, पत्नी अशा कोणा तरी स्त्रीच्या चारित्र्याविषयी अपशब्द उच्चारणे, प्रत्यक्षरीत्या तिच्या चारित्र्यावर घाला घालणे अथवा आपण तिचे चारित्र्य भ्रष्ट केल्याची शिवी हासडणे, असा प्रकार सामाजिक जीवनात आपल्याला अनेकदा आढळतो. आई-बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या असंख्य शिव्या याच मनोवृत्तीतून निर्माण झालेल्या असतात. *ब्राह्मणांनी वैशंपायनाच्या तोंडी घातलेली क्षत्रिय स्त्रियांच्या संबंधातील पूर्वोत्त कथा, हा त्यांनी क्षत्रियांना उद्देशून आईवरून दिलेल्या शिवीचाच प्रकार आहे. अशा प्रकारची शिवी ही वास्तव घटनेची द्योतक नसते, तर ते शिवी देणाराच्या मनातील विकृत विचाराचे चिन्ह असते.* ब्राम्हण ग्रंथकार स्त्रियांच्या आणि विशेषतः अब्राम्हण स्त्रियांच्या संदर्भात अशा प्रकारची विकृत स्वप्ने पुनःपुन्हा पहात आले आहेत. वस्तुस्थितीत जे घडू शकत नाही, ते जणू काही आपण खरोखरच करून दाखवले आहे, अशा फुशरक्याही त्यांनी मारल्या आहेत."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*


"अथर्ववेदातील नियमाचा आधार घेऊन प्रत्यक्ष व्यवहारात कर्मकांड कसे निर्माण करण्यात आले आहे, ते तुळशीच्या लग्नाचा विधी पाहिला असता स्पष्ट होते. तुळस म्हणजे जलंधर नावाच्या असुर सम्राटाची पतिव्रता पत्नी वृंदा होय. विष्णू मानला गेलेला कोणी तरी ब्राम्हण कपटाने तिचे शील भ्रष्ट करतो आणि त्यामुळे व्यथित झालेली वृंदा अग्नीत उडी टाकून आत्महत्या करते. पण आता *या पतिव्रता वृंदेचे म्हणजेच तुळशीचे दरवर्षी लग्न लावले जाते, हे तिचा पती जलंधर याच्याबरोबर नाही, तर तिचे शील भ्रष्ट करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाराबरोबर ! बहुजन समाजाने हे कर्मकांड आंधळेपणाने स्वीकारले आहे, पवित्र मानले आहे !*"

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*


"राम हे भारतीय समाजातील बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. पण मनुस्मृतीची निर्मिती झाली, त्या कालात त्याचे आरपार ब्राम्हणीकरण करण्यात आले. *बहुजन समाजाला प्रिय असलेल्या रामाचे नाव तर वापरायचे, पण त्याची प्रतिमा मात्र ब्राम्हणांना सतत शरण जाणारा राजा म्हणून रंगवायची, हे तंत्र वापरण्यात आले.* खरे तर रामाने सीतेचा त्याग केला नाही ब्राह्मणांच्या अकाली मरण पावलेल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी शूद्रतपस्वी शंबूकाची हत्या केली, या कथा मूळ रामायणात नव्हत्या. *मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्र यांच्या विरोधात उठाव केल्यावर ब्राह्मणांनी रामाच्या नावावर त्या घुसडल्या. स्वतः नामानिराळे राहून, रामाला बदनाम करून, त्यांनी स्वतःला हवी असलेली स्त्रीशूद्रविरोधी मूल्ये रामाच्या नावाखाली समाजात रुजवली.*"

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*

"रामाला ब्राम्हणपरायण ठरविण्यासाठी आणखी एक विषारी डावपेच करण्यात आला. तो म्हणजे त्याच्या जन्माच्या बाबतीत एक दुष्ट विचार समाजाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजा दशरथ हा अपत्यनिर्मितीला समर्थ नव्हता. याचा अर्थ राम वगैरे त्याचे औरस पुत्र नव्हते. त्याने केलेल्या पुत्रकामेष्टीच्या वेळी त्याने ऋष्यशृंग नावाच्या ब्राम्हण ऋत्त्विजाकडून आपल्या राण्यांच्या ठिकाणी या पुत्रांची निर्मिती करून घेतली. याचा अर्थ *रामाच्या जन्मविषयीही विकृत विचार महाभारतामध्ये प्रकट करण्यात आला.* अशा प्रकारच्या धादांत खोट्या गोष्टी रचणे, हा या ग्रंथकारांच्या दृष्टीने अगदी सहज, स्वाभाविक प्रकार होता. ब्राह्मणांनी रामाविषयी सांगितलेल्या या अनेक गोष्टी खोट्या आहेत, हे सत्य स्पष्टपणे उजेडात आले नसल्यामुळे भल्या-भल्या लोकांनी रामाविषयी भलेबुरे अनेक निष्कर्ष काढले आहेत."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*

"नियोगाचे नियम करताना ब्राह्मणांनी केलेली घुसखोरीही पाहण्यासारखी आहे. एखादा पुरुष निपुत्रिक मरण पावला किंवा तो हयात असूनही पुत्रनिर्मिती करण्यास असमर्थ असला, तर त्याचा पत्नीला आपद्धर्म म्हणून आपला दीर, स्वतःच्या वर्णाचा पुरुष वगैरेपासून पुत्रनिर्मिती करण्याची परवानगी होती. दिरापासून पुत्रनिर्मिती करण्याचा हा नियम तत्कालीन समाजाच्या दृष्टीने योग्य होता. कारण, तसे केल्यामुळे त्या कुटुंबाचा अंशच त्या स्त्रीच्या पुत्राच्या रूपाने म्हणून जन्माला येत असे. पण ब्राम्हणांचे तिथेही लक्ष गेले आणि त्यांनी नियोगासाठी नेमावयाच्या पुरुषांच्या यादीत दीर वगैरेंच्या बरोबरीने ब्राम्हण पुरुषांचाही अंतर्भाव केला. धर्मग्रंथामध्ये नियम घालण्याचा अधिकार त्यांनी किती अनैतिक पद्धतीने वापरला, हे यावरून स्पष्ट होते."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १९)*


"यजमानाने विशिष्ट यज्ञ करताना आपल्या प्रवरांचा म्हणजे पूर्वजांच्या नावांचा उच्चार करावा, असा एक नियम आहे. *यजमान ब्राह्मण असेल, तर त्याने आपल्या प्रवरांचा उच्चार करावा आणि यजमान क्षत्रिय असेल, तर त्याने मात्र स्वतःच्या प्रवरांचा उच्चार करण्याऐवजी आपल्या पुरोहिताच्या प्रवरांचा उच्चार करावा, असे धर्मशास्त्र सांगते.* हा नियम पुरोहितांच्या हीन मानसिकतेचाच द्योतक आहे, यात शंका नाही."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १९)*


"कामवासनेने प्रवृत्त झालेल्या ब्राह्मणाला ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चारही वर्णांतील स्त्रियांशी विवाह करता येतो, असे मनुस्मृती सांगते. क्षत्रिय पुरुष मात्र ब्राम्हण स्त्रीशी विवाह करू शकत नाही. विवाहामध्ये पाणिग्रहण म्हणजे वराने वधूचा हात हातात घेणे हा महत्वाचा विधी असतो. पण क्षत्रिय मुलीचा ब्राह्मण पुरुषाशी विवाह होतो, तेव्हा पाणिग्रहण विधी करू नये. त्या मुलीने ब्राम्हण पुरुषाच्या हातातील बाण आपल्या हाताने पकडावा, असेही मनुस्मृती सांगते. याचा अर्थ ब्राम्हण पुरुष क्षत्रिय स्त्रीशी जो विवाह करतो, तो खराखुरा विवाह नसतो. एक प्रकारे ती त्याची रखेल बनते. त्यामुळे ब्राम्हणाच्या ब्राम्हण पत्नीला धर्मकृत्यात जे अधिकार असतात, ते या क्षत्रिय पत्नीला नसतात."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २०)*


"शतप्रत ब्राम्हण म्हणते, ब्राम्हण विचार करतो आणि क्षत्रिय (त्यानुसार) कृती करतो. ब्राह्मणाला राजा वा क्षत्रिय नसला, तरी काही दोष नाही. अर्थात, त्याला राजा मिळाला, तर त्याचा लाभ होईल परंतु क्षत्रियाने ब्राह्मणाविना राहणे, हा मात्र दोष होय. *ब्राम्हण मित्राच्या आदेशाविना तो जे काही कर्म करतो, ते असफल होते. म्हणून कोणतेही कर्म करू इच्छिणाऱ्या क्षत्रियाने ब्राह्मणाकडे गेलेच पाहिजे. कारण, त्यात ब्राम्हणाच्या आदेशानुसार केलेले कार्य सफल होते.*

क्षत्रियाने विचार करण्याच्या भानगडीत पडू नये, असा संकेत या धर्मग्रंथाने क्षत्रियांना दिला आहे. *आपली बुद्धी स्वतंत्रपणे वापरू नका, आपले शत्रुमित्र कोण ते स्वतः ठरवू नका, आपल्या धर्माचे स्वरूप स्वतः ठरवू नका, थोडक्यात म्हणजे सर्व बाबतींत आमच्यावर विश्वास ठेवा, असे त्यांनी त्यांना सांगितले आहे. एखादया समाजाला त्याची बुद्धी गंजत ठेवायला सांगणे, हा त्याला गुलाम बनवण्याचा प्रकार नव्हे काय?"*

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २२)*


"संत नामदेवांसारख्या महामानवाला मंदिरात कीर्तन करीत असताना हिंदू धर्माच्या मुखंडांनी शूद्र म्हणून मंदिरातून हाकलून दिले. उदात्त जीवनमूल्यांच्या क्षेत्रात मोठी परिपक्वता गाठलेल्या या महापुरुषाला 'कच्चे मडके' ठरविणाऱ्या खोटारड्या कथा त्यांनी प्रसृत केल्या. संत ज्ञानेश्वरांसारख्या कोवळ्या भावंडांचा अपार छळ केला. संत तुकारामांसारख्या महात्म्याची गाथा बुडवली. शूद्र असल्यामुळे धर्माविषयी काही लेखन करण्याचा, विचार मांडण्याचा त्यांना अधिकार नाही, असे म्हणून त्यांना छळ-छळ-छळले. पुढे राजर्षी शाहू महाराज बहुजन समाजाच्या उद्धारासाठी जीवाचे रान करीत आहेत, हे पाहून ब्राह्मणांचा इतका जळफळाट झाला, की त्यांनी या युगप्रवर्तक राजाला अपार मनस्ताप दिला, जीवघेण्या यातना दिल्या.

अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर आणि कुटील अशा परिस्थितीने घेतल्यानंतरही बहुजन समाज त्या परिस्थितीमधून निघणाऱ्या स्वाभाविक निष्कर्षाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवत नाही, हे पाहून माझा जीव कासावीस होतो. *संत तुकारामांविषयी जर आपल्या मनात आत्यंतिक आदर आहे, तर त्यांची गाथा बुडवण्यास कारणीभूत होणारे धर्मग्रंथ हे आपले कसे काय असू शकतात, हे मला समजत नाही.*"

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २४)*


"छत्रपती शिवाजी महाराज हे केवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व ! पराक्रमी, कर्तृत्वसंपन्न, सद्गुणी, न्यायप्रिय- भाषेतली विशेषणे कमी पडावीत, एवढे विलक्षण माहात्म्य असलेला महापुरुष. शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी स्वतःचा जीव वेळोवेळी मृत्यच्या दाढेत घालून ज्यांच्या धर्माचे रक्षण केले, त्यांनीच त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला, त्यांना वैदिक मंत्रांचा अधिकार नसल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील एकही वैदिक पुरोहित त्यांच्या राज्याभिषेकासाठी पुढे आला नाही. त्यांनी उरावर मृत्यू झेलून उभारलेले राज्य गिळंकृत करण्यासाठी मात्र ब्राह्मणांनी जीवाचा आटापिटा केला, त्याच हेतूने अत्यंत कर्तबगार अशा छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली ठरवले, त्यांना पकडून मोगलांच्या ताब्यात देण्याची कटकारस्थाने केली, अपप्रचाराच्या जोरावर त्यांची आत्यंतिक बदनामी केली.

*छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण पुनःपुन्हा नतमस्तक व्हावे, इतके युगप्रवर्तक कार्य त्यांनी केले आहे. मग ज्या धर्माच्या प्रमुखांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, तो धर्म आपला कसा मानता येईल, हे ही मला कळत नाही. महाराज जर हिंदू होते, वेद हे जर हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत, तर महाराजांना त्यांच्या स्वतःच्याच धर्मग्रंथाचे मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही, असे म्हणणारे लोक आपलेच धर्मबांधव आहेत, असे मानणे, हा एक प्रकारच्या गुलामगिरीचाच भाग ठरत नाही का ?*"

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २४)*


"आज आमच्या तरुण मुलांना 'गर्व से कहो हम हिंदू हैं' असं म्हणायला शिकवले जात आहे. आम्ही हिंदू आहोत, म्हणजे नेमके कोण आहोत? हिंदुत्वाने आमच्या वाट्याला काय दिले आहे ? आम्ही कितव्या दर्जाचे हिंदू आहोत ? ज्ञानेश्वर हिंदू नव्हते काय ? मग त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ का करण्यात आला ? छळ करणारे कोणी हिंदूद्वेष्टे अहिंदू होते, की हिंदुत्वाचा बुरखा घेतलेले ब्राह्मण होते ? संत नामदेव जिथे किर्तन करीत होते, ते हिंदूंचेच मंदिर होते ना ? आणि त्यांना तिथून हाकलणारे कोण होते ? आम्ही कशाकशाचा अभिमान बाळगायचा ? हिंदू धर्मग्रंथांच्या आधारे संत तुकारामांची गाथा बुडवली गेली, त्याच ग्रंथांच्या आधारे शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला, अशा कृतींचा अभिमान बाळगायचा ? ज्यांना आपले स्वत्व शाबूत ठेवून माणूस म्हणून जगायचे आहे, त्यांनी या सगळ्याचा शांतपणे विचार करावा."

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २५)*


*"ब्राह्मणांनी अब्राह्मणांच्या वाट्याला जे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन दिले आहे, ते त्यांना हिंदू धर्माचे दुय्यम अनुयायी बनवणारे आहे. त्यांच्याकडे प्रथम दर्जाची आणि प्रसंगी ब्राह्मणांपेक्षाही सरस गुणवत्ता असूनही त्यांना सुमार ब्राह्मणांपेक्षाही हीन मानले जाते.* सामान्य कुवतीच्या ब्राह्मणांनाही जी प्रतिष्ठा आणि संधी विनासायास मिळते, ती प्रतिभाशाली अब्राह्मणांना अनेकदा आयुष्यभर कष्ट करूनही मिळत नाही. ब्राह्मणांनी आपल्या धर्मशास्त्रांतून केलेले असंख्य नियम अब्राह्मणांच्या काळजावर घाव घालणारे आहेत, त्यांचा कमालीचा अपमान करणारे आहेत, त्यांच्या स्वतःच्या मनात आत्मतुच्छतेची भावना निर्माण करणारे आहेत. थोडक्यात म्हणजे या नियमांच्या आधारे ब्राह्मणांनी अब्राह्मणांना आपले गुलाम बनवण्याची यंत्रणा उभी केली आहे. *ब्राह्मणांनी अब्राह्मणांविषयी जी हजारो विषारी वचने लिहून ठेवली आहेत, तशा प्रकारचे केवळ एक वचन अब्राह्मणांनी ब्राह्मणांविषयी उच्चाटले, तर ब्राम्हण लोक लाख-लाख डंख मारतील, पिसाळून उठतील, त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल.* हा अपमान पचवणे त्यांना फार फार जड जाईल.

मग अब्राह्मणांनी मात्र ब्राह्मणांनी केलेला अपमान निमूटपणे का बरे पचवावा ? स्वतंत्र मानव म्हणून स्वाभिमानाने जगण्याची पुरेपूर क्षमता असतानाही ब्राह्मणांचे गुलाम म्हणून का जगावे ? संपूर्ण इतिहासामध्ये ब्राह्मणांनी धर्माच्या आधारे अब्राह्मणांना गुलाम बनवण्याची पराकाष्ठा केली आहे. *आता अब्राह्मणांच्या पुढे स्पष्ट असे दोन पर्याय आहेत - ब्राह्मणांचे गुलाम म्हणून लाचारीने जीवन जगायचे, की स्वतंत्र मानव म्हणून फुललेल्या स्वत्वाचे जीवन जगायचे ? ब्राह्मण जर अब्राह्मणांना गुलाम मानत असतील आणि त्यासाठी धर्माचे हत्यार वापरत असतील, तर गुलाम बनवू पाहणाऱ्या ब्राह्मणांचा आणि अब्राह्मणांचा धर्म एकच कसा असू शकेल ?"*

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २५)*


"धर्म एक कुणाचा असतो ? ज्यांना परस्परांविषयी प्रेम आहे जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, त्यांचा धर्म एक असू शकतो. ज्यांच्या आदराची स्थाने आणि अभिमानाचे विषय एकच असतात, त्यांचा धर्म एक असतो. ज्यांची जीवनमूल्ये समान असतात आणि ज्यांना समान समान धार्मिक अधिकार प्राप्त झालेले असतात, त्यांचा धर्म एक असतो. अशा प्रकारच्या कसोट्या लावल्या, तर *ब्राह्मणांचा आणि अब्राह्मणांचा धर्म एकच असू शकत नाही, हे हजारो पुराव्यांनी सिद्ध करता येते.*

*धर्माच्याच आधारे शोषण करणारा वर्ग आणि धर्माच्याच कारणामुळे शोषणाला बळी पडलेला वर्ग, यांचा धर्म एकच कसा काय असू शकेल ? त्यांचा धर्म एक मानणे म्हणजे शोषणव्यवस्थेला मान्यता देणे होय.* यामध्ये शोषकांचा फायदा आहे आणि त्यामुळे ती व्यवस्था टिकवण्याचा ते पराकाष्ठेचा प्रयत्न करणार, हे स्पष्ट आहे. पण जे शोषणाला बळी पडले आहेत, त्यांनी ती व्यवस्था टिकवण्यासाठी जीवावर उदार व्हावे, याला गुलामगिरी म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे ?"

*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २९)*

Monday, 17 April 2017

मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे


सामाजिक चळवळ २ पद्धतीने पुढे न्यावी...
१ ज्यांनी इतिहास चुकीचा लिहिला त्यांचे माप त्यांच्याच पदरात घालणे योग्य... पण ३६५ दिवस तेच करणे योग्य नाही.
२ तपासल्याशिवाय काही घ्यायचं नाही असं बुद्धांनी सांगितले आहे. तेव्हा प्रबोधनाचा प्रवास डोक्यापासून ह्रदयाकडे नव्हे तर ह्रदयाकडून डोक्याकडे झाला पाहिजे. बुद्धांनी ज्यासाठी हयात झिजवली त्याचसाठी आजही भांडतोय आपण. समता स्वातंत्र्य आणि बंधुता याबाबत आजही परिस्थिति जैसे तेच आहे.

व्यूहरचना अशी करा की, जनसामान्यांच्या मनामध्ये जागा निर्माण झाली पाहिजे. समाजात १०℅ शोषक ९०℅ शोषित आहेत. त्यातले ८९℅ देवांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. जर तुम्ही कपाळावर मी ईश्वर मानत नाही अस लिहून प्रबोधन करायला गेलात तर त्यांच्या घराचेच नव्हे तर मनाचे ही दरवाजे आपल्याला बंद होतात.
चळवळी का फसतात? एक महत्वाचे कारण, थेट हल्ल्यामुळे...
समजा एखादा वर्षात ६ सत्यनारायण घालतो. तुमच्या प्रबोधनाने त्याने प्रमाण कमी केले व तो आता २ सत्यनारायण घालतो. तर ते चळवळीचे यश माना. बदल एका रात्रीत होत नाहीत.
बाहेरून लादलेलं गोंदण हे बाहेरच असलं तरी खरवडून काढताना यातना होणारच, पण जर ते काम कुशलतेने केले तर त्याची होणाऱ्या त्रासाला दोन हात करण्याची मानसिकता तयार होते. लक्षात घ्या.. मुकाट नसावे तसेच मोकाट ही नसावे.
* प्रश्न विचारणारांवर हल्ले करु नयेत. त्यांचे समाधान होईपर्यन्त शांतपणे उत्तरे द्यावित.
* जिभेच्या खेळाने संस्कृती उभी राहत नाही.
* टोकदार' निरिश्वरवाद नको...
"जो व्यक्ती स्वत: ईश्वराचं अस्तित्व मानत नसेल, पण ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्‍या परंतु शोषण, विषमता वगैरेँना बळी पडलेल्या लोकांमध्ये वावरताना आपल्या निरिश्वरवाद 'टोकदार' बनवून, त्याच्या पात्याला धार लावून, तो समाजात परिवर्तन घडवू शकणार नाही. आपल्या कपाळावर ठसठशीतपणानं निरिश्वरवादाचा फलक लावून, तो लोकांमध्ये वावरु लागला, तर ज्यांच्यामध्ये परिवर्तन करायचं त्यांच्या घरांचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद होतील, मग मनाचे व बुद्धीचे दरवाजे उघडणं तर फार दूरची गोष्ट झाली. म्हणुनच त्यानं स्वत:चा निरिश्वरवाद वा टोकाची तत्सम इतर मतं काही अपवादात्मक प्रसंग वगळता स्वत:च्या उंबरठ्याच्या आत ठेवुन परिवर्तनाच्या क्षेत्रात उतरायला हवं. हा दुटप्पीपणा नव्हे, की डावपेच नव्हे. ही तडजोड नव्हे, कि फसवणुक नव्हे. हा जिव्हाळा आहे, ही आत्मीयता आहे आणि या जिव्हाळ्याचं, या आत्मीयतेचं सर्वोच्य शिखर आहे करुणा !"
विचार- डॉ. आ.ह.साळूंके
"मन निरभ्र व्हावं या पुस्तकातून"



"पल्या पिल्या श्वासाच्या वेळी पुढचं सगळं जीवन अज्ञातच असतं. जणू काी एक कोडं, एक रस्यच. कधी कधी वाटतं, े जीवन म्णजे एक गुंता. पण युष्यभर तो सोडवत बसायचं. काळ जसजसा पुढं सरकेल, तसतसा तो गुंता थोडा-थोडा सुटत जातो. अर्थात, तो सोडवण्याचा प्रयत्न शाणपणानं केला तर ! नाी तर उलटंी ोऊ शकतं, त्याची गुंतागुंत अधिक वाढूी शकते. परंतु सामान्यतः काळाच्या ओघात त्याची गुंतागुंत कमी ोत जाते, असं पण म्णू शकतो. काळ जातो, तसं जीवनाचं रस्य अधिकाधिक उलगडू लागतं. परंतु े रस्य उलगडण्याच्या प्रक्रियेती एक व्यथा े, एक वेदना े. बुतेकांच्या बाबतीत जीवन जेव्ा खऱ्या अर्थानं थोडं थोडं कळायला लागतं, तेव्ा ते संपत लेलं असतं ! 

या वेदनेवर उपाय जरूर े - त्वरा!

त्वरा ा तो उपाय ोय. *जीवन समजून घेण्यासाठी णि चांगल्या रीतीनं जगण्यासाठी जितक्या लवकर सरसावता येईल, जितकी त्वरा करता येईल, तितकं ते अधिक फळ देईल, त्याचा स्वाद अधिक काळ चाखता येईल. ी त्वरा म्णजे उतावीळपणानं, अपुऱ्या तयारीनिशी केलेली घाई नव्े, तर परिपक्व कलन णि अचूक निर्णयशक्ती यांच्या धारे केलेली कृती ोय, े मात्र विसरता कामा नये.*"


*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ७)*




"जीवन लान-सान गोष्टींपासून ते अतिमत्वाच्या घटनांपर्यंत असंख्य घटकांनी बनलेलं असतं. स्वाभाविकच, पल्याला खूप जाणायचं असतं. कसं बोलावं-कसं वागावं इथंपासून ते यश णि नंद यांच्यामध्ये प्राधान्य केव्ा णि कुणाला द्यावं, या गोष्टींपर्यंत नाना गोष्टी योग्य रीतीनं जाणल्या, तरंच जीवन सफल ोतं. धन कसं कमवावं, त्याचा विनियोग कसा करावा, मित्र कसे जोडावेत, शत्रूंना कसं ाताळावं, नाती कशी जपावीत, इतरांना कसं फुलवावं, अपयश कसं पचवावं, उत्कर्षाच्या वेळी विनम्र कसं असावं, अशा लाख लाख गोष्टी जाणायच्या असतात. पण यांपैकी जितक्या जास्त गोष्टी जितक्या लवकर णू, तितकं छान ! जगताना चुकाी ोतात. पण बुतेक वेळा त्या दुरुस्त करण्याची संधीी मिळते. ी संधी मात्र वाया घालवू नये स्वतःला सावरण्याची संधी मिळाली, की जरूर सावरावं. अशी संधी मिळाली नाीच, तर चुकांच्या परिणामांना शांतपणे समोर जावं. त्या परिणामांना भोगूनच त्यांच्यावर मात करावी. मात्र झालेल्या चुकांबद्दल, भोगलेल्या परिणामांबद्दल युष्यभर कुरकुरत बसू नये. शिळ्या झालेल्या गोष्टींसाठी पल्या ताज्या श्वासांची प्रसन्नता गमावू नये."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ७)*




"माणसाचं पल्या भूमीशी, पल्या मातीशी असलेलं नातं पल्या ईबरोबरच्या नात्यांइतकंच ळुवार णि घट्ट असतं. ईप्रमाणंच मातीशीी पली एक नाळ असते. जगण्याच्या धडपडीत माणूस पल्या भूमीपासून कितीी दूर गेला, तरी त्याच्या त त्याच्या जन्मभूमीचा गंध दरवळत असतोच. *पल्याकडच्या दर्शनांमधे प्रत्येक माभूताचा स्वतःचा एक गुणधर्म मानलेला े. या दर्शनांच्या मते पृथ्वीचा गंध ोय. पलं शरीर माभूतांनी बनलेलं असतं णि त्यामध्ये पृथ्वीचा वाटा मत्वाचा असतो. 'पृथ्वीपासून बनलेलं' या अर्थानंच शरीराला 'पार्थिव' म्णतात.* याचा अर्थ पण िंडत-फिरत जगातल्या कुठल्याी बिंदूवर पोचलेलो असलो, स्थिरावलेलो असलो, तरी पल्या मातीचा गंध पल्या अस्तित्वात असतोच."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ९)*




"धरतीशी बोला णि ती तुम्ांला शिकवेल ! अर्थाच्या किती मोक लावण्यानं नटलं े, े वाक्य ! पण पल्या भूमीशी, पल्या मातीशी बोलू शकतो, े साधं सत्य पण कित्येकदा विसरूनच गेलेलो असतो. *जगभरच्या वस्तू स्तगत करायच्या णि त्यांचा मालक म्णून मिरवायचं, या नादात पण पल्या अस्तित्वाचा धार असलेल्या देखण्या सृष्टीलाच विसरून गेलेलो असतो.* खरं तर पण तिला डोळे भरून पाण्यासाठी, तिचा स्पर्श पल्या अस्तित्वात सामावून घेण्यासाठी, तिचा गंध पल्या रक्तात ताजा करण्यासाठी तिच्याशी शब्दांच्याी पलीकडचा एक संवाद करू शकतो. ती देखील शब्दांसाठी अडून न बसता, ईनं बोटाला धरून चालायला शिकवावं त्याप्रमाणं पल्याला मूकपणे खूप काी शिकवून जाते. पल्या प्रत्येक श्वासाला एक वेगळी दिशा देते. ृदयाच्या प्रत्येक स्पंदनाला एक नवा शय देते. खरं म्णजे कसं जगावं, कशासाठी जगावं णि कुणासाठी जगावं, ते शिकवते. ईच्या मांडीवर डोकं ठेवून निर्धास्तपणे झोपल्यावर साऱ्या चिंता विरून जाव्यात णि जीवाला विसावा मिळावा, तसा विसावा तिच्याी स्पर्शानं मिळतो."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : १०)*




"ज्याच्या डोळ्यांत अश्रू उभे रातात, त्याला स्वतःलाी पल्या अश्रूंचं नेमकं कारण कळतंच असं नाी. ते इतके उत्स्फूर्त असतात, की निदान अश्रूंच्या क्षणी तरी त्याला त्यांच्या कारणाचं सुस्पष्ट भान असण्याची शक्यता नसते. *स्वतःच्या अश्रूंचा अर्थ स्वतःपासून खूप अलिप्त झाल्याखेरीज स्वतःलाच नीट कळू शकत नाी, े एक प्रकारे अश्रूंचं गूढ सौंदर्यच म्णायला वं.*"



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : १२)*




"अश्रूंचा अपमान ा निसर्गाच्या एका मान निर्मितीचा अपमान ोय. ज्यांची  मनं विकारानं गढूळ वा बोथट झालेली असतात, अशी काी माणसं दुसऱ्यांच्या अश्रूंची टवाळी करतात. या लोकांना त्यांनी स्वतः ढाळलेले अश्रू ठवत नाीत, पण इतरांचे अश्रू पाून मात्र ते त्यांना घाबराट वा रडके ठरवतात. सगळेच अश्रू 'रडण्या'चे नसतात, े समजण्याचा त्यांचा वाकाच नसती, त्यांच्याकडं तेवढी सृदयताी नसते.



पली जात पराक्रमी असल्यामुळं पल्या जातीच्या माणसाचे डोळे कधी पाणावणं शक्यच नाी, अशा विचित्र वल्गना करणाऱ्या लोकांना अश्रूंचा किंबुना जीवनाचाच अर्थ कळलेला नसतो. खरं तर माणसानं इतरांच्या णि स्वत:च्याी अश्रूंचा दर केला पािजे. त्यांचे उपकार मानले पािजेत. त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पािजे. पण तसं करू शकलो नाी, तर अश्रू ढाळणारी व्यक्ती कलंकित ोत नाी, पण पण मात्र मनुष्यत्वाला मुकतो."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : १३)*




"संवेदनशील व्यक्तीचे पाणावलेले डोळे े जगातील एक मान तीर्थक्षेत्र णि त्या डोळ्यांतील अश्रू े जगातील एक अत्यंत पवित्र-पावक तीर्थजल ोय ! ज्याला े उमजलं, त्याचं काळीज नक्कीच जिवंत असतं!"



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : १३)*




"पला ज्या माणसाशी संपर्क ला असेल, त्याला समजून घेण्याचं काम कौशल्याने णि विवेकानं करणं वश्यक असतं. 'सब घोडे बारा टक्के' अशा पद्धतीनं सर्वांशी वागून चालत नाी, सरसकट सर्वांना एक नियम लावता येत नाी. माणसं वेगवेगळ्या परिस्थितीतून लेली असतात, वेगवेगळ्या संस्कारातून लेली असतात, वेगवेगळ्या स्वभावाची असतात, वेगवेगळ्या परिस्थितीत अडकलेली असतात. म्णूनच प्रत्येकाशी संवाद साधण्याची पली पद्धती वेगवेगळी असली पािजे. केवळ एक माणूस घेतला, तर तोी सतत बदलत असतो. मी काल जसा ोतो, तसा ज नसतो. काी क्षणांपूर्वी जसा ोतो, तसा या श्वासाच्या क्षणी नसतो. जच्या 'मी'ची प्रतिमा कालच्या 'मी'च्या चौकटीत तंतोतंत बसत नाी. माणसामध्ये सातत्यानं ोणारं े परिवर्तनी ध्यानात घेऊनच प्रसंगानुरूप कार्यपद्धती स्वीकारली पािजे. जीवन यशस्वी करण्यासाठी पली संपर्कशैली अधिकाधिक कुशल णि निर्दोष बनविली पािजे. सामाजिक परिवर्तनाचं उद्दिष्ट बाळगून कार्य करणाऱ्या लोकांनी तर े वर्जून ध्यानात घ्यायला वं."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : १९)*





"पल्या शरीरात बाेरून एखादा अनिष्ट पदार्थ घुसू लागला, तर त्याला रोखून धरणं, ा पल्या शरीराचा स्वभावच े. एखादा रोगजंतू शरीरात घुसू लागला, तर पल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच त्याच्यावर तुटून पडतात. अन्न अन्ननलिकेतून जात असताना त्याचा एखादा कण वाट चुकून श्वासनलिकेकडं वळला, तरी देखील त्या कणाला बाेर ढकलण्यासाठी पल्याला ठसका लागतो. निसर्गानं पल्या शरीराला ी मोठी विवेचक णि संरक्षक देणगी दिली े. पण पल्या बुद्धीला णि मनाला मात्र असा ठसका पोप लागत नाी. म्णूनच, नको असलेल्या गोष्टी बुद्धीत शिरू लागल्या, तर पल्या बुद्धीला ठसका लागावा, याचे संस्कार स्वतःवर करणं गरजेचं असतं."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : २६)*




"पल्या विशिष्ट लाभासाठी लोकांची दिशाभूल करणं, ाच ज्यांचा ेतू असतो, त्यांना दाी दिशा मोकळ्या असतात. त्यांच्या दृष्टीनं पथ्यापथ्याचा प्रश्नच नसतो. एका बाजूनं सत्य लपवणं, विपर्यस्त करणं व नष्ट करणं णि दुसऱ्या बाजूनं असत्याला संरक्षण देणं, त्याला प्रोत्सान देणं वा त्याचा फैलाव करणं, ा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रमच असतो. त्यांच्या अशा प्रयत्नांच्या ारी जाऊ नये, ी पल्या चित्तवृत्तीला योग्य वळण लावण्याचा मत्वाचा भाग ोय. शिवाय, त्या लोकांनी स्वीकारलेल्या मार्गांचा अवलंब करता कामा नये, यावरी पण ठाम असायला वं."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : २७)*



"एखाद्या ग्रामपंचायतीत वा नगरपालिकेत निवडून लेल्या सदस्याचं अभिनंदन करण्यासाठी चौकाचौकांतून फलक लावताना पण त्याच्यासाठी 'क्रांतिकारक, युगप्रवर्तक' अशी विशेषणं लावली तर ज्यांनी खरोखरच मान क्रांती केली े वा युगप्रवर्तक कार्य केलं े, त्या मामानवांची वर्णनं करताना कोणती विशेषणं लावणार ? नगरसेवक वगैरेंचं कार्यी पापल्या परीनं मत्वाचंच असतं, तरीी कोणती विशेषणं कोणाला लावायची, याचं भान असायलाच वं."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : २९)*




"बुद्धांनी सगळी माणसं समान ेत ी भूमिका मांडण्यासाठी केलेले असंख्य युक्तिवाद णि प्रयोग जसे प्रसिद्ध ेत, तशीच केलेली प्रत्यक्ष कृतीी विख्यात े. तेव्ापासून जतागायत समतेचा ग्र धरणारे लोक जात्यंत व्ावा म्णून झगडत ेतच. पण इथंच एक मत्वाचा प्रश्न निर्माण ोतो. बुध्दांनंतर अडीज जार वर्षं गेल्यानंतरी पल्याला जर त्याच गोष्टीसाठी झगडावं लागत असेल, तर ी समस्या फार गंभीर े, चुटकीसरशी सुटणारी नाी, याकडं पण दुर्लक्ष करू शकत नाी. ता, ी समस्या अडीज जार वर्षं टाकलेली असेल, तर पण तिची कारणमीमांसा काळजीपूर्वक णि धैर्यानं केली पािजे. अर्थात, ती सोडवण्याचे उपाय जुजबी असून चालणार नाीत. त्याचबरोबर, प्रत्यक्ष वास्तवाची उपेक्षा करून डोळ्यांसमोर नुसते स्वप्नाळू दर्श ठेवल्यामुळंी पल्या पदरात काी पडणार नाी."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३२)*



"जातीचा अंत व्ावा, े पलं देखणं स्वप्न जरूर े, पण ते फार दूरचंी े णि सजसाध्यी नाी. म्णून त्या दूरवरच्या ध्येयाकडं जाण्याच्या वास्तव प्रवासावर धी लक्ष केंद्रित करावं, ेच मला अधिक मत्वाचं वाटतं. *ंतरजातीय विवा ा नक्कीच एक विधायक मार्ग े. पण तोच सर्वोत्तम वा एकमेव मार्ग े असं मानणं उचित नव्े. तो जात्यंत घडवण्याचा मखास णि प्रभावी मार्ग े, असंी नाी. तो अनेक मार्गांपैकी एक मार्ग े णि त्याला अनेक मर्यादा ेत, याचं भान ठेवायला वं.* प्रेमापोटी झालेल्या ंतरजातीय विवााचं श्रेय जात्यंताच्या चळवळीकडं जात नाी. शिवाय, पल्याला विचार काी मोजक्या व्यक्तींचा करायचा नसून समग्र समाजाचा करायचा े, ी विसरता कामा नये. मोजक्या व्यक्तींच्या वर्तनाचाी संपूर्ण समाजावर परिणाम ोतो, े खरं े. त्यांच्या वर्तनामुळं काी वाटा मोकळ्या ोतात, काी दिशा खुल्या ोतात, यांत शंका नाी. पण एकूण समाजातील त्यांच्या अत्यल्प संख्येचा विचार करता अडीज-तीन जार वर्षांचं दुखणं केवळ अशा कृतीमुळंच चुटकीसरशी दूर ोईल, असं मानता येत नाी. असं असलं, तरी असा विवा करणाऱ्यांना प्रोत्सान, पाठबळ णि संरक्षण देण्याची जबाबदारी उचलायला वी. अर्थात, ज्यांनी असा विवा केला ते तेवढ्याच कारणानं पोप समतावादी णि ज्यांनी केला नाी ते विषमतावादी अशी उथळ मतं मांडणं, ी जात्यंतासाठी समाजमन तयार करण्याचा सम्यक मार्ग नव्े, असं मला वाटतं. शिवाय, असा विवा करणाऱ्यांनाी समंजसपणानं णि विवेकानं पला विवा तडीला नेणं मत्वाचं मानलं पािजे. अन्यथा पल्या उद्दिष्टाची पीछेाट ोण्याचा धोका संभवतो."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३३)*




"प्रत्येक जातीच्या अंतर्गत असलेल्या पोटजाती मोडीत काढण्याचं काम झालं, तरी मोठी मजल मारल्यासारखं ोईल. त्याबरोबरच अथवा त्यानंतर सांस्कृतिक वगैरे दृष्टींनी एकमेकींना अगदी जवळ असलेल्या जातींनी परस्परांमध्ये सर्वार्थानं मिसळून जाण्याची पावलं उचलावी. े सर्व करीत असताना प्रत्येक जातीमधील समंजस लोकांनी दुसऱ्या जातीमधील लोकांशी जिव्ाळ्याचा संपर्क ठेवणं णि शक्य त्या प्रमाणात पल्या जातीमध्ये णि पल्या संपर्कातील जातीमध्येी विधायक प्रबोधन करणं, असा दुेरी उपक्रम चालू ठेवावा. लोकांचं अज्ञान, गैरसमज, जातीय अंकार, चुकीच्या धर्मतत्वांचा पगडा इ. गोष्टी दूर करण्यासाठी कोणतेी विश्वासार् प्रयत्न न करता त्यांच्यावर अचानक जात्यंताच्या संकल्पनेचा मारा करणं वा जाती पाळल्याबद्दल त्यांची निंदा करून त्यांना दूर लोटणं, अशी कृती पल्याला जात्यंताच्या दिशेनं घेऊन जाणार नाीत. किंबुना, त्या पल्या ध्येयपूर्तीच्या मार्गातील अडथळेच बनतील. *ज्यांना घराशेजारची छोटीशी टेकडी चढायला शिकवलेलं नाी, त्यांच्यावर एव्रेस्ट चढण्याची जबरदस्ती केल्यामुळं पल्या ाती काी लागणार नाी. याउलट, जातीचा अंकार णि भेदभाव पल्या व्यापक िताचा नाी, े पण लोकांना मनोमन पटवून देऊ शकलो, तर प्रत्येक जातीमधील माणसं पल्या जातीच्या भिंतीपेक्षा अधिक उंच ोतील. मग एक वेळ अशी येईल, की त्या भिंती पल्या जागीच रातील णि सगळी माणसं मात्र भिंती नसलेल्या मुक्त काशात संचार करतील. सर्व जण एकाच काशात वावरतील. एकमेकांना समजून घेतील, एकमेकांचा दर करतील, एकमेकांवर प्रेम करतील णि अखेरीस एकच ोतील !"*



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३४)*




"डोळ्यांपुढं क्रांतीचं स्वप्नच नसण्यापेक्षा निदान तसं स्वप्न उत्सुकतेनं पाणं, े जार पटींनी चांगलं, असं मी जरूर मानतो. पण वास्तवाची उपेक्षा करणाऱ्या स्वप्नानं थोडंसं मनोरंजन झालं, तरी समाजस्थितीत फारसा फरक पडत नाी. *दूरवरच्या क्षितिजावर पोचण्याची स्वप्नं साकार झाल्याची धुंदी जागच्या जागी थांबून अनुभवण्यापेक्षा पायांखालच्या वाटेवर दोन पावलं पुढं सरकणं अधिक फलदायक असतं. शिवाय, प्रत्येकाची पावलं वेगळ्या तऱ्ेची असणार, ती एकाच साच्यातील असणार नाीत. त्यामुळं जात्यंताच्या दिशेनं पडणाऱ्या वेगवेगळ्या पावलांतील प्रत्येकाचं स्वागत केलं पािजे. एकाला सर्वोच्च मानून दुसऱ्याला िणवणं, ा उलट्या दिशेचा प्रवास ठरेल.* निदान जात्यंताच्या बाबतीत तरी मला यापेक्षा अधिक गतिमान पर्याय दिसत नाी."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३४)*



"ज्ञानवंतानं देखील पल्या ज्ञानाच्या बाबतीत फार फुशारकी मारू नये. कारण, फुशारकी मारणारा मनुष्य यथार्थ सत्य सांगत असला (प्त असला) तरी देखील बुतेक लोक त्याला अतिशय वैतागतात."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४२)*




"ज्ञान प्राप्त करणं ी गोष्ट प्रशंसनीयच े. पण कित्येकदा ज्ञान एकटं येत नाी. त्याच्या एकेका कणाबरोबर अंकाराचा एकेक काटाची येतो. त्याच्या एकेका परामाणूबरोबर इतरांविषयीच्या तुच्छतेचं एकेक सुरवंटी मनात प्रवेश करतं. ज्ञानाच्या गमनाबरोबर काी माणसांचं मीपण गैरवाजवी स्वरूपात फुगतं. समाजात वावरताना त्यांच्या वर्तनातून जेव्ा जेव्ा त्यांचं ज्ञान प्रकट ोतं, तेव्ा तेव्ा त्यांचा मीपणा त्यांच्या सवासातील लोकांच्या जीवनावर घात करतो. त्यांना जखमा करतो. तो ज्ञानी े, े त्यांना मान्य असतं. त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांना दरी असतो. परंतु त्या ज्ञानाबरोबर प्रकट ोणारी त्याची घमेंड, त्याची फुशारकी, त्याची बढाई त्यांना अस्य ोते. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याच्यावर अवलंबून असतील, तर ते उघडपणे काी बोलत नाीत. परंतु ते मनातून मात्र त्रासलेले, वैतागलेले असतात, बेचैन असतात. त्याच्या सवासात राण्याच्या कल्पनेनंच ते धास्तावून जातात."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४३)*



"अंकारामुळं ज्ञान ज्ञान गढूळ बनतं. बुद्धिमत्ता डागाळते. कर्तृत्व तिरस्करणीय ोतं. माणसं तुटतात. दुरावतात. यशस्वी ोऊनी पदरात अपयश पडतं. म्णूनच, संयमाची साथ असावी. नम्रतेमुळं ज्ञान निर्मळ रातं. नाती प्रसन्न रातात. जीवन कृतार्थ ोतं. ज्ञानाचं खरं साफल्य यातच असतं."



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४४)*



"त्मविष्काराची भूक ी काी गैर नव्े. पण ा *त्मविष्कार सम्यक णि संतुलित स्वरूपात झाला, तरच तो स्वतःलाी णि इतरांनाी नंदी करतो.* मीपण जरूर दरवळलं पािजे, पण त्यानं स्वत्वाच्या सीमा ओलांडता कामा नये. ते जोपर्यंत त्या सीमांमध्ये राून प्रकट ोतं, तोपर्यंत णि फक्त तोपर्यंतच सुगंधी असतं. त्या सीमा ओलांडून ते इतरांवर क्रमण करू लागलं, इतरांना खुपू-टोचू लागलं, घायाळ करू लागलं वा अप्रसन्न करू लागलं, तर ते पला अवघा सुगंधच गमावून बसतं. *ज्ञान जरूर वं, पण त्यानं सवासात येणाऱ्या माणसांच्या श्वासांना, त्यांच्या अस्तित्वाला थोडा तरी सुखद गंध द्यायला वा. ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प नव्े, तर सुगंध दरवळायला वा !*"



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४४)*




"एखादा किरकोळ सन्मान नाकारला गेला, तर मान म्टला गेलेला साित्यिक जेव्ा थयथयाट करतो, संबंधितांवर शब्दांचे सूड ओढतो, तेव्ा साित्याच्या स्पर्शानंतरी माणूस इतका खुजा कसा काय राू शकतो, असा प्रश्न पडतो. पला स्वाभिमान जपायचा नसतो, असा याचा अर्थ अजिबात नाी. परंतु *स्वाभिमान उचित रीतीनं जपणं वेगळं णि त्याला काटेरी बनवणं वेगळं.* मला असं वाटतं, की *सच्चा कलावंत उमदाच असतो, सच्चा तत्त्ववेत्ता विनम्रच असतो णि खरा धर्मज्ञ-धम्मज्ञ समंजसच असतो.* तसं ढळत नसेल, तर तो कलेचा, तत्त्वज्ञानाचा वा धर्माचा दोष नव्े, कला धारण करणाऱ्याला ती पेलवली नाी, तत्त्वज्ञान सांगणाऱ्याला ते मानवलं नाी णि धर्म (धम्म) बोलणाऱ्याला तो पचला नाी, इतकाच त्याचा अर्थ असतो !"



*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्ावं, लेखक : डॉसाळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४६)*

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...