Flash

Showing posts with label चिकित्सा. Show all posts
Showing posts with label चिकित्सा. Show all posts

Tuesday, 11 July 2017

साईबाबांना का हवाय ब्रँड अॅम्बेसेडर ?

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2017 06:30 PM IST

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत

साईबाबांना हवाय ब्रँड अॅम्बेसेडर, हे वाचून आपल्याला कसतरीच वाटतंय ना ? होय मला पण. शिर्डीच्या साईबाबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय. या बातमीने आजची सकाळ उगवली. साईबाबा, जे स्वतः प्रेमाचे, त्यागाचे, आध्यात्मिक ज्ञानाचे, सामाजिक सौख्याचे आणि धार्मिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात त्यांच्या समाधीस्थ होण्यास पुढच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण होत आहेत.  त्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सिनेस्टार किंवा क्रिकेटपटू यांची नेमणूक करून साईबाबांना अधिक 'प्रसिद्धी' मिळवण्याचा घाट घातला जातोय. खुद्द शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या 15 आॅक्टोबरपासून साई संस्थान आणि ग्रामस्थ मिळून साई समाधी शताब्दी सोहळ्यास सुरवात करणार आहेत. त्यापूर्वी गुजरातच्या पर्यटन वाढीसाठी, महाराष्ट्र वनविभागाच्या वाघ संवर्धनासाठी ब्रँड अॅम्बेसेडर होणाऱ्या अमिताभ बच्चन किंवा अनेक जाहिरातीत झळकणार्या क्रिकेटपटू  'भारतरत्न' सचिन तेंडुलकर आणि सध्या गाजणार  "बाहुबली" प्रभास यांना  ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सारे अनाकलनीय आहे.
धर्मकारण, अर्थकारण आणि राजकारण यांची नेहमीच एकमेकांत सरमिसळ झालेली दिसते. म्हणूनच असेल कदाचित, ज्यांनी आयुष्यभर फकिरीत आनंद मानला त्या साईबाबांना भक्तमंडळी सोन्याच्या आभूषणांनी मढवतात. पुट्टपुर्थीचे सत्यसाईबाबा मृत्यूनंतर कोट्यवधी रुपये मागे सोडून जातात. वर्षानुवर्षे बंद असलेल्या दक्षिणेतील पद्मनाभ मंदिरातील तळघरात अगणित संपत्तीचा साठा मिळतो. तिरुपती किंवा सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटय़ांमध्ये लाखो रुपये जमा होतात आणि या साऱ्या पैशाभोवती धर्मकारण आणि राजकारण भिरभिर फिरते. या दुष्टचक्रात सर्वसामान्य मात्र भरडून निघतो. धनाढय़ भक्त साजूक तुपातील चविष्ट पदार्थाची देवाच्या मूर्तीसमोर रोज आरास करतात, पण आपल्या अवतीभोवती पसरलेल्या दरिद्री बांधवांची भूक भागवणे त्यांना गरजेचे वाटत नाही. देवाला उंची वस्त्रे-आभूषणे, पण आमच्या लाखो गोरगरीब आया-बहिणींना लज्जारक्षणार्थ चांगले कपडे मिळत नाहीत. देवासाठी पायी चालणारे, तासन् तास रांगा लावणारे लोकशाहीतील मतदानाचे परमकर्तव्य बजावताना दिसत नाहीत. देशातील राजकारण्यांवर टीका करण्यासाठी हाच वर्ग पुढे असतो. जोवर हे असे दांभिक प्रकार थांबणार नाहीत, तोवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानात, प्रत्येक देवळात अनागोंदी कारभार होत राहणार.
दोन-तीन वर्षांपूर्वी शिर्डीचे श्रीसाईबाबा हे देव नाहीत, म्हणून हिंदूंनी त्यांची पूजा करू नये, असे भन्नाट विधान करून द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. तसे पाहायला गेल्यास हे स्वरूपानंद महाराज अशा वादग्रस्त विधानांसाठी आणि कृतीसाठी बऱ्यापैकी चर्चेत असतात. मध्यंतरी एका पत्रकारावर हल्ला करून ते चांगलेच चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवत्व देणाऱ्या ‘हर हर मोदी’ या घोषणेविरोधातही या शंकराचार्यानी उघड नाराजी व्यक्त केल्याने भाजपातील धर्ममरतडांची बरीच अडचण झाली होती. त्यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्यावर कारण नसताना आगपाखड केल्याने एका नवीन वादाला तोंड फुटले होते.
हिंदू धर्म संसदेने तर त्यापुढे जाऊन ‘‘१९व्या शतकातील साईबाबा हे देव तर नाहीत, पण संत किंवा गुरूही नाहीत. त्यांची देवता म्हणून पूजा करता येणार नाही,’’ असा थेट निर्णयच  घेतल्याने दोन वर्षांपूर्वी गोंधळच उडाला होता.
धर्म संसदेचे प्रसिद्ध प्रमुख राजेश जोशी यांनी साईबाबांची यापुढे देवता म्हणून उपासना करू नये, असे घोषित केले. या बैठकीला १३ आखाडय़ांचे प्रतिनिधी आणि अन्य धार्मिक नेते उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिर्डीच्या ‘श्री साईबाबा संस्थान’लाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तरीही साईबाबांची बाजू मांडण्यासाठी दिल्ली आणि अहमदाबाद येथील साईबाबांचे काही भक्त या बैठकीला उपस्थित होते. साईभक्त आणि आखाडय़ातील साधू यांच्यात चर्चा होण्याआधीच जोरदार वाद झाला. आखाडाप्रमुखांनी साईभक्तांना चक्क व्यासपीठावरून हाकलून दिले आणि चर्चा करून साईबाबा हे देव नसल्याचा ठराव मंजूर केला होता, हा इतिहास अगदी ताजा आहे.
धर्मसंसद असो वा स्वामी स्वरूपानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक हिंदुत्ववादी धर्ममार्तंडाना शिर्डीतील साई मंदिरात दररोज वाढणारी गर्दी नेहमीच डोळ्यांत खुपत असते. साईबाबांसमोर पडणारा सोन्या-नाण्याचा आणि करोडो रुपयांचा खच या धर्ममार्तंडांची पोटदुखी वाढवत असतो, त्यामुळे साईबाबांचे मुस्लीम असणे, ही एकच गोष्ट पुढे करून हे लोक त्यांच्या विरोधात बोलत असतात. खरं सांगायचं तर शंकराचार्य व अन्य कोणत्याही धर्मगुरूंना साईबाबा किंवा तत्सम विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना जर समाजप्रबोधनच करायचे असेल, तर आपल्याकडे विषयांची कमतरता नाही.   वाढत्या अंधश्रद्धेविरोधात, कर्मकांडांच्या वाढत्या अवडंबराविरोधात किंवा घातक रूढी-परंपराविरोधात ते सहजपणे बोलू शकतात. दुर्दैवाने तसे काम करण्याऐवजी आमच्याकडील बोलभांड  धर्मगुरूंना भ्रामक आणि भंपक गोष्टींमध्ये जास्त रस असल्याचे दिसून येते. साईबाबांनी त्यांच्या हयातीत नेहमीच धर्मातील भंपकबाजींची चिकित्सा केली होती. सामान्य लोकांनी "श्रद्धा आणि सबुरी " या दोन गोष्टी केल्या तर जगणे सोपे होते.
"सबका मलिक एक है " या सर्व धर्म समभाव सांगणाऱ्या तत्वाचा स्वीकार केला की मनातील द्वैत नष्ट होते. असं साईबाबा सांगायचे. त्यांच्या या सहजसोप्या शब्दांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील साधक - मुमुक्षू  शिर्डीकडे आकर्षित झाले होते. आजही साईबाबांच्या दर्शनाला लाखो लोक येतात, त्यामुळे शिर्डी सारख्या छोट्या गावाचे एका मोठ्या धार्मिक ठिकाणांमध्ये रूपांतर झाले आहे. जे स्थान शंभर वर्शांपूर्वी पंढरपूचे होते, ते आता शिर्डीचे आहे, म्हणून तेथील प्रत्येक घडामोडीकडे अवघ्या महाराष्ट्र्राचे नव्हे देशाचे लक्ष लागलेलं असते. या ब्रँड अॅम्बेसेडर च्या नव्या 'फॅड'मुळे शिर्डी संस्थान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आपल्या देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बऱ्याच गावांमध्ये, शहरांमध्ये साईबाबांची मंदिरे आहेत. या दोन हजारहून अधिक मंदिरांमध्ये दररोज लक्षावधी भाविक साईंच्या दर्शनाला जात असतात. त्यांच्या या साईभक्तीमागे कोणते कारण असावे ?  साईबाबांचे अवघे आयुष्य साधेपणा, सच्चेपणा आणि चांगुलपणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहिलेले दिसते. मुख्य म्हणजे साईबाबा ‘आधी केले आणि मग सांगितले’ या पठडीतले असल्यामुळे अल्पावधीत त्यांच्या शब्दांचा प्रभाव शिर्डीबाहेर पसरला.
साधारणत: १८५८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या आडवळणाच्या छोट्याशा गावात साईबाबांचे आगमन झाले. एका लग्नाच्या वऱ्हाडासोबत शिर्डीत आलेल्या सोळा- अठरा वर्षाच्या तरुणाला खंडोबा मंदिरातील पुजारी म्हाळसापती यांनी ‘‘आओ साई’’ अशी साद घालून बोलावले, तेव्हापासून साईबाबा हे नाव शिर्डीच्या नावाशी एकरूप झाले.
सुफी संप्रदायामध्ये पीर, फकिरांना साई नावाने संबोधण्याची परंपरा आहे. पण साईंच्या संपर्कात आलेल्या बहुतांश हिंदू भक्तांनी ‘साई’ या शब्दाची फोड ‘साक्षात ईश्वर’ अशी केली असावी, त्यामुळे साईतत्त्व ज्ञानाचा महिमा साधारणत: दीडशे वर्षापासून देशात आणि देशाबाहेर पसरताना दिसतोय. साईबाबांनी आपल्या संपूर्ण हयातीत निधर्मी एकेश्वरवादाचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांच्या भक्तगणांमध्ये हिंदू-मुस्लिमांसह, पारशी आणि ख्रिश्चनांचादेखील भरणा असे. प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्मानुसार वर्तन करायला सांगताना, ते ‘सबका मालिक एक है’ ही बाब आवर्जून सांगत.
आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असे साईबाबांचे सांगणे असायचे. त्यांच्या या विचारांना माणुसकीची जोड होती. ते स्वत: आजारी माणसांना बरं करण्यासाठी झटायचे. आपल्याकडे आलेल्या लोकांना स्वत:च्या हाताने जेवण करून द्यायचे आणि सगळ्यांनी मानवतेला धरून वागावं, असा सहजसोपा माणुसकीचा धर्म सांगायचे. म्हणून आजही जगभरातल्या लोकांना साईबाबा आपले वाटत असावेत. त्याउलट कर्मठ हिंदू रूढी-परंपरा दिवसेंदिवस कालबाह्य ठरताना दिसताहेत. लोकांच्या आचार-विचारावर पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव वाढतोय. हे सगळं थांबवायचं सोडून जर शिर्डीच्या 'मार्केटिंगचाच' विचार होणार असेल तर त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार कोण करणार ?
वास्तविक पाहता शिर्डीतील सद्य:स्थिती हा खरा सामूहिक चिंतेचा विषय असला पाहिजे. देशात तिरुपतीच्या बरोबर सर्वाधिक आर्थिक कमाई असणारे शिर्डी ‘संस्थान’ हे कधी तरी, कुणी तरी खालसा करण्याची आवश्यकता आहे. विविध राजकीय पक्षांनी लोकांच्या देणग्यांतून जमा होणा-या निधीवर आपले ‘पहारेकरी’ बसवण्याची परंपरा निर्माण केल्यामुळे देवाच्या चरणी वाहिलेला पैसा क्वचितच कारणी लागताना दिसला. आज जर तुम्ही शिर्डीत गेलात, तर तिथे तुम्हाला प्रचंड विरोधाभासच दिसेल. ज्या शिर्डी संस्थानाचे १९२२ साली वार्षिक उत्पन्न अवघे २०० रुपये होते, त्या शिर्डी संस्थानाचे फक्त पाच-सहा वर्षातील उत्पन्न पाहिले तर आपले डोळे फिरतील. श्रद्धेने शिर्डीत येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
शनिवार-रविवारी दर्शनार्थीची संख्या एक लाखाहून अधिक असते. आणि सुट्टीच्या दिवसांत तर शिर्डी लाखो लोकांनी गजबजून गेलेले दिसते, पण तरीही या शहराच्या एकूण व्यवस्थेकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवसेंदिवस शिर्डी बकाल आणि भकास होत चालली आहे. नगरविकासाच्या सा-या संकल्पना पायदळी तुडवल्या असल्यामुळे तेथील पायाभूत सुविधा पूर्ण कोलमडून गेलेल्या दिसतात. रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा शौचालयांची सर्वत्र दुरवस्था झालेली आहे. जगातील सगळ्या अनैतिक गोष्टींचा बाजार शिर्डीच्या रस्त्या-रस्त्यांवर मांडलेला असतो. दानपेटीवर नजर ठेवून बसलेल्या संस्थानाधिपतींना मात्र या मंदिराबाहेरील दुरवस्थेची चिंता नसते. ते सारे मग्न आहेत व्यावसायिकरणाच्या एककलमी कार्यक्रमात. जेवढे जास्त उत्पन्न मंदिराला मिळणार तेवढी पैसे खाण्याची संधी जास्त, अशा या विश्वस्त मंडळींचा विचार असेल, त्यामुळे लोकांना भुलवण्याच्या आणि पैसे कमावण्याच्या नवनवीन शक्कल लढवल्या जातात.
मध्यंतरी विश्वस्त मंडळाने साईबाबांसाठी बावीस कोटी रुपये खर्चून सोन्याचे सिंहासन तयार करण्याची घोषणा केली होती, त्या विरोधात सर्वसामान्य माणसांनी आवाज उठवल्यामुळे तो मुद्दा मागे पडला होता. त्यानंतर विश्वस्त मंडळाने रॉयल्टीचा एक नवाच वाद निर्माण केला होता. साईबाबा हे एक ‘प्रॉडक्ट’ आहे. त्याची मालकी आणि त्यांच्या मार्केटिंगचा अधिकार फक्त आमच्याकडे आहे, असे समजणाऱ्या विश्वस्तांनी देशातील सुमारे दोन हजार आणि विदेशातील सुमारे दीडशे मंदिरांनी त्यांच्या दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम शिर्डी संस्थानाला द्यावी, अशी विचित्र मागणी केली गेली होती, पण त्यावरही टीकेची झोड उठल्यामुळे विश्वस्तांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. एकूणच काय तर खोटी प्रवास बिले सादर करण्यापासून तर शिर्डीतील विमानतळाला आर्थिक निधी देण्याच्या मुद्दयापर्यंत अनेक विषयांत शिर्डी संस्थानाचे ‘संस्थानिक’ वादग्रस्त ठरले होते. त्यांना सुधारण्याचे न्यायालयाचे प्रयत्नसुद्धा अयशस्वी ठरलेले दिसतात आणि म्हणूनच लोकांच्या पैशावर चालणाऱ्या या साऱ्या मठ-मंदिरांतील कोटय़वधी रुपये समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी वापरले जावेत यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे.
शिर्डी ज्या नगर जिल्ह्यात आहे, तेथील दुष्काळग्रस्त आदिवासी तालुके जरी डोळयासमोर आणले तरी आपल्याला साईबाबांचे नाव घेऊन पैसे जमवणाऱ्या, या धंदेवाईक लोकांची स्वार्थी वृत्ती लक्षात येईल. ज्या साईबाबांनी आयुष्यभर फकिरी बाणा अंगीकारला होता, ज्यांचे दररोजचे जेवण भिक्षा मागून होत असे, त्या साईबाबांच्या मूर्तीसमोर आता चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांचा नैवेद्य ठेवला जातो. पण लगतच्या गावांमधील गोरगरिबांच्या खपाटीला गेलेल्या पोटांमध्ये दोन-चार दाणे पडावेत, यासाठी मात्र कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही. नगर जिल्हा हा पाणीटंचाईसाठी ओळखला जातो. विशेषत: ग्रामीण भागांतील महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल भ्रमंती करावी लागते. ते थांबवण्यासाठी आजवर शिर्डी संस्थानाने ठोस  पाऊल उचललेले दिसत नाही. मग जर विश्वस्तांनाच साईबाबांच्या विचारांचा विसर पडला असेल, तर शिर्डीतील काळे धंदे करणाऱ्या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आज साईबाबांनी सांगितलेली भूतदया सगळ्यांनी अंगीकारण्याची गरज आहे. आमच्या सर्वच संतांनी गरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगितले.
साईबाबाही आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तसाच उपदेश करीत. वारकरी संप्रदायाच्या मानवतावादी मुशीत घडलेल्या महाराष्ट्राला म्हणूनच साईबाबांचे हे विचार पटले असावेत. महाराष्ट्राने पंढरीच्या पांडुरंगाएवढाच विश्वास साईबाबांवर दाखवला. परिणामी शिर्डीसारख्या खेडयात अवतरलेला एक फकीर अल्पावधीत कोटय़वधी मराठी घरांत आसनस्थ झाला. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणते, तर पांडुरंगाबरोबर साईबाबांचेही नाव घ्यावे लागेल. साईबाबांचे चरित्र लिहिणाऱ्या प्रख्यात संतकवी दासगणू यांनी एका अभंगात शिर्डीची तुलना पंढरपूरशी केलेली दिसते. ते म्हणतात –
शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर।
शुद्धभक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा।।
पण काळानुरूप बदललेल्या शिर्डीतील सध्याची स्थिती आता वेगळी आहे. येथे पुंडलिकाचा भाव असलेला भक्त येताना दिसत नाही आणि बाजारूपणाच्या भाऊगर्दीत शिर्डीतील शुद्ध भक्तीची गंगा साफ आटून गेलेली दिसते. ती पुन्हा भावभक्तीने आणि माणुसकीच्या शक्तीने खळाळून वाहती व्हावी. तिच्या साहाय्याने शिर्डीच्या आसपासच्या तालुक्यांतील लोकांचे जगणे जरी सुजलाम-सुफलाम झाले तरी साईबाबांच्या विचारसरणीचा विजय झाला, असे म्हणता येईल.

link - http://www.ibnlokmat.tv/editorial-opinion/mahesh-mhatre-blog-on-shirdi-sai-baba-want-brand-ambassador-264544.htm
l

Wednesday, 7 June 2017

नग्नता,मैथुन, कला आणि घुसमट: भारत एक शोध -राजू परुळेकर


IMG_8667
कलेच्या संस्कृतीच्या विकासामध्ये आणि ईश्वराच्या अस्तित्वामध्ये वस्त्र किंवा झाकणे हे कदापी अभिप्रेत नाही.
जगभर देवदेवतांचे नग्न पुतळे आणि शिल्पे बनवली गेली आहेत. भारतामध्येही देवदेवतांची आणि अवतारांची नग्न चित्रे आणि पुतळे बनवण्याची परंपरा ग्रीकांच्या आधीपासून अस्तित्वात होती.
एवढेच नव्हे, तर जगातला, भारतातला सनातन धर्म- ज्याला आता ‘हिंदू’ असे म्हणतात, तो बहुदा एकमेव धर्म असावा ज्यामध्ये लिंग आणि योनी पूजेला असाधारण महत्त्व आहे.
इस्लाम वगळता जगातल्या सर्व धर्मांनी नग्नतेला आदर आणि दैवी शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. अनेक ग्रीक देवतांची नग्न शिल्पं किंवा ख्रिस्ती धर्मातील नग्न आणि अर्धनग्न शिल्प आणि चित्र प्रबोधनोत्तर (post renaissance) आपल्याला पाहायला मिळतात.
IMG_8665
भारतातील अनेक मंदिरात योनि व लिंग पूजा हही अनुक्रमे शक्ति व शिव पूजा मानली जाते. हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
IMG_8671
एम. एफ. हुसेन यांनी सरस्वती देवीचे नग्न चित्र काढल्यावर नग्नता म्हणजे संस्कृतीवरील आक्रमण असल्यासारखी ओरड हिंदू कट्टरवाद्यांनी सुरू केली.
त्यामध्ये दोन भाग होते-; एक म्हणजे चित्रकला, शिल्पकला व त्या संबंधीचा विचार, त्याची अॅनाटॉमी हे सारे समजून घेण्याची कट्टरवाद्यांची तयारी नव्हती आणि दुसरे म्हणजे या सर्वांना अचानक एम. एफ. हुसेन मुस्लीम असल्याचा साक्षात्कार झाला.
MF-Husain-007
खरं तर मक्बूल फिदा हुसेन हे पंढरपुरात जन्मलेले आणि भारतीय संस्कृतीची अस्सल जाण असणारे महान कलावंत होते. परंतु, एक हजार वर्षे इस्लामच्या गुलामीत राहिलेल्या भारताला इस्लामी संस्कृतीचा पराभव हा युद्धात फक्त ५० टक्के होऊ शकतो, उरलेला पराभव हा आपल्यासारखे त्यांना बनवण्यात आहे, त्यांच्यासारखे आपण बनण्यात नाही, याचा विसर पडला.
इस्लाम हा एक असा धर्म आहे, ज्याच्यामध्ये ‘द होली बुक’ (कुराण ए शरीफ) यावर प्रश्न उपस्थित करणे, वादाला आवाहन देणे किंवा स्वत:च्या मनाप्रमाणे अर्थ लावणे याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. याला ईश्वराविषयी किंवा पवित्र गोष्टींविषयी निंदात्मक बोलणे म्हणजे धर्मनिंदा (blasphemy) मानले जाते.
‘चार्ली  हेब्दो’ या नियतकालिकामध्ये प्रेषित महंमदांची नग्न चित्रे अनेकदा छापली गेली आहेत. डेन्मार्कमध्ये एका कार्टुनिस्टने प्रेषित महंमदांचं कार्टून छापलं होतं. या साऱ्यांना जगभराच्या मुसलमानांनी मृत्यूदंड फर्मावला.
IMG_8660‘चार्ली  हेब्दो’ नियतकालिकाचे संपादक स्टेफेन चार्ब याने अशा धमक्यांना भीक न घालता महंमदांची नग्न चित्रं आपल्या नियतकालिकामध्ये छापणं चालू ठेवलं. त्यामुळे या नियतकालिकावर पॅरिसमध्ये हल्ला करून संपादकासह अनेकांना मुस्लीम कट्टरवाद्यांनी ठार मारलं.
‘सैतानाची वचनं’ हे पुस्तक कुराण आणि महंमदाचा अपमान आहे, असं समजून सलमान रश्दी या लेखकाला कित्येक वर्षांपूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली आहे.
(ह्या लेखाच्या लेखकाने) स्वत: ‘चार्ली  हेब्दो’ या नियतकालिकामधील कार्टून्स ट्विटरवरून स्टेफेन चार्ब ह्यांच्या   मृत्यनंतर श्रद्धांजली म्हणून प्रसारित केली होती. ती लेखकाच्या  टाइमलाइनवर मागे जाऊन, वाचक पाहू शकतात.
तस्लीमा नसरीननेही कुराण, इस्लाममधील स्त्रियांची अवस्था, त्यांचे होणारे भयानक शोषण आणि लिंग व योनी यांना अपवित्र मानून झाकून ठेवण्याची प्रवृत्ती याविरुद्ध वेळोवेळी लेखन करून स्वत:वर स्वत:च्या देशातून निर्वासित होण्याची वेळ आणली. इस्लाम हा असा धर्म आहे, ज्यामध्ये एकाच वेळी ‘सेक्समॅनिया’ आणि ‘सेक्सचं दमन’ हे दोन्हीही सहअस्तित्व करून आहेत.
किंबहुना ते परपस्परावलंबी आहेत. जे झाकलं जातं, त्याचं अनिवार आकर्षण मनुष्याला वाटतं. कलेच्या बाबतीत झाकून ती दृग्गोच्चर करताच येत नाही. उदा. बुरख्यातील स्त्रीचं चित्र किंवा शिल्प किंवा कोणत्याही प्रकारचं कलात्मक अविष्करण करणं हे केवळ अशक्य आहे. धर्माचा उदय आणि कलेचा उदय हा बऱ्याचदा हातात हात घालून होत असतो आणि मुख्यत्वे करून त्या त्या धर्मातले ईश्वरी अवतार आणि देवदेवतांची चित्रं, शिल्प यातूनच कलेचा आविष्कार प्रत्येक धर्मात, प्रत्येक संस्कृतीत आणि प्रत्येक प्रांतात होत असतो. मायकेलअँजलो, लिओनार्दो द विन्सी पासून एम. एफ. हुसेन यांच्यापर्यंत अनेकांनी आणि इतर अनेक कलाकारांनी आपापल्या धर्मातील किंवा इतर धर्मातील व्यक्तिरेखा त्यांना जशा दिसतात, तशा रेखाटलेल्या आहेत. त्यांची तशी शिल्पं बनवलेली आहेत.
ईश्वरी अवतार मानवी फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही उभी  करता, मग ते चित्र असो वा शिल्प तेव्हा त्याची अॅनाटॉमी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. ही अॅनाटॉमी डॉक्टरइतकीच कुशलपणे चित्रकार, शिल्पकाराला शिकावी लागते. त्यामुळे नैतिक आणि अनैतिक (मॉरल आणि अमॉरल) असा विचार कलावंताच्या मनाला शिवत नाही. तो कायम ननैतिक  (amoral) असतो.
इस्लामच्या बाबतीत मूर्तीपूजा निषिद्ध आहे. कोणत्याही मानवी फॉर्ममध्ये ईश्वरी अंश चित्रित करणं निषिद्ध आहे. एवढंच नव्हे, तर प्रेषित महंमद आणि त्यांचे नंतरचे वारसदार यांचे चित्र निर्माण करणं किंवा पूजा करणं हेही निषिद्ध आहे, नव्हे ते मृत्यूदंडास पात्र आहे. मुसलमान हा पैगंबरांचा आदर करतो. पण इबादत (भक्ती) तो फक्त अल्लाहची करतो, जो अमूर्त आहे. प्रेषित महंमदांचे स्थान हे इस्लाममध्ये अल्लाहच्या दूताचे आहे. ते साक्षात ईश्वर किंवा ईश्वरी अवतार नव्हे. परंतु, ईश्वरी दूत असल्याने ते मुसलमानांमध्ये सर्वोच्च आदराला पात्र आहेत. इस्लाम स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर स्त्रीला दैवीपणाच्या जवळपास मानत नाही.
इस्लाममध्ये स्त्री देवता नाही. पैगंबराची पत्नी किंवा मुलगी यांच्याकडे आदराने पाहिले जाते पण देवतेच्या आसपास त्यांना स्थान नाही. इस्लाममध्ये स्त्री ही पुरुषाची मालमत्ता आहे पण त्याच वेळेला त्या मर्यादित परिघात तिला काही हक्कही देण्यात आलेले आहेत, ज्या हक्कांचा मुसलमान जणू काही मानवी हक्कांच्या पलीकडे तिला काही दिल्याचा गाजावाजा करत असतात, जे धादांत खोटे आहे. हिजाब, बुरखा आणि प्राप्त पुरुषाची सेवा हेच इस्लामच्या परिघातील स्त्रियांचे भागध्येय आहे.
या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर इस्लाममधल्या कुठच्या देवीचं किंवा देवाचं नग्न किंवा अर्धनग्न चित्र काढणं, शिल्प काढणं हे शक्यच नाही. कारण, मृत्यूदंडाची शिक्षा हा भाग जरी वगळला तरी चित्र, शिल्प, नग्नता, अर्धनग्नता जरी दाखवायचीच ठरवली तरी ती काल्पनिक आणि इस्लाम धर्मात वास्तविक आधारावर नसलेली करावी लागेल, ज्याची शिक्षा वास्तवाशी संबंध नसतानाही ‘चार्ली हेब्दो’प्रमाणे मृत्यूदंडाची मिळेल. इथे हे लक्षात घ्यायला हवं की, प्रेषित महंमदांचं चित्र, कार्टून किंवा त्या संदर्भातली नग्नता जर कुणी काढायची ठरवलीच तर तो सारा मामलाच काल्पनिक असतो. कारण अशी कुणी मूळ चित्रं किंवा कल्पनाचित्रं धर्मात उपलब्धच नाहीत. कारण ते निषद्ध आहे. त्यामुळे मॅडोना, व्हीनस, खजुराहोमधली चित्रं, कामाख्या मंदिरामधील नग्न जगन्मातेचं शक्तीपीठ या साऱ्या व अश्या प्रकारच्या इतर धर्मातील संकल्पनांशी इस्लामचा दुरान्वये संबंध नाही.
मक्बूल फिदा हुसेन यांनी श्रीगणेशाची काही अप्रतिम चित्रं काढलेली आहेत. त्यांना भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं अचूक ज्ञान होतं. देवी आणि देवता ज्यांची आपण प्राचीन मंदिरांमध्ये पूजा करतो, ती शिल्पं दगडांमध्ये कोरलेली नग्न शिल्पं आहेत. भारतात देवीला जगन्माता म्हटलं जातं. माता आणि मुलाच्या मध्ये नग्नतेचा मुद्दाच उपस्थित होत नाही. किंबहुना तो तसा झाला, तर उपस्थित करणाऱ्यामध्ये मातेसंबंधी कामुकतेची खोट आहे, असे मानण्यात यावे.
भारतामध्ये अनेक देवतांना मग त्या पुरुष स्वरूपात असो वा स्त्री स्वरूपात असो; पहाटेची अंघोळ घालताना त्या देवतांच्या मूर्ती नग्न असतात. पुजारी आपल्या हाताने दूध, अत्तर, पाणी, तूप, दही या पंचामृताने चोळून त्यांना अंघोळ घालतो आणि मग त्या देवतांना वस्त्रे चढवली जातात. अपवादानेच काही मूर्ती ज्या अर्वाचीन काळात बनलेल्या आहेत त्यांच्या अंगावर मूर्तीकारानेच वस्त्रे चढवलेली आहेत. पण ही वस्त्रे चढवण्या अगोदर चित्रकाराला किंवा शिल्पकाराला देव आणि देवीची अॅनाटॉमी उत्कृष्ट स्वरूपात साकारण्यासाठी मूर्ती किंवा चित्रांचा नग्न स्वरूपात विचार करावाच लागतो.
कलावंत हा नैतिक किंवा अनैतिक असत नाही. तो ननैतिक असतो. कलावंत म्हणजे पुजारी नव्हे. हुसेन यांनी सरस्वतीचं नग्न चित्र काढलं, ही हजारो वर्षांची परंपरा होती. त्यांनी मुसलमानांच्या धर्मात असे करून दाखवावे, असे त्यांना सांगणे ही मूर्खतेची परिसीमा आहे. कारण वर उल्लेखल्या प्रमाणे मुस्लीम धर्म हा या प्रकारच्या  मानवी कलाविचारांपासून पारखा आहे. त्यांची शिल्पं ही इमारतींमध्ये, वास्तूशास्त्रामध्ये प्रकट होतात. ज्या कलेला स्वाभाविक पणे मानवी मूल्य वा मानवी चेहरा नसतो. हे एक प्रकारचे कलात्मक मागासलेपणच आहे.
भारतामध्ये कॅलेंडर्स आणि शिळा प्रेससाठी देवदेवतांचा मोठा व्यापार करण्याची परंपरा राजा रविवर्मा या चित्रकाराने सुरू केली. राजा रविवर्मा हा चित्रकार म्हणून थोर होता, पण कलेच्या तत्त्वज्ञानानुसार तो एक कृतक आणि बुरसटलेला होता. त्याने अनेक देवता, ह्युमन मॉडेलचा वापर करून, त्यांना कपडे घालून पॉप्युलिस्ट बनवलं. शिळा प्रेसवर छापलेली मॉडेल्स देवदेवतांची चित्रे हिंदूंच्या घराघरांत लागली. त्यामुळे असा भ्रम पसरला की, कलावंताने देवदेवतांना कपडे घालणं, हे बंधनकारक आहे. वास्तविक, ज्या समाजामध्ये देवाचे आणि देवतांचे असाधारण असे दैवी लैंगिक अविष्करण शिल्प आणि चित्रांमधून होत होते, तिथे प्रबोधन युगाच्या जागी अंधारयुग पसरले.
कामाख्या देवी ही हिंदूंचं सर्वांत मोठं शक्तिपीठ मानतात. कामाख्या मंदिरात योनी पूजा ही अतिपवित्र आणि त्यातून येणारे रक्त हे शक्तिबीज मानले जाते.
महादेव शंकराच्या बाबतीत लिंगपूजा ही भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नग्नतेची भिती आणि पथ्य हा हिंदू धर्माचा भागच नव्हता. किंबहुना इस्लाममधील अशा प्रकारचे समज हे हिंदू उदारवादाच्या विरोधात होते. हिंदू कट्टरवाद्यांनी भारतात हिंदूंचा विजय आणि इस्लामचा पराभव एवढा ‘मनावर घेतला’ की, इस्लामची बंद संस्कृती हिंदू संस्कृतीच्या उदारतेमध्ये आणि ननैतिकमध्ये (अमॉरॅलिटी) विलीन करण्याऐवजी आपण त्यांच्याएवढेच कट्टर वागले पाहिजे, या खुळचट कल्पनेने हिंदू कट्टरवादी आपल्या मूळ नग्न आणि अद्भूत आविष्कार असलेल्या ननैतिक ईश्वरी कलेला कपडे पांघरून आणि बुरखे घालू लागले.
अलीकडच्या काळात तर देवतांच्या मूर्ती करतानाच शिल्पकार त्यात कपड्यांचे प्रावधान करतो. चित्रकारांचीही तीच गत झालेली आहे. मुळामध्ये नग्नतेला ते घाबरतात, ज्यांच्या मनात नग्नता आणि कामुकता यांच्यातला फरक स्पष्ट झालेला नसतो.
देवी ही आपण जगन्माता मानतो, शक्तिपीठ मानतो. तिच्यात व आपणात आई व मुलाचं नातं आहे, ही शिकवण आपल्याला आपल्या संस्कृतीतून मिळालेली आहे. जेव्हा आई मुलाला आणि मूल आईला नग्न पाहतं तेव्हाच दोघांचाही जन्म होतो.
IMG_8661
(कामाख्या मंदिरातील शक्ती देवीची मूर्ती योनिपुजा आणि शक्तीपीठ म्हणून भारतात अनन्यसाधारण स्थान या देवीला आणि मंदिराला आहे. )
कामाख्या देवीच्या मंदिरात शक्तिपीठ म्हणून योनी पूजा करताना तिच्या योनीतील रक्त (प्रतीकात्मक) आपण डोक्याला लावतो तेव्हा ते पीठ कामुक आहे, असे आपण मानतो का? की ती आपली संस्कृती आहे?
हुसेन यांनी सरस्वतीचे नग्न चित्र काढले, ते अतिशय कलात्मक आणि अष्टसात्विक भाव स्पष्ट करणारे होते. याउलट कलेच्या दृष्टिकोनातून पाहताना भारतमातेचे म्हणून जे एक चित्र आपण सातत्याने पाहतो, जिला अनेक पदरी साडी चापूनचोपून नेसवलेली असते आणि हळदीकुंकवाला आलेल्या सवाष्णीसारखी ती उभी असते आणि जिचे केस मोकळे सोडलेले असतात आणि एकंदरीत त्या चित्राचा पाहताना परिणाम तो अखंड भारत आहे, असाही होत नाही किंवा ती कुणाची माता आहे, असाही होत नाही. कलेचा अत्यंत बुरसटलेला आणि अर्थहीन असा अर्थ त्या साडी नेसलेल्या भारतमातेमधून प्रतीत होतो. आता कट्टरवाद्यांनी किंवा कोणत्या तरी माथेफिरूने तुमच्या गळ्यावर सुरी ठेवून तिला भारतमाता मानाच असे म्हटले तरी ही प्राचीन, अर्वाचीन आणि पोस्ट मॉडर्निझमच्या अर्थाने ते एक बोगस आणि अतिसुमार चित्र आहे.
हजार वर्षांच्या इस्लामच्या आक्रमणानंतर आपण त्यांना आपल्यासारखे बनवू शकलो नाही, उलट आपण त्यांच्यासारखे बनलो हे खरे आपले सांस्कृतिक नग्नता आहे. खरा प्रश्न ही नग्नता कुठे लपवायची, हा आहे.
नग्नता ही धर्मामध्ये त्याज्य नाही. सनातन धर्मामध्ये तर नाहीच नाही. इस्लाम आणि व्हिक्टोरियन कालखंड हा नग्नता कृतकपणे झाकण्याचा कालखंड मानला जातो. धर्म याचा खरा अर्थ प्रकृती असा होतो आणि प्रकृती ही ननैतिक असते.
दुसऱ्या बाजूने वस्त्रांचा आणि नैतिकतेचा काय संबंध? उदाहरणच घ्यायचे झाले, तर उष्ण आणि विषुववृत्ताजवळच्या कटिबंधातले लोक हे साधे आणि पातळ कपडे घालतात. तर शीत कटिबंधातील लोक हे लोकरीचे आणि विविध प्रकारच्या आवरणांनी युक्त असे खूप कपडे घालतात. याचा अर्थ जास्त कपडे घालणारे नैतिक होतात का?
वस्त्र हे नैतिकतेचं निर्देशक असतं, तर जास्त कपडे घालणारे अधिक नैतिक मानले जायला हवेत. जी गोष्ट आपण झाकतो तिची आपल्याला भिती वाटते आणि ती भिती आपल्या मनात असते.
इस्लाम हा भितीवर आधारित धर्म आहे. काही अब्राह्मनिक धर्म हे सुद्धा भितीच्या आधारावरच उभे आहेत. पण भारतात निर्माण झालेले धर्म हे भितीच्या आधारावर उभे नाहीत.
जैनांमध्ये तर दिगंबर पंथच आहे. तो पंथ अश्लील मानायचा का?
Acharya_Vidyasagar_04
एवढेच नव्हे, तर अनेक स्तूप, अनेक मंदिर, अनेक शिल्प यामधील देवदेवता नग्न स्वरूपात त्या काळच्या अज्ञात कलावंतांनी कोरून   काढलेल्या आहेत. त्या काळात आजच्या काळासारखे कट्टरवादी भारतात नव्हते म्हणून त्यांना त्यांची कला पूर्ण स्वरूपात प्रकट करता आली.
देव, अवतार हे ईश्वरी अंश असतात, ईश्वर नव्हे. ईश्वर जन्म घेत नाही, ईश्वर मृत्यू पावत नाही. त्याचा अंश ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, ते अवतार म्हणून आपण मान्य करतो.
Naga Sadhus Photo
अनेक साधू आणि साध्वी किंवा तंत्रसाधना करणारे साधू आणि साध्वी किंवा नागपंथीय साधू हे वस्त्रविहीन असतात. त्यांचा अश्लीलतेशी दुरान्वयेही संबंध नसतो.
हुसेन मुस्लीम असल्यामुळे मुद्दाम हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, असे ते इस्लामशी करतील का, असे विचारणे हे तद्दन बुद्धिहीनतेचे लक्षण आहे, ते यामुळेच. इस्लाम हा धर्म नव्हे. तो एक राजकीय ‘कल्ट’ म्हणजे जीवनशैली आहे. ज्याची धर्म ही दुसरी दुय्यम निकड (priority) आहे. एकंदरीत मानवी अस्तित्वाचा प्रवास हा एक शोधाचा प्रवास आहे, ज्यामध्ये अनेक कला येतात, संगीत येतं, शास्त्र येतं. क्रमच लावायचा झाला, तर खालीलप्रमाणे
१. ज्ञानयोग
२. अवतार/प्रेषित
३. धर्म
४. धर्माचे संघटन
५. धर्माच्या संघटनांच्या नावाने काम करतो, असे सांगून कृती करणाऱ्या राजकीय/अराजकीय संघटना.
असा क्रम लागतो.
खरा कलावंत हा ज्ञान, प्रेषित आणि धर्म यांच्या अस्तित्वामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर गुंतलेला असतो. त्याला धर्माच्या संघटना (उदा. शंकराचार्यांची पिठे, खिलाफत, व्हॅटिकन, वक्फ बोर्ड  वगैरे) हे काय म्हणतात याच्याशी देणेघेणे नसते. तशा प्रकारे तो कामच करू शकत नाही. या धर्माच्या संघटनांच्याही खालच्या स्तरावर धर्माच्या संघटनांच्या नावावर राजकीय/अराजकीय संघटना काम करत असतात. कोणताही खरा कलावंत त्यांना कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकत नाही (आणि त्याने देऊही नये). कारण दोघांची भाषा एकमेकांसाठी अगम्य असते. संख्येच्या बळावर कलावंत निष्प्रभ आणि पराभूत होऊ शकतो. परंतु त्याचे म्हणणे हे प्राकृतिक आणि अजरामर असते आणि त्याला पराभूत करणाऱ्यांचे म्हणणे हे कृतकतेने, कामुकतेने आणि ढोंगाने बरबटलेले असते. हे सारे लक्षात घेतले की, हुसेन काय किंवा चार्ली हेब्दो, तस्लीमा नसरीन यांच्या बाबतीत काय झाले असेल, हे आपल्या लक्षात येते.
देवदेवतांची चित्रे आणि शिल्पे जगभर सर्व संस्कृतींमध्ये (अर्वाचीन भारतीय संस्कृती धरून) केवळ नग्न स्वरूपातच चित्रित किंवा शिल्पित केली गेलेली नसून त्याही पुढे जाऊन प्रत्येक धर्मामध्ये काही अपवाद सोडला तर देवदेवतांची असंख्य मैथुन चित्रं आणि शिल्प निर्माण झालेली आहेत आणि ती दैवी मानली जातात. याचं मुख्य कारण प्राकृतिक दृष्टीने आणि ज्ञानाच्या पातळीवर मैथुन हाच निर्मितीचा प्रथम आणि अखेरचा बिंदू असतो आणि ते मैथुन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये  पुननिर्मित करण्याची दैवी देणगी कलावंताला लाभलेली असते. हे ज्यांना कळत नाही, ते कलावंताची हत्या करण्याकरिता सर्व ठिकाणी, सर्व संस्कृतीमध्ये टपून बसलेले असतात. ते मैथुनाचा, नग्नतेचा विरोध करत नसून निर्मितीची, प्रकृतीची आणि ज्ञानाची हत्या करत असतात. आणि याला पाठिशी घालणारी सरकारे जेव्हा जगभरच्या वेगवेगळ्या देशांत अस्तित्वात येतात, तेव्हा त्या देशाचा, त्या प्रांताचा आणि संस्कृतीचा ऱ्हास सुरू होतो.
नैतिकतेचा प्रकृतीशी, सृजनाशी आणि ज्ञानाशी काही संबंध नाही. ज्ञान, प्रकृती आणि निसर्ग हे ननैतिक आहे. नैतिकता हा कायदा होय. परस्परविरोधी असे लाखो नैतिक कायदे नग्नता आणि मैथुन या संदर्भात आहेत. नव्हे, तर प्रत्येक गोष्टीबाबतच आहेत. विषय बदलून उदाहरणच द्यायचं झालं, तर संजय दत्त याने हत्यारं बाळगल्या बद्दल पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा भारतात भोगली जी ब्रिटिशकालीन कायद्याप्रमाणे होती. तशा प्रकारे हत्यारं बाळगणं अमेरिकेत गुन्हा नसून अत्यंत सहज आणि सोपी बाब आहे. भारतात कायद्याप्रमाणे शिक्षा भोगल्यामुळे त्याला आता अमेरिकेचे दरवाजे कायमचे बंद झाले. शिक्षेच्या संकल्पना कश्या बदलतात आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतात हे दाखवण्याकरिता हे विषय सोडून उदाहरण घेतलं इतकच.
नग्नतेबाबत असंख्य प्रयोग जगभरच्या चित्रकार आणि शिल्पकारांनी केले आहेत. त्यात भारत प्रथम होता.
IMG_8662
खजुराहोसारखी मंदिरे, अजंठा-एलोरासारखी शिल्पे ही भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. धर्माच्या नावावर चित्रकारांना जर देवादिकांची नग्नता आणि मैथुन शिल्पे काढण्याचे बंद करायचे ठरवले, तर आपल्याला आपली संपूर्ण कलासंस्कृती आणि शिल्पसंस्कृती जी चार ते पाच हजार वर्षं जुनी आहे ती नाकारावी लागेल.
जैनिझम, बुद्धिझम, हिंदू सनातन धर्म नैतिकतेचे नियम म्हणून कलावंताला शिल्प किंवा चित्र काढताना नग्नता किंवा मैथुन शिल्प किंवा चित्र काढणे त्याज्य ठरवले नव्हते. कारण हे करत असताना प्राचीन महर्षींनी ज्ञान आणि दैवी अंश या पातळीवर सृजनाला पाहिले होते. नैतिकतेचे नियम हे कायद्यासारखे आहेत. कायदा हा सीमांनुसार बदलतो. केवळ देशाच्याच नव्हे, तर राज्याच्या सीमांनुसारही बदलतो. महाराष्ट्रात बीफ बॅन आहे, केरळात नाही. गुजरातेत दारूबंदी आहे, महाराष्ट्रात नाही. याचा अर्थ गुजरातेत दारू पिणे हा गुन्हा आहे किंवा महाराष्ट्रात बीफ खाणे हा गुन्हा आहे, पण बाजूच्या राज्यात नाही. भारतात परमिटशिवाय हत्यारं बाळगणं हा गुन्हा आहे, पण अमेरिकेत नाही. अनेक जमातींमध्ये आजही बहुपत्नी किंवा बहुपती प्रथा चालू आहेत. अशा प्रथा भारतात अनेक ठिकाणी आहेत, अनेक विमुक्त भटक्या जमातींमध्ये आहेत, तशा आधुनिक जगातही आहेत.
भारतात व्हिक्टोरियन काळातील गुलामीच्या काळात म्हणजे, राणी व्हिक्टोरियाचे साम्राज्य जगभर पसरले होते आणि त्यावरील सूर्य जेव्हा मावळत नसे तेव्हा ‘व्हिक्टोरियन मॅनरिझम’ नावाच्या एका ‘कोड ऑफ कंडक्ट’चा उदय झाला. ज्यामध्ये वागणे, बोलणे, जेवणे आणि अंगभर वस्त्र घालणे किंवा अंग संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घालणे, त्यातही स्त्री आणि पुरुषांनी जेवताना तशा प्रकारचे कपडे घालणे आणि काटे-चमचे वापरणे हे अभिजन संस्कृतीचे लक्षण मानले जाऊ लागले.
जेम्स कॅमेरूनच्या ‘टायटॅनिक’ चित्रपटात काही दृश्यांमध्ये या व्हिक्टोरियन मॅनरिझमचे नमुने पाहायला मिळतात. ज्यामध्ये एके ठिकाणी पुढे महान चित्रकार ठरलेला पिकासो याचाही उल्लेख सुमार किंवा क:पदार्थ असा आढळतो. प्रथम श्रेणीमधल्या ‘व्हिक्टोरियन अभिजनांमध्ये’ जे वातावरण होते त्याचा गुलाम भारतीय प्रजेवर दीर्घकालीन नकारात्मक असा गंभीर परिणाम झाला. व्हिक्टोरिया राणी आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटन, अमेरिका आणि ब्रिटिश सामाज्याच्या अमलाखाली असणारे अनेक राष्ट्रकुल देश हे या पगड्यातून बाहेर पडले. कला आणि संस्कृतीसाठी नैतिकतेची खोटी झापडे त्यांनी काढून टाकली.
व्हिक्टोरियन काळामध्ये ज्याने कमप्यूटरचा मूळ शोध लावला आणि ज्याने नाझींचा encrypted message decode केला तो Alan टुरिंग स्म्लैंगिक असल्यामुळे हा गुन्हा मानला गेला आणि त्याला होर्मोन्ल उपचार किंवा कैद असा पर्याय देण्यात आला. त्याने पुढे आत्महत्या केली. खर तर स्म्लैंगिकता हा आजार नव्हता, Alan टुरिंग पुढे कॉम्पुटर चा पितामह ठरला, त्याने लावलेल्या शोधामुळे हिटलर विरुद्ध्च युद्ध दोन वर्ष आधी सम्पुष्टात आल आणि इंग्लंडच्या राणीने, टुरिंगला मरणोपरांत माफी प्रदान केली.
पण ह्या उलट, प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये स्म्लैंगिकता हि कोणत्याही प्रकारची रोग भावना आहे असे मानले जात नसे.
IMG_8666
आधुनिक अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रवी शंकर ह्यांनी ११ डिसेम्बर २०१३ रोजी रात्री १०:०७ मिनिटांनी ट्वीटर वर ट्वीट करून स्म्लैंगिकता हा गुन्हा मानला जात नसल्याचे स्पष्ट केले होते. किंबहुना त्यांच्या मते भगवान अय्यप्पा हि हर-हरा च्या प्रतीकात्मक स्म्लैंगिकतेची निर्मिती मानली जाते.
पण भारतामध्ये व्हिक्टोरियन विचारसरणीचा परिणाम इतक्या खोल गुलामीत झाला की, भारतीय साहित्य (उदा. गीतगोविंद), भारतीय प्राचीन कला, इतिहास, शिल्प, दगडांमध्ये कोरलेली लेणी, कालिदासापासून राधागोविंदपर्यंत शृंगारिक लेखन, वात्सायनाचे कामशास्त्र हे पाश्चिमात्त्यांनी उचलले आणि स्वतंत्र भारताचा बहुसंख्य हिंदू हा कलेमध्ये व्हिक्टोरियन होण्याकरिता धडपडू लागला. आपल्या अभीजन मालकाचा गुलाम जसा वागतो, तशी भारताची विचारसरणी झाली. एके काळी भारतात ज्ञान आणि सृजन, कला आणि कल्पना यांचे स्थान धर्म, धर्माच्या संस्था आणि धर्माच्या नावावर चालवणाऱ्या संस्था याहून वरचे होते. स्वातंत्र्योत्तर काळात गुलामी मानसिकतेचे हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन, शीख, जैन व बौद्ध कट्टरवाद्यांनी कला, जी पायावर उभी होती, ती डोक्यावर उभी केली.
इथे परत स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात काही कलावंतांनी अभिजात मुलभूत संस्थेशी नाळ जुळवून घेण्यासाठी Bombay Progressive Artist’s Group, ज्यामध्ये एफ. एन. सुझा, एस. एच. रझा, एम. एफ. हुसेन, के. एच. आरा आणि एच. ए. गडे आणि यातील एकमेव शिल्पकार असणारे एस. के. बाकरे यांनी मिळून हा ग्रूप स्थापन केला. या ग्रूपमध्ये नंतर मनीष डे, रामकुमार, अकबर पदमसी आणि तय्यब मेहता हे सामील झाले. १९५० मध्ये वासुदेव गायतोंडे, क्रिशन खन्ना आणि मोहन सामंत (जे पुढे अमेरिकेत स्थायिक झाले) हेही सामील झाले. यांचा हा ग्रूप केवळ चित्रकला नव्हे, तर शिल्पकला आणि एकंदरीतच कलाविचार याविषयी भारताची हजार वर्षांची मोगल गुलामी परंपरा, दीडशे वर्षांची ब्रिटिश गुलामी परंपरा, १९४७ साली झालेली अखंड भारताची फाळणी आणि त्यानंतरचा अमानुष नरसंहार या पार्श्वभूमीवर सृजनाचे आणि कलेचे एक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बंड होते. त्याचे विवरण या ग्रूपने काही वाक्यांत जाहिरनामा स्वरूपात स्पष्ट केले होते. ते विवरण खालीलपमाणे :
“Paint with absolute freedom for content and technique, almost anarchic, save that we are governed by one or two sound elemental and eternal laws, of asthetic order, plastic coordination and colour composition”
१९५६ साली हा ग्रूप फुटला, तरीही भारताच्या मूळ कलात्मक सृजनशील नाळेशी जोडणारे हे बंड भारतीय कलाविश्वाला (लेखन असो, चित्र असो, शिल्प असो वा साधा लेख असो) कायमचे गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून नोंदवले गेले. कोणताही धर्म, धार्मिक संस्था, कोणत्याही धर्माच्या कट्टरवादी संघटना, सरकार/सरकारे किंवा प्रतिगामी गुलामी विचार करणारे गट हे कलावंताच्या स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाहीत, कारण हे स्वातंत्र्य अभिजात आणि प्राकृतिक आहे, याची जवळपास १२०० वर्षं तुटलेली नाळ भारताशी या बंडाने जोडली.
या ग्रूपमधील सुझा यांनी अनेक नग्न चित्रं वेगवेगळ्या रचनांमध्ये काढलेली आहेत. जन्माने ते कॅथॉलिक होते. जगभरच्या चित्रकारांनी खरं तर मूळ भारतीय परंपरेत अनुस्यूत असलेली दैवी नग्नता जगभर पसरवली. भारतात मूळ नग्न स्वरूपात असलेली चित्रं आणि शिल्पं ही गुलामीच्या आवरणाखाली कपडे घालून कॅलेंडरवर राजा रविवर्माने सादर केली. राजा रविवर्मा आणि दीनानाथ दलाल (दलाल हेसुद्धा एक मोठे चित्रकार होते) यांचे कॅलेंडरवरील देवी-देवता किंवा शिळा प्रेसमधून छापून आलेले देवी-देवता आपण पुजू लागलो तो म्हणजे आपल्या अपवृशीय दैवी परंपरांचा आणि कलावंतांचा निचांक होता. खरं तर राजा रविवर्मा आणि दीनानाथ दलाल यांच्या अगोदरही प्राचीन काळातसुद्धा मंदिरामध्ये शिल्पांना दगडी वस्त्रं घालण्याची अपवादाने पद्धत होती, पण ती मुख्य अट नव्हती.
खिलाफत, वक्फ बोर्ड, शंकराचार्यांची पिठे, व्हॅटिकन वगैरे वगैरे धर्माच्या संस्थांना कलेमध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार कधीच नव्हता, हे आधुनिक कलापरंपरेने पुन्हा पुन्हा बजावून सांगितलेले आहे. या आधुनिक परंपरेची जननी प्रबोधन काळानंतर युरोप ही ठरली. वास्तवात, हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत हे घडलेले होते. वर उल्लेखलेल्या प्रमाणे इस्लाममध्ये मनुष्य रूपात किंवा सगुण रूपात देव किंवा देवता यांची कल्पनाच अमान्य असल्यामुळे त्यांचे देव-देवता नग्न किंवा भग्न हे कसे दाखवणार?
खरा मुसलमान हा अल्लाची इबादत (प्रार्थना) करतो, प्रेषित महंमदांची नव्हे. त्यामुळेच प्रेषित महंमदाचेच मुस्लीम धर्मामध्ये चित्र उपलब्ध नाही किंवा त्याची पुजेसाठीची देवता अशी कल्पनाही उपलब्ध नाही. आज जे पाश्चिमात्त्य देशांमध्ये प्रेषित महंमदांचे कार्टून डेन्मार्क मध्ये काढले गेले किंवा चार्लि हेब्दोमध्ये छापले गेले ती केवळ कार्टुनिस्टची कल्पना होती, त्याचा महंमदांशी काही संबंध नव्हता. त्यातून निर्माण झालेली हिंसा ही धर्माच्या नावावर चालवणाऱ्या संस्थांना स्वत:च्या हिंसाचाराचा निकडतक्ता पुढे करण्याकरिता व स्वत:ची दहशत निर्माण करण्याकरिता मिळालेले कारण होते. त्याचा मुस्लीम संस्कृतीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे मुस्लीम चित्रं आणि शिल्पं परंपरेत राजेमहराजे, मशिदी-मिनार, महाल आणि इमारती यांची भव्य आणि नेत्रदीपक अशी प्रगती झाली. परंतु त्याला मानवी चेहरा नव्हता.
इस्लाम हे एक असे अपवादात्मक उदाहरण आहे, जिथे स्त्रीला चेहराच नाही, देवतांना चेहरा नाही, प्रेषिताला चेहरा नाही आणि ज्याची उपासना करायची आहे तो संपूर्णत: निर्गुण निराकार आहे. त्यामुळे कोणत्याही कलावंतासाठी पेच हा आहे की स्वर्गीय नग्नतेतील किंवा स्वर्गीय मैथुनातील दैवी तत्त्वं मुस्लीम धार्मिक इतिहासाचा आधार घेऊन निर्माण करणं केवळ अशक्यच आहे. पण याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची नग्नता किंवा मैथुन चित्रं किंवा मानवी शरीरसंबंध याचा कलात्मक आणि निरोगी आविष्कारच मुस्लीम समाजात नसल्यामुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाच्या मानसिकतेवर त्याचा निरोगी आध्यात्मिक प्रभाव पडला नसून सर्व धार्मिक शिक्षकांकडून, मुल्लामौलवींकडून इबादत केल्यानंतर सेक्सविषयक कोणकोणते फायदे पुरुषांना मिळणार आहेत, तेही केवळ भौतिक जगात नव्हे; तर मृत्यूनंतर मिळणार आहेत हे वारंवार मनावर ठसवलं जातं. भौतिक जगामध्ये किती बायका भोगता येतील, किती सेक्स गुलाम ठेवता येतील यापासून ते मृत्युनंतर ७२ हुरा कशा प्राप्त करता येतील, त्याचे तोडगे व उपाय काय याभोवतीच मुस्लीम मानस घुटमळत राहतं. याचा अर्थ नग्नता मैथुन शिल्पं, नग्न चित्रं, देवदेवतांच्या शरीरसंबंधातील वर्णनं आणि त्याची अभिजात कलेतील अभिव्यक्ती एखाद्या धर्मात नसेल, तर त्या धर्मातून कामुकता लोप पावायची सोडून ती उफाळून येते आणि सर्व शिकवण अचानक ‘सेक्स’ या एकाच विषयाभोवती फिरू लागते (जरी ती मूळ धर्मात अभिप्रेत नसली, तरी) याचं हे उत्तम उदाहरण आहे.
म्हणजे नग्नता आणि कामुकता, मैथुन यांच्या अभिव्यक्तीवरील बंदी ही माणसाला मुक्त करू शकत नाही. तर ती निरोगी कामुक बनवण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने कामुक बनवते, हेच या उदाहरणावरून दिसून येते. अनेक इस्लामी जिहादी, जिहादमधल्या मृत्यूनंतर आपल्याला कौमार्यभंग न झालेल्या ७२ हुरा भोगण्याकरिता मिळणार आहेत म्हणून केवळ आत्मघातकी पथकात दाखल होतात आणि सूसाइड बॉम्बर बनतात, हे उदाहरण स्वत:मध्ये पुरेसं बोलकं आहे. जेव्हा एम. एफ. हुसेन यांना कट्टरतावादी हिंदूंनी तुम्ही हिंदू देवदेवांची नग्न चित्रं काढली, तशी मुसलमानांची काढून दाखवा असे आवाहन दिले तेव्हा त्याचे उत्तर ते काय देणार होते? अर्थात, अभिजात कलावंताने, लेखकाने, विचारवंताने आणि शास्त्रज्ञाने आपल्या वाट्याला येणारा छळ निमूटपणे सहन करून आपले काम करावे आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या सर्वच धर्मातल्या अट्टल बदमाश आणि कट्टरवादी अज्ञानांना उत्तरं देण्यात वेळ वाया घालवू नये, हा अभिजाततेचा एक संकेत आहे. तोच हुसेन यांनी पाळला.
IMG_8669
(मध्य प्रदेशातील भोजशाला येथील संगमरवरी देवी सरस्वतीची मूर्ती . या देवतेची मूर्ती कर्झन वायलीने लुटून नेली.)
इथे सरस्वतीविषयी थोडेसे लिहायचे झाले, तर हिदू पुराणाप्रमाणे (मत्स्य पुराण) सरस्वती ही ब्रह्माची मुलगी जिची निर्मिती झाल्यावर स्वत: ब्रह्माला तिचे कामूक आकर्षण वाटल्यामुळे त्याने तिच्याशीच लग्न केले आणि या गुन्ह्याची (incest- एकाच कुटुंबातील सदस्यांशी किंवा जवळच्या नातेवाइकाशी लैंगिक संबंध ठेवणे) शिक्षा म्हणून शिवाने ब्रह्माचे एक डोके उडवले होते. चित्राचा हा पुढचा भाग हुसेन यांनी चित्रित केला असता, तर त्यांचे काय झाले असते, हे ब्रह्माच जाणो! शिवाय सरस्वती देवीची जवळपास पूर्ण नग्न किंवा अर्ध-नग्न भारतीय संस्कृतीत निर्माण झालेली शिल्प होती जी कट्टर वाद्यांना माहित नाहीत. त्यातली काही lord Curzon ने ब्रिटन मध्ये पळवून नेली.
केवळ भारतातच नव्हे, तर प्रबोधनपूर्व काळात युरोप आणि पाश्चिमात्त्य जगातसुद्धा नैतिकता, अध्यात्म, कला आणि शास्त्र या संबधीची आत्यंतिक खुळचट कल्पना जन्म घेत असते. त्याला ‘डार्क एज’ असे युरोपमध्ये नाव आहे. प्रबोधन (Renaissance) काळानंतर युरोप आणि पाश्चिमात्त्य जगातील देश बऱ्याच प्रमाणात या खुळचट कल्पानांमधून मुक्त झाले. परंतु भारतातील हिंदूवादी संघटना कलावादी विचार, कलेचे तत्त्वज्ञान, उच्च दर्जाची प्रतिभा आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांचा परिसस्पर्श न झाल्यामुळे मुस्लीम आक्रमणाच्या काळामध्ये स्त्रीला अधिकाधिक झाकण्याची प्रतिगामी पद्धत (जी पुढे व्हिक्टोरियन काळात चालू राहिली) हीच काहीतरी नैतिक आणि दैवी बाब आहे, असे विचार रूजले आणि फोफावले ज्याचे कलावंत, प्रतिभावंत, शास्त्रज्ञ बळी ठरू लागले.
आज आपण देवीदेवतांच्या पूजा करतो, मग ती भवानी माता असो की अंबामाता असो, विष्णू असो की, शंकर असो; या सर्व मूर्ती प्राचीन काळामध्ये नग्न स्वरूपात बनवलेल्या आहेत. देव आणि देवी यांना हिंदू धर्माप्रमाणे जगन्माता आणि जगत्पिता असे मानतात. मूल आणि आई, वडील आणि मूल यांच्यामध्ये नग्नता ही कामुकतेशी संबधित नसते, असा धार्मिक संकेत आहे, ज्या संकेताविरुद्ध आजच्या धार्मिक संघटना कार्यरत आहेत. महाभारतात आई आणि मुलामध्ये वस्त्र हे अहंकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानल्याची एक गोष्ट आहे.
गांधारीने आपल्या अंध नवऱ्यासाठी आयुष्यभर डोळ्याला पट्टी बांधून आपल्या डोळ्यातील प्रकाशऊर्जा बंद करून ठेवली होती. महाभारताच्या युद्धाअगोदर त्या उर्जेने आपल्या मोठ्या मुलाचे संपूर्ण शरीर संरक्षित करावे, म्हणून तिने दुर्योधनाला निर्वस्त्र व्हायला सांगितले. आजच्या कट्टरतावादी धार्मिक विचार करणाऱ्या संघटनांप्रमाणे विचार करणाऱ्या दुर्योधनाने गांधारी मातेचे शब्द ऐकून आपले गुप्तांग आणि मांड्या झाकतील, एवढेच कपडे अंगावर ठेवले आणि बाकी शरीर उघडले. गांधारीने जेव्हा डोळ्यावरील पट्टी काढून आपले नेत्र आपल्या मुलाच्या शरीरावर केंद्रित केले तेव्हा दुर्योधनाचे हे रूप पाहून तिने दु:खाने उसासा सोडला. तिच्या नेत्रातल्या उर्जेच्या कवचाचे संरक्षण दुर्योधनाच्या संपूर्ण शरीराला प्राप्त झाले, परंतु त्याच्या अज्ञान आणि अहंकाराच्या वस्त्रांमुळे आच्छादित असलेल्या त्याच्या मांड्या आणि गुप्तांग यांना आईच्या नेत्रातल्या प्रकाशउर्जेचं संरक्षण प्राप्त होऊ शकले नाही. ‘नग्न म्हणजे संपूर्ण नग्न असं मी तुला म्हटलं होतं,’ हे गांधारीने त्याला बोलूनही दाखवलं. महाभारताच्या अखेरीला दुर्योधनाचे नग्न न झालेले वस्त्राच्छादित त्याचे अवयव – मांड्या भिमाने गदेने फोडल्या आणि त्याचा शेवट झाला.
नग्नता ही निर्मितीची अंतिम पायरी आहे आणि मैथुन ही सृजनाची अंतिम पायरी आहे. त्यामुळे अभिजात शास्त्र आणि अभिजात कला या नैतिक किंवा अनैतिक असत नाहीत. त्या ननैतिक (amoral) असतात. डॉक्टरला किंवा कलावंताला झाकलेल्या शरीराची नैतिकता शिकवण्याने व त्याच्यावर या विचारांची दहशत निर्माण केल्याने व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या, मानव जातीच्या अस्तित्वाची, आरोग्याची आणि सांस्कृतिक पायाची हानी होते. केवळ हानीच होत नाही, तर त्याचे खच्चीकरणच होते.
या साऱ्याचा त्या त्या समाजावर गंभीर असा नकारात्मक परिणाम होतो. समाज आणि समाजमन निरोगी राहत नाही. झाडे, पाणी, पशुपक्षी आणि अतिशय दुर्मिळ झालेल्या भटक्या विमुक्त जमातींच्या नग्नतेत सहजता असते. त्यामुळे मन निरोगी बनून त्यातून कामुकता आणि हिंसाचार निर्माण होत नाही.
आदिवासींमध्ये अपदवादात्मकसुद्धा बलात्कार होत नाहीत.
याउलट नागर समाजात घरामध्येच दुर्बल घटकांवर, स्त्रियांवर घरामधीलच सबल आणि मोठी मंडळी अत्याचार आणि बलात्कार करताना आढळतात, त्याच्या बातम्याही येतात. जे घरात घडते तेच समाजातही घडते. मग आपण प्रश्न नेमका कुठे सुरू होतो, याचा विचार न करता कायदे अधिक कडक करा, अशी मागणी करतो. कायदे कितीही कडक केले, तरी अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण कमी होत नाही असे संख्याशास्त्र दाखवते.
त्याचे खरे मूळ धार्मिक टोळ्यांनी अभिजात सृजनशील कलावंतावर आणि बुद्धिवंतावर घातलेल्या कृतक बंधनात आहे. राजकीयदृष्ट्या सोयीचे नसले, तरीही हे सत्य पचवल्याशिवाय आपण अनुक्रमे अभिजात शास्त्र, अभिजात कला आणि सर्वात शेवटी खऱ्या अर्थाने अभिजात अध्यात्म (बाबा बुवा नव्हे)आणि शेवटी अभिजात ज्ञान निर्माण करू शकत नाही. उपनिषदांमध्ये ज्ञानाविषयी एक फार सुंदर बोधकथा आहे. ज्ञान हे अग्निसारखे असून ते अज्ञानाच्या गवताला जाळते आणि त्यानंतर अग्निच्याही अस्तित्वाचा विलय होतो. त्यामुळे अज्ञान संपल्यावर ज्ञान विलयाला जात असल्यामुळे अशा अभिजात ज्ञानाचा अहंकार उरत नाही, हा या बोधकथेचा अर्थ.
ज्या भूमीत उपनिषदे निर्माण झाली, त्या भूमीत अज्ञानाच्या गवताचे तण एवढे माजावे हे केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या धोक्याचे नसून व्यक्तिगत आणि राजकीय दृष्ट्याही घुसमटवून टाकणारे आहे.
हुसेन यांच्या चित्राची जी कथा झाली, तशीच वेगळी कथा सलमान रश्दी यांच्या किंवा तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकाची झाली आणि यामध्ये सरकार सहभागी होतं. सरकार याचा अर्थ कोणत्या एका पक्षाचे सरकार नव्हे, तर जे सत्तेत येईल ते सरकार. लेखकाने काय लिहावे, चित्रकाराने कोणती चित्रे काढावीत, लेखक आणि कलावंतांनी धर्माचा कसा अनुनय करावा, सत्य असले तरी बहुसंख्य लोक ज्याच्या विरोधात आहेत, ती गोष्ट चित्रित करू नये किंवा लिहु नये हे सारे सरकारे ठरवू लागली. धार्मिक गट, मग तो मुस्लीम असो, ख्रिश्चन असो, हिदू असो वा अजून इतर कोणत्या धर्माचा असो; यांच्या भावना आळीपाळीने कधी नाटकामुळे, कधी चित्रांमुळे, कधी पुस्तकामुळे कधी पेयामुळे, कधी खाद्यपदार्थांमुळे, कधी ध्येयामुळे तर कधी घोषणांमुळे दुखावल्या जाऊ लागल्या. अशा प्रकारच्या सप्तस्वातंत्र्यावर बंदी घालण्याची परंपरा आणि त्या विचारवंताला, लेखकाला, बुद्धिवंताला छळण्याची परंपरा ही कम्युनिस्ट, इस्लामिक आणि हुकूमशाही देशात नवी नाही. तिथल्या प्रचारयंत्रणा हे ‘प्रो- पीपल’ आहे म्हणजे, लोकांसाठी आहे असे सांगून करतात. भारतात संविधान प्रत्येक नागरिकाला खूप मोठे स्वातंत्र्य बहाल करते. ज्याचा तर्क दिलेला आहे किंवा अभिजात सदरात मोडते असे कोणतेही अस्तित्व, कृती भारतीय नागरिक करू शकतो. भावना दुखावणे, ही रंजक कल्पना आहे. भावना कशानेही दुखावू शकतात.
नुकतेच भाजप सरकार आल्यावर  ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे मुंबईत एका नाटकावर बंदी घालण्यात आली. त्याच वेळी बिहारमध्ये नितीश सरकारने दारूवर बंदी आली. महाराष्ट्रात बीफ खाण्यावर बंदी आली. तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’पासून ‘घाशीराम कोतवाल’ पर्यंतच्या नाटकांना झुंडशाहीला सामोरं जावं लागलं होतं. भारत हा सर्वांत जास्त बीफची निर्यात करणारा देश आहे. एम. एफ. हुसेन यांना आधुनिक भारताचे पिकासो असे संबोधले जाते. देशात दारूपेक्षा, बेगॉन पिऊन जास्त लोक लगेच मरतात, पण बेगॉनवर बंदी नाही. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतो, पण गळफासावर बंदी नाही. चित्रकलेचा प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी कला विद्यालयात अधिकृतरित्या नग्न स्त्री, पुरुषाला समोर झोपवून अॅनाटॉमीच्या तासाला न्यूड रेखाचित्र काढतो. तो त्याच्या विषयाचा, अभ्यासाचा भाग आहे. कला महाविद्यालयात मॉडेल म्हणून अॅनाटॉमीच्या तासाला नग्न स्त्री आणि पुरुष पोझेस देतात आणि हे विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याचे रेखाचित्र काढतात. डॉक्टरी शिक्षण घेत असताना नग्न स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराच्या आधारे याच अॅनाटॉमीचा अभ्यास, होऊ घातलेले डॉक्टर्स करतात. या साऱ्यातून त्या विद्यार्थी-विद्यार्थिनीं मध्ये किंवा मॉडेल्समध्ये कामुकतेची प्रचंड वाढ झालेली आढळून आलेली नाही. किंबहुना त्यांनी ते केले नाही तर समाजाला चांगले डॉक्टर्स, चित्रकार मिळणार नाहीत किंवा या शिकावू डॉक्टर्सना, या शिकावू चित्रकारांना ‘तुझ्या आईबहिणीला सांगशील का अशी पोझ द्यायला किंवा त्यांच्यावर असे प्रयोग करशील का,’ म्हणून कोणतीही धार्मिक संघटना प्रश्न विचारताना दिसत नाही!!!
या परस्परविरोधी गोष्टींची जंत्री इथे देण्याचं मूळ कारण हे की, कोणत्याही प्रकारचं moral policing हे मागासलेल्या समाजाचे लक्षण होय. आपल्या देशात ब्रिटिश कायदे आल्यावर या moral policing ला सरकारी पाठबळ लाभले. ब्रिटिश गेले, त्यांनी त्यांच्या देशातले कायदेही बदलले. परंतु १९५२ पासून जेव्हा निवडणुका होऊन त्याद्वारे आपले अस्सल भारतीय सरकार सत्तेत आले तेव्हापासून आजपर्यंत बंदी, moral policing, कलावंत, बुद्धिवंताची यातून होणारी अवहेलना, अटकसत्र प्रचंड वाढलेलं आहे किंबहुना ऊत आलेला आहे आणि आता तर त्याला राज्या-राज्यात पाठबळही मिळत आहे. मग राजकीय पक्ष कोणताही असो!  मतांसाठी लोकानुयाच्या वेगवेगळ्या कल्पना, प्रश्नाचा अभ्यास न करता उत्तर देण्याची उथळ वृत्ती, झुंडशाही करणारे जातीय आणि धार्मिक गट आणि १९ व्या शतकातला ब्रिटिश कायदा या सर्वांनी मिळून या देशातली ‘अभिजातता आणि जीनिअस’ मारून टाकलेला आहे. भारत हा राजकीय टोळ्यांचा देश बनलेला आहे आणि त्याला Draconian ब्रिटिश  कायद्याचा आधार आहे.
आज एखादा वात्सायन, कामशास्त्र लिहिल, हजारो कलावंत मिळून खजुराहोसारखी नग्न शिल्पं उभी करतील, त्यांना आवडेल ते ते खातील आणि हवा तेव्हा सोमरस पितील आणि या साऱ्याला सरकारची राजमान्यता (मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो) मिळेल, अशी कल्पना करून बघा. असं होऊ शकतं का, हा प्रश्न स्वत:लाच विचारून बघा! कोणतंही दमन हे लोकशाहीला मान्य नसतं. याला एक कारण आहे. दमन, प्रवृत्तीचं शमन न करता ती प्रवृत्ती भडकवते. आजही आपल्या समाजात समलैंगिकतेवर ‘उपचार’ करू असा दावा करणारे लोक आहेत! आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही आहे!!
असा देश आणि असा समाज प्राचीन सुवर्णयुगात जाणं शक्य आहे काय? किंवा आधुनिक महासत्ता बनणं, हे या प्रकारच्या मानसिकतेच्या पंखात बळ आणणारं आहे काय?
एम. एफ. हुसेन अखेरच्या काळात भारत सोडून गेले. ते हयात असताना त्यांच्याशी बोलताना एक वेगळीच गोष्ट कळली. कट्टरवादी टोळ्यांच्या झुंडशाहीला तोंड देताना हा अस्सल भारतीय कलावंत जेरीला आला होता. पण त्याने देश सोडला, तो त्यासाठी नव्हे. ते म्हणाले, भारतीय करप्रणाली, करअधिकारी माझ्या चित्रांच्या किमती विचारतात. एकाच आकाराच्या दोन चित्रांची किंमत वेगवेगळी किंवा कमी-अधिक का, हे मला सांगायला सांगतात. याचं  तर्कशुद्ध उत्तर एक कलावंत म्हणून मी देऊ शकत नाही आणि त्यामुळे मी जवळपास गुन्हेगार आहे, अशी वागणूक करअधिकारी देतात आणि हे चक्र अखंड चालू राहते. या छळाला कंटाळलेल्या एम.एफ हुसेन यांना कतार या देशाने आनंदाने आमंत्रण दिले आणि एम.एफ हुसेन यांनी कतारमध्ये आश्रय घेतला. पंढरपूरमध्ये जन्म घेतलेल्या आणि सिनेमांची पोस्टर्स रंगवून एके काळी उपजीविका करणाऱ्या या महान कलावंताने स्वत:च्या चित्रांच्या बळावर मिळवलेल्या पैशाच्या जोरावर कतारमध्ये गेल्यानंतर दुबईमध्ये एकरकमी पैसे देऊन लॅम्बॉर्गिनी ही गाडी विकत घेतली, जे भारतात त्यांना कधीही शक्य झालं नसतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन मात्र (निधर्मी) लंडनमध्ये झाले.
अनेक पातळ्यांवर झुंडशाही आणि सरकार यांनी हातमिळवणी करून वेगवेगळ्या धर्मांच्या आणि जातींच्या सहाय्याने टोळ्या करून अलौकिक प्रतिभावंत, कलावंत, लेखक आणि विचारवत यांची परवड स्वातंत्र्योत्तर (१५ ऑगस्ट १९४७ पासून) काळापासून आजपर्यंत चालू आहे, ती थांबवण्यासाठी कोणतीही व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतेही अलौकिक नेतृत्व काम करताना दिसत नाही. ही घुसमट अखेर एक दिवशी एकतर ज्वालामुखी बनेल किंवा या सपूर्ण समाजाला रसातळाला घेऊन जाईल.
ढोंगाला ऑक्सिजनचे सिलिंडर मिळतात आणि सत्याला घुसमटीचे चेंबर नशिबी येतात, तेव्हा हाडाला भेदून जाणारं अॅसिड लिहावं लागतं. हा त्या अॅसिडचा एक थेंब. हा थेंब जी जखम निर्माण करेल आणि जिथे जखम निर्माण करेल, ती अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील जखमेसारखी कधीही बरी होणार नाही. त्या जखमेवर लावायला तेल मागण्याची वेळही आता निघून गेलेली आहे!!
rajuparulekar1@gmail.com
(M) 9820124419

लिंक  https://rajuparulekar.wordpress.com/2016/04/18/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%AE/

Thursday, 20 April 2017

दस्तावेज: गोहत्याबंदी आणि गांधीजी लेखक - गांधीजी


लेखक - गांधीजी

राजेंद्रबाबूनी मला सांगितले की त्यांच्याकडे गोहत्याबंदीची मागणी करणारे  सुमारे ५०,००० पोस्टकार्ड्स, २५,०००-३०,००० पत्रे व हजारो तारा येऊन पडल्या आहेत. मी तुमच्याशी ह्यापूर्वी ह्या विषयावर बोललो होतो. हा पत्र आणि तारांचा पूर कशासाठी? त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही.
मला एक तार मिळाली ज्यात सांगितले आहे की एका मित्राने ह्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे. भारतात गोहत्याबंदीसाठी कोणताही कायदा करता येणार नाही. हिंदूंमध्ये गोहत्या निषिद्ध मानली जाते ह्याबद्दल मला काही शंका नाही. मी फार पूर्वीच गोसेवेची प्रतिज्ञा केली आहे. परंतु माझा धर्म हा देशातील इतरांचा धर्म कसा बनू शकेल? त्याचा अर्थ हिंदू नसणाऱ्या भारतीयांवर जबरदस्ती करणे असा होईल.
धर्माच्या बाबतीत कोणावरही जुलूम-जबरदस्ती होणार नाही असे आम्ही कंठशोष करून सांगत आहोत. प्रार्थनेच्या वेळी आम्ही कुराणातील काही पंक्तींचे पठन करतो. पण कोणी जर माझ्यावर त्या म्हणण्याची जबरदस्ती केली, तर मला ते आवडणार नाही. एखाद्या व्यक्तीला जोवर तसे मनापासून वाटत नाही, तोपर्यंत मी कोणालाही गोहत्या न करण्यासाठी कसा बाध्य करू शकतो? भारतात फक्त हिंदूच तेव्हढे राहत नाहीत. इथे मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन व इतर धर्म समुदाय देखील राहतात.
भारत हा आता हिंदूंचा प्रदेश झाला आहे असे हिंदूंनी मानणे चुकीचे आहे. इथे राहणाऱ्या सर्वांचा हा देश आहे. समजा आपण इथे गोहत्येवर बंदी आणली आणि त्याच्या नेमके उलट पाकिस्तानात घडले, तर काय होईल? समजा त्यांनी असे म्हटले की शरियतनुसार मूर्तीपूजेला बंदी आहे, म्हणून कोणत्याही हिंदूला मंदिरात जाता येणार नाही? मला तर दगडातही देव दिसतो, पण माझ्या ह्या श्रद्धेमुळे इतरांची काय हानी होते? म्हणून माझ्या  मंदिरात जाण्यावर  जर  बंदी घालण्यात आली, तर मी ती पाळणार नाही. म्हणून मी असे सुचवितो की ह्या तारा आणि पत्रे आता बंद केली पाहिजेत. त्यांच्यावर पैसे नासणे योग्य नाही.
त्याशिवाय काही संपन्न हिंदू स्वतः गोवधाला उत्तेजन देतात. हे खरे  आहे की ते आपल्या हातांनी गोहत्या करीत नाहीत. पण गायींना ऑस्ट्रेलियातल्या कत्तलखान्यात पाठवून त्यांच्या चामड्यापासून पादत्राणे बनवली जातात, ते लोक कोण असतात? माझ्या ओळखीचा एक सनातनी वैष्णव हिंदू आहे जो आपल्या मुलांना बीफ सूप देत असे. मी त्याला त्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की गोमांस औषध म्हणून खायला काही हरकत नाही. आम्ही खरा धर्म काय आहें ह्याचा विचार करत नाही, फक्त गोहत्येला कायद्याने बंदी घातली पाहिजे म्हणून ओरडा तेव्हढा करतो. हिंदू लोक बैलांच्या खांद्यावर एव्हढे ओझे लादतात की त्यांचा जवळजवळ चुराडाच होतो. ही संथपणे केलेली गोहत्याच नव्हे काय? म्हणून मी असे सुचवीन की संविधान समितीत ह्या मुद्द्यावर फारसा आग्रह धरला जाऊ  नये*
मला असे विचारण्यात येते आहे की “मुसलमानांनी केलेले अत्याचार पाहता, कोणत्या मुसलमानांवर विश्वास ठेवावा हे ठरविणे कठीण होत आहे. (ह्या संदर्भात) भारतातील मुस्लिमांविषयी आपला काय दृष्टिकोन असावा? पाकिस्तानातल्या गैर-मुस्लिमांनी काय करावे?”
मी ह्या प्रश्नांचे उत्तर ह्यापूर्वीही दिले आहे. मी पुन्हा सांगतो की आज भारतातल्या सर्व धर्मांच्या कसोटीचा काळ आहे. येथील हिंदू, मुस्लीम , शीख व ख्रिश्चन ह्यांसारखे धार्मिक समुदाय कसे वागतात आणि भारताचा कारभार कसा चालवितात ह्याकडे आपल्याला लक्ष पुरवावे लागेल. पाकिस्तान केवळ मुसलमानांचा असेल, पण भारत सर्वांसाठी आहे. जर तुम्ही भेकडपणा सोडला आणि शूर बनला तर तुम्हाला मुसलमानांसोबत कसे वागावे हा प्रश्न पडणार नाही. पण आजही आपल्यात भेकडपणा भरला आहे. त्यासाठीचा माझा दोष मी आधीच स्वीकारला आहे.
माझी तीस वर्षांची शिकवण प्रभावहीन कशी ठरली ह्याचे मला अजूनही आश्चर्य वाटते. अहिंसा हे भेकडांचे शस्त्र बनू शकेल असे मी कसे गृहीत धरले? आताही जर आम्ही खरोखर शूर बनू शकलो आणि मुसलमानांवर प्रेम करू शकलो तर त्यांनाही थांबून विचार करावा लागेल की आपल्याशी दगाबाजी करून त्यांना काय मिळणार आहे? त्यांना आपल्या प्रेमाचे उत्तर प्रेमानेच द्यावे लागेल. आपण भारतातील कोट्यवधी मुस्लिमांना गुलाम बनवून ठेवू शकतो का? आपण जर तलवारीचा जवाब तलवारीने, काठीचा काठीने आणि लाथेचा लाथेने दिला तर पाकिस्तानात काही वेगळे घडण्याची अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. मग आपले स्वातंत्र्य गमवायला आपल्याला काहीच वेळ लागणार नाही.

संदर्भ: प्रार्थना प्रवचन – भाग १, पृ. २७७-२८० )

गोमांस आणि पाच प्रकरणे




लेखक - श्याम पाखरे


   गोमांस ह्या सध्याच्या वादग्रस्त प्रश्नाशी संबंधित इतिहासाची काही महत्त्वाची पाने कोणत्याही टिप्पणीविना उलगडून दाखवत आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक तरुण अभ्यासक
——————————————————————–
प्रकरण 1 : 10 डिसेंबर 2015 जागतिक मानवाधिकारदिनी तेलंगणातील ओस्मानिया विद्यापीठाचा परिसर युद्धभूमी बनला होता. निमित्त होते गोमांस विरुद्ध वराहमांस विवाद. गोमांसबंदी व त्यासंदर्भात देशभर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक कल्चरल फोरम या डाव्या विचारांच्या विद्यार्थीसंघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीला न जुमानता विद्यापीठपरिसरात गोमांसउत्सव साजरा करण्याचे ठरविले. यास प्रतिक्रिया म्हणून ओ.यु.जॅाईंट अॅक्शन कमिटी या दुसऱ्या संघटनेने वराहमांस उत्सवाचे आयोजन करण्याचे जाहीर केले. भाजपाचे आमदार श्री. राजा सिंग यांनी त्यांच्या गौसंरक्षण समितीद्वारे ‘चलो ओस्मानिया’ चा नारा दिला. बजरंग दल व भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गौपूजा व यज्ञाचे आयोजन करत असल्याचे जाहीर केले. सकाळपासूनच विद्यापीठाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. तणाव वाढत गेला. राज्यपरिवहन मंडळाच्या बसेसवर काहींनी दगडफेक केली. पोलिसांनी 330 जणांना ताब्यात घेतले आणि विविध संघटनांचे नियोजित कार्यक्रम उधळून लावण्यांत आले.  (सौजन्य ‘दि हिंदू’  11/12/2015)
प्रकरण 2 : मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान-संकल्पनेचे समर्थक बनवण्याआधीची एक घटना, तेव्हा ते कॉंग्रेसचे एक राष्ट्रवादी नेते होते आणि बॅाम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत उभे होते. मतदानाचा दिवस होता. जिन्ना टाऊन हॅाल, आताची एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथील मतदान केंद्रावर आपले सहकारी एम.सी. छगला यांच्यासोबत उपस्थित होते. दुपारच्या भोजनावकाशाच्या वेळी साधारणत: 1 वाजता मिसेस जिन्ना त्यांच्या आलीशान लिमोझिनमधून टाऊन हॅालला आल्या. त्यांनी सोबत जिन्नांसाठी जेवणाचा डब्बा आणला होता. डब्यात पोर्क सॅडविचेस होते. जिन्ना पोर्क खात असत. परंतु त्यावेळी पोर्क सॅडविचेस बघताच त्यांचा चेहरा खाडकन उतरला आणि ते वैतागून मिसेस जिन्नांना म्हणाले, “ओह गॅाड! तू हे काय केले आहेस? मी निवडणूक हरावे असे तुला वाटते काय? मी मुस्लिम विभक्त मतदार संघातून निवडणूक लढवत आहे, हे तुला कळत नाही काय? जर माझ्या मतदारांना कळले, की मी दुपारच्या जेवणात पोर्क सँडविचेस खात आहे, तर स्वप्नातसुद्धा ही निवडणूक मी जिंकू शकणार नाही”. (पृ.117-118, रोझेस इन डिसेंबर, ऑटोबायोग्राफी, एम.सी.छगला, भारतीय विद्याभवन, बॅाम्बे, 1973)
प्रकरण 3 : हिंदुत्वाचे जनक स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांनी 1935-36 साली महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारे गायीवरील निबंध लिहिले. “गाय एक उपयुक्त पशु! माता नव्हे! देवता तर नव्हेच नव्हे!” या निबंधात ते लिहितात, “प्रश्न एका फुटकळ प्रकरणाचा नाही, तर एका सर्वस्पर्शी राष्ट्रीय प्रवृत्तीचा आहे. पोथीनिष्ठ की प्रत्यक्षनिष्ठ, पुरातन की अद्यतन, प्रश्नशून्य विश्वासशील “धर्म” की प्रश्नशील प्रयोगक्षम विज्ञान? ह्या दोन प्रवृत्तींपैकी अद्यतन, प्रत्यक्षनिष्ठ नि प्रयोगसिद्ध विज्ञानच आजच्या परिस्थितीत नि आजच्या जागतिक प्रतिस्पर्धेस आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे! आणि ह्या प्रवृत्तीला जर गोपूजा तुमची न पटली तर ती टाकावूच ठरली पाहिजे… एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तर चालेल, पण उगवत्या राष्ट्राची बुद्धी हत्या होता कामा नये.” ( पृ.24-25, क्ष किरणे, वि.दा. सावरकर, रिया पब्लिकेशन, कोल्हापूर 2012)
पुढे ते लिहितात, “…….. कोणते मांस खाद्य ते धर्मग्रथांच्या टिपणीत न पाहता वैद्यकाच्या कोष्टकात पाहावे. वैद्यकदृष्ट्या कोणास डुकराचे मांस हितावह असेल, तर त्याला तेच धर्म्य. मनुस्मृतीत वराहाचे मांस खाण्याचा ब्राह्मणांनादेखील जवळजवळ आग्रहच केलेला आहे. जे डुक्कर खात नाहीत त्यांचे म्हणणे असते की, डुक्कर घाण खाते यासाठी ते धर्मत: निषिद्ध मांस! पण गायही घाण खाते। गाय, बैल, म्हैस हे दूध नि शेतीकाम या दृष्टीने मनुष्याच्या अत्यंत उपयोगी माणसाळू असे पाळीव पशू, त्यांना शक्य त्या दयेने पाळावे, पण तरीही ज्या परिस्थितीत त्यांच्यावर दया केल्याने मनुष्याच्या जिवावर बेतते, त्या परिस्थितीत काही ती दया उक्त ठरणार नाही….” (पृ.131-तत्रैव)
प्रकरण 4 : 13 ऑक्टोबर 1972 रोजी रग्बी युनियन टीम, त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि सहकारी अशा 45 जणांना घेऊन जाणारे उरुग्वेयन एअर फोर्स लाईट क्र.571 दक्षिण अफ्रिकेतील बर्फाच्छादित अॅन्डीज पर्वतावर कोसळले त्यात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. 27 जण बचावले. परंतु ते 11800 फूट उंचीवर जीवघेण्या थंडीत अन्नपाण्यावाचून अडकून पडले. सात दिवसांच्या प्रयत्नानंतर शासनाने शोधमोहीम थांबवल्याचे त्यांना रेडिओवरून कळाले. उपलब्ध अन्नाचा साठा संपला होता. खचून न जाता त्यांनी यातून मार्ग काढण्याचा निर्धार केला आणि सभ्य समाजाला घृणा वाटेल असा एक निर्णय सामूहिकरीत्या घेतला. त्यांनी आपल्या आप्तमित्रांच्या मृत शरीरमांसाचे सेवन केले. त्यांतील दोघांनी 10 दिवसांचा प्रवास करून पर्वत ओलांडला आणि ते जिवंत असल्याची बातमी बाहेरील जगाला कळवली. एकूण 72 दिवसानंतर त्या सर्वांची सुटका करण्यात आली. त्यातील एक डॉ. कॅनेसा हे आज एक प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यावेळी ते मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे 19 वर्षीय तरुण होते. ते त्या क्षणाची आठवण सांगतात, “”मला माझ्या आईची आठवण आली, आणि मला कोणत्याही परिस्थितीत तिला भेटायचे होते. मी माझ्या प्रिय मित्राच्या मृत शरीराचा एक तुकडा उचलला व खाल्ला “जगण्यासाठी”.  (मेल ऑन लाईन न्यूज 13/10/2012)
प्रकरण 5 : नवी दिल्ली दिनांक 25 जुलै 1947, गांधीजी प्रार्थनासभेत म्हणतात, “…..भारतामध्ये गोहत्याबंदी करणारा कोणताही कायदा होऊ शकत नाही. मी जाणतो की हिंदूंसाठी गोहत्या निषिद्ध आहे. मी स्वत: अनेक वर्षांपासून गाईची सेवा करण्यास प्रतिबद्ध आहे. परंतु माझा धर्म हा इतरांचाही धर्म कसा होऊ शकेल? तसे करणे म्हणजे हिंदू नसलेल्या इतर भारतीयांवर जबरदस्ती करणे होईल… या देशात फक्त हिंदू राहत नाहीत. येथे मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धार्मिक समूह देखील राहतात. हिंदूची अशी धारणा की आता हा फक्त हिंदूचा देश आहे, चुकीची आहे. हा देश येथे राहणाऱ्या सर्वांचा आहे. येथे गोहत्याबंदी कायदा केला तर त्याविरुद्ध पाकिस्तानात घडेल. समजा त्यांनी असे म्हटले की शरीयतच्या विरुद्ध असल्याने हिंदू मंदिरात जाऊन मूर्तिपूजा करू शकत नाहीत, तर? मी दगडातसुद्धा देव पाहतो. परंतु या भावनेच्या आधारे मी इतरांना हानी पोहचवू शकत नाही.” (समग्र गांधी वाङ्मय खंड 96)

link http://aajachasudharak.in/2016/01/1083/

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...