Flash

Sunday, 11 June 2017

*बाबासाहेब आणि शेतकरी*

‘दलितांचे कैवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे महावाक्य इतक्या वेळा मनावर आदळले की शेवटी बाबासाहेब हे केवळ दलित आणि दलितांचेच नेते होते, असा या देशातील असंख्य लोकांचा समज झाला व आजही तो कायम आहे. परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. त्यांनी केवळ दलितांसाठी नव्हे तर या देशातील तमाम वंचित व शोषितांसाठी कार्य केले. खासकरून शेतकरी, शेतमजूर व महिलांच्या प्रश्नांची विशेष चिकित्सा करून त्यांनी त्यावर उपाय सुचविले. परंतु त्यांच्या कृषीविषयक विचारांची दखल तत्कालीन राजकीय धुरीणांनी घेतली नाही.

शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण करणारी खोती पद्धती त्या काळी कोकणात अस्तित्वात होती. डॉ. आंबेडकरांनी खोती पद्धतीचे प्राबल्य नष्ट करण्यासाठी लढा दिला. १९०५ ते १९३१ या काळात पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा झाल्या. त्यानंतर खोतांना जबर हादरा देण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला व या संपात १४ गावचे शेतकरी सहभागी झाले.

त्या काळीसुद्धा शेतकरी वर्गाला दुष्काळास तोंड द्यावे लागत असे. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या विविध योजना सुचविल्या त्यापैकी ‘पीक विमा योजना’ ही एक महत्त्वाची योजना होती. शेतजमिनीचे निरंतर होणारे तुकडेकरण हे शेती व्यवसायाच्या अधोगतीचे एक महत्त्वाचे कारण होते. सप्टेंबर १९१८ रोजी शेतजमिनीच्या तुकडेकरणाच्या समस्येवर ‘स्मॉल होल्डिंग इन इंडिया अ‍ॅण्ड देअर रेमडीज’ अशा आशयाचा एक शोधनिबंध डॉ.आंबेडकरांनी ‘जर्नल आॅफ इंडियन इकॉनॉमिक सोसायटी’ या मासिकात प्रकाशित केला.

शेतीवरील श्रमशक्ती उद्योगधंद्यात वळवली पाहिजे, त्यातूनच शेती व्यवसायातील दरडोई उत्पन्न वाढेल. त्यांनी शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की, गावातील शेती सर्व शेतकऱ्यांनी मिळून पिकवावी. तिच्यासाठी भांडवली खर्च राज्य सरकारने करावा आणि शेतीतला माल निघाल्यावर त्याची वाटणी करारातील अटीनुसार शेतकरी व सरकारमध्ये व्हावी. पण त्या वेळच्या सरकारांनी शेतीच्या या समाजवादाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले.

शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने करावी म्हणून त्याकरिता काही महत्त्वाकांक्षी योजनादेखील बाबासाहेब सुचवतात. दामोदर नदीचा प्रकल्प, नद्या जोडण्याचा प्रकल्प व सिंचनाचे प्रकल्प या त्यांच्या बुद्धिसामर्थ्यातून अवतरलेल्या फारच महत्त्वाच्या योजना होत्या. त्याचबरोबर त्यांचा असा आग्रह होता की, शेतीसाठी मुबलक व स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांनी तेव्हाच हे सांगून ठेवले होते की शेती व तिच्यासाठी लागणारी सिंचन व्यवस्था व विद्युत पुरवठा इत्यादीचे मानवतावादी दृष्टीने व्यवस्थापन केले नाही तर येणाऱ्या काळात आमचा शेतकरी आत्महत्त्या करील. त्यांची ती भीती आज दुर्दैवाने खरी ठरत आहे. शेतीला बाबासाहेब इंडस्ट्री म्हणत. पण सरकार कृषी क्षेत्रात किती गुंतवणूक करते?

डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२३ (ब) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी खास लवाद निर्माण करण्याची तरतूद केली. या लवादाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मालाचा भाव स्वत:च ठरवू शकतो. कमी भाव मिळाला तर न्याय मागू शकतो. परंतु दुर्दैव असे की आतापर्यंत आमच्या देशात शेतकऱ्यांसाठी असा एकही लवाद निर्माण करण्यात आलेला नाही. बाबासाहेब केवळ दलितांचे नेते होते, शेतकऱ्यांशी त्यांचा काही एक संबंध नाही, असा गैरसमज करून आम्ही आमचे भरपूर नुकसान करून घेतले आहे.

*Source :-*
दै. लोकमत, २ जून २०१७
http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=12125907

Friday, 9 June 2017

गांधीहत्या, कपूर आयोग व सावरकर - अक्षय जोग



आयोगाचे निष्कर्ष वा त्यांच्यासमोरील पुरावे न्यायालयावर बंधनकारक नसतात. न्यायालय ते फेटाळू शकते, पण न्यायालयाचे निर्णय फेटाळण्याचा वा चूक म्हणण्याचा अधिकार आयोगाला नसतो. आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असले, तरी विशेष न्यायालयाचा निर्णयाधिकार त्यांच्यापेक्षा वरचढ असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुध्द सरकार अपिलात गेलेच नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो.
गांधीहत्येमध्ये सावरकरांचा सहभाग नव्हता, हे सिध्द करणारा पुरावा सावरकरांच्या जयंतीदिनीच स्वा. सावरकरांचे अभ्यासक पंकज फडणीस ह्यांना सापडला. अमेरिकन वकिलातीतील अधिकारी डोनोवन यांनी दि. 8 ऑॅगस्ट, 1948ला वॉशिंग्टन येथे अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांना पाठविलेल्या आपल्या अहवालात ही गोष्ट नमूद केली आहे की, गांधीहत्येच्या खटल्यातील सरकारचे विशेष वकील सी. के. दफ्तरी यांनी त्यांना सांगितले की, 'त्यांच्याकडे सावरकरांविरोधात कोणताही सबळ पुरावा नसून जे दावे केले जात आहेत, ते पोकळ असून त्यांच्या मते सावरकरांची सुटका होईल. गांधीहत्येच्या खटल्यात इतक्या लोकांना गोवण्यात सरकारची चूक झाली असून या हत्येत जेवढे प्रत्यक्ष सहभागी झाले होते, त्यांच्यापुरताच हा खटला चालविणे उचित ठरले असते.'
हाती आलेल्या या नवीन पुराव्याच्या निमित्ताने गांधीहत्या-कटातून सावरकरांना विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले असतानाही कपूर आयोगाच्या निष्कर्षान्वये सावरकरांना गांधीहत्या-कटाचे सूत्रधार ठरवून निराधार आरोप केले जातात, त्या आरोपांचा प्रतिवाद हा या लेखाचा हेतू आहे.
आयोग व न्यायालय ह्यातील फरक
प्रथम आपण आयोग व न्यायालय ह्यातील मूलभूत फरक समजून घेऊ. आयोग हा न्यायालयाला पर्याय नाही किंवा त्यावरील अपिलीय अधिकारही नाही. आयोगाचे कायदेशीर नाव 'Inquiry Commission' असे आहे. म्हणजे पुरावा गोळा करणारी उच्चस्तरीय यंत्रणा, त्याला शिक्षा करण्याचा अधिकार नसतो. आयोगाला पोलीस यंत्रणेपेक्षा चौकशीचे थोडे जास्त अधिकार असतात, एवढाच काय तो फरक. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानुसार 'चौकशी आयोग' ही 'चौकशी आयोग कायदा, 1952'अन्वये स्थापन झालेली पुरावा गोळा करणारी संस्था आहे. कोणताही निर्णय देणारी न्यायसंस्था नव्हे.1 आधीच दिलेला एखादा न्यायनिर्णय कसा होता, यावर कुठलीही टिप्पणी करण्याचे अधिकार आयोगाला कधीच नसतात. उच्च न्यायालयाविरुध्द किंवा उच्च न्यायालयाच्या निकालातील त्रुटी शोधण्यासाठी हा आयोग 'कोर्ट ऑॅफ अपील' म्हणून स्थापन झालेला नाही, असे स्वत: न्या. कपूरांनी मान्य केले आहे.2 आयोगाचे निष्कर्ष शासन स्वीकारू वा नाकारू शकते व जर स्वीकारले, तर आरोपींना शिक्षा होण्यासाठी शासनाला - म्हणजे पोलिसांना न्यायालयातच जावे लागते. आयोगाने अमक्याला दोषी धरले आहे, तेव्हा तो निष्कर्ष स्वीकारून त्याला शिक्षा करा, असे शासन न्यायालयाला सांगू शकत नाही. प्रत्येक आरोपासंबंधात न्यायालयासमोर पुन्हा स्वतंत्रपणे पुरावे सादर करावे लागतात. पूर्वीच्या साक्षीदारांना पुन्हा बोलवावे लागते. आयोगाचे निष्कर्ष वा त्यांच्यासमोरील पुरावे न्यायालयावर बंधनकारक नसतात. न्यायालय ते फेटाळू शकते, पण न्यायालयाचे निर्णय फेटाळण्याचा वा चूक म्हणण्याचा अधिकार आयोगाला नसतो. आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असले, तरी विशेष न्यायालयाचा निर्णयाधिकार त्यांच्यापेक्षा वरचढ असतो.3 सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुध्द सरकार अपिलात गेलेच नाही, त्यामुळे आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो.
कपूर आयोगाचे अधिकारक्षेत्र व उल्लंघन
केंद्र शासनाने 1966मध्ये स्थापन केलेल्या कपूर आयोगाचे कार्यक्षेत्र/अधिकारक्षेत्र खालीलप्रमाणे होते -
1) कोणत्याही व्यक्तीला - विशेषत: पुण्याचे गजानन विश्वनाथ केतकर यांना व अन्य कोणाला नथुराम गोडसे व इतर गांधींजींची हत्या करणार आहेत, याची पूर्वकल्पना होती का?
2) यांपैकी कोणी ही माहिती राज्याच्या वा केंद्राच्या शासकीय अधिकाऱ्यांना कळविली होती का? विशेषत: केतकरांनी ही माहिती बाळूकाका कानिटकरांना व त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांना कळविली होती का?
3) जर कळविली असेल, तर राज्य शासनाने - विशेषत: मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांनी व केंद्र शासनाने यावर कोणती कार्यवाही केली होती?4
म्हणजे सावरकरांचा कटातील सहभाग वा त्याची त्यांना असलेली माहिती व ते दोषी की निर्दोषी ही बाब आयोगापुढे विचारासाठी किंवा चौकशीसाठी ठेवण्यातच आलेली नव्हती, म्हणजे कपूर आयोगाने सावरकरांविषयी निष्कर्ष मांडून शासनाने दिलेल्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन केले आहे. स्वत: न्या. कपूरांनीच म्हटल्याप्रमाणे, 'एखाद्या वादविषयात फौजदारी न्यायालयाने निर्णय दिला असेल, तर तो निर्णय पुनर्विचारातीत (Res Judicata) (अंतिम) बनतो व कोणत्याही न्यायालयात वा आयोगासमोर तो पुन्हा नेता येत नाही.' 5 म्हणजे आयोगाला मर्यादा माहीत असूनही त्याचे उल्लंघन केले आहे.
हा झाला आयोग व न्यायालय ह्यांच्या मर्यादांचा वा अधिकारक्षेत्राचा व उल्लंघनाचा मुद्दा. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्या पुराव्याच्या आधारावर आयोगाने 'सावरकर दोषी' असा निष्कर्ष काढला आहे?
अनुयायांच्या कृत्यासाठी नेता दोषी?
आयोगाने सावरकरांसंबंधात निष्कर्ष मांडला आहे की, 'या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास (गांधी) हत्येचा कट हा सावरकर व त्यांच्या अनुयायांनी रचलेला होता, या एकाच निष्कर्षाप्रत यावे लागते.' 6 पण हेच विधान परिच्छेद 29.97 7 मध्येही आले आहे, पण तेथे 'सावरकर'ऐवजी 'सावरकरवाद्यांचा कट' असा शब्दप्रयोग केला आहे, तसेच वरील विधानाचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी 'सावरकरवाद्यांचा कट' असाच शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे एकतर आयोगाने दोन निष्कर्ष मांडलेत किंवा निष्कर्षाप्रत येताना आयोगाची द्विधा मनःस्थिती झाली आहे किंवा अनुयायांच्या कृत्यांसाठी नेत्याला उत्तरदायी ठरविले आहे.
फौजदारी गुन्ह्यात अनुयायांच्या कृत्यांसाठी तो केवळ राजकीय विचारांचा अनुयायी आहे म्हणून नेत्याला उत्तरदायी धरता येत नाही; ते कृत्य त्या नेत्याला माहीत होते, हे स्वतंत्रपणे सिध्द करावे लागते. गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलन व त्यातून घडलेल्या चौरीचौरा प्रकरणी 72 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण तेव्हाही ब्रिटिश शासनाने ह्या घटनेसाठी गांधींना जबाबदार धरले नव्हते; तसेच नेते जरी गांधी असले, तरी चौरीचौरा हिंसक घटनेला गांधींचा पाठिंबा नव्हता.
नथुराम व आपटे सावरकरवादी असले, तरी स्वतंत्र विचारांचे अनुयायी होते, आंधळे अनुयायी नव्हते. पटतील तेवढयाच सावरकरविचारांचा ते पुरस्कार करीत. अन्यथा ते स्वत:च्या स्वतंत्र विचारांप्रमाणे वागत असत. स्वत:च्या घरावर तिरंगा राष्ट्रध्वज व भगवा ध्वज फ़डकावून खंडित भारताचे सावरकरांनी केलेले स्वागत नथुराम-आपटे यांना मान्य नव्हते व त्याविषयी त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. नथुरामने आपल्या न्यायालयापुढील निवेदनातही सावरकरांसोबतचे मतभेद स्पष्ट शब्दात मांडले होते. जून 1947च्या गांधींच्या सभेत धमकावणी केल्याबद्दल व व्यत्यय आणल्याबद्दल सावरकरांनी नथुरामची चांगली खरडपट्टी काढली होती.8
दामले व कासार यांची पोलिसांसमोरील साक्ष
न्यायालयापुढे न आलेल्या साक्षींचीही आयोगाने दखल घेतली आहे. ह्या साक्षी म्हणजे सावरकरांचे सचिव गजानन दामले व अंगरक्षक अप्पा कासार ह्यांची साक्ष. अ.ग. नूराणीं*सारख्यांचा संपूर्ण भर ह्याच साक्षीवर अवलंबून आहे. नूराणी म्हणतात की, कपूर आयोगापुढे साक्ष देताना दामले व कासारांनी हे मान्य केले की त्यांनी गोडसेला व आपटेला अनुक्रमे 14-17 जानेवारीला व 23 वा 24 जानेवारीला सावरकरांना भेटताना पाहिले होते. त्यामुळे 'जर ह्या दोघांची (म्हणजे कासार व दामले ह्यांची) न्यायालयासमोर साक्ष झाली असती, तर न्यायालयाने सावरकरांना दोषी ठरविले असते.'9
*घटनातज्ज्ञ व कायदेपंडित 'अब्दुल गफूर नूराणी' यांचा हमीद दलवाईंनी दिलेला परिचय - अट्टल पाकिस्तानवादी (पृष्ठ 152), उदारमतवादाचा खोटा लेप लावलेले गाढे जातीयवादी (पृष्ठ 150), असत्याचा आधार घेऊन वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा (पृष्ठ 153), (1965च्या भारत-पाक युध्दात) भारत संरक्षण कायद्याखाली स्थानबध्द झालेला (पृष्ठ 156). (संदर्भ : राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान, गांधीहत्या व सावरकर : न्यायालय व आयोगाचे निष्कर्ष परस्परविरुध्द कसे?: शेषराव मोरे, विचारकलह भाग 2, अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन, 2008, पृष्ठ क्रमांक 199)
नूराणींचा हा युक्तिवाद न्यायप्रक्रियेत गैरदखल आहे. जर अमुक साक्षीदार तपासला असता तर निकाल वेगळा लागला असता, हे वाक्य न्यायालयाचा अवमान करणारे आहे.
तसेच नूराणींच्या ह्या आरोपात गंभीर चुका आहेत. सर्वात महत्त्वाची चूक अशी की, दामले व कासार यांच्या साक्षी 1966नंतर कपूर आयोगापुढे झाल्याच नव्हत्या. ह्या साक्षी 4 मार्च 1948ला पोलिसांसमोर झाल्या होत्या, स्वत: कपूर आयोगानेही त्याच उल्लेखिल्या आहेत.10 आता मुद्दा हा आहे की ह्या साक्षी 1948-49मध्येच न्यायालयापुढे का आल्या नाहीत? ह्याचे कारण असे की दिलेल्या वा त्यांच्या नावे खोटयाच लिहून घेतलेल्या जबान्यांप्रमाणे त्यांच्या साक्षी होतील असे पोलिसांना वाटले नसावे. अशा जबान्यांवर साक्षीदारांच्या सह्या नसतात. त्यांनी तोंडी सांगितले म्हणून पोलीसच स्वत: ते लिहून घेत वा ठेवीत असतात. पोलिसांच्या मानसिक छळामुळे, मारहाणीमुळे दडपणाखाली अथवा आमिषामुळे अशा जबान्या लिहून घेता येतात, म्हणून या जबान्या न्यायालयात काहीही कामाच्या नसतात. म्हणून त्या जबान्या पोलीस दप्तरात तशाच राहून देण्यात आल्या व आयोगाला त्या वाचायला मिळाल्या.11 अप्पा कासारांना मुंबई पोलिसांनी अमानुष मारहाण करून त्यांच्याकडून हवा तसा कबुलीजबाब लिहून घेण्याचा प्रयत्न केला, पण अप्पांनी त्या मारहाणीला जुमानले नाही. तसेच मोठया रकमेचे आमिष दाखविले, तरी अप्पा त्याला बळी गेले नाहीत.12
जर पोलीस तपासातील एखादा जबाब एवढा महत्त्वाचा होता, जे आयोग नंतर म्हणतोय, तर त्या साक्षीदाराला खटल्याच्या वेळीच स्वत: न्यायालयाने तपासले असते की! न्यायालयाला नेहमीच तसा अधिकार असतो. त्यामुळे नूराणींचा दावा अडाणीपणाचा आहे. संबंधित कलम - Cr.P.C. sec.311 आहे, एवढेच की ते 1973च्या कोडचे आहे. गांधीहत्येच्या वेळी जो कोड होता, तो 1898चा होता. त्या वेळचे संलग्न कलम होते 540, जे आता 311 आहे. या कलमामुळे कोणीही, कोणाचीही साक्ष 'दाबून ठेवली' असे घडणे शक्य नाही.

बडगे माफीचा साक्षीदार का झाला?
तसेच आयोगाच्या व नूराणींच्या म्हणण्यानुसार ह्या साक्षी 'दिगंबर बडगे' ह्या माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीला दुजोरा देतात. मूळत: बडगे माफीचा साक्षीदार का झाला, हे तपासायला हवे व मनोहर माळगावकरांच्या 'The Men Who Killed Gandhi' ह्या साधार, नि:पक्षपाती व तटस्थपणे लिहिलेल्या पुस्तकात ह्याचे उत्तर मिळते.
माळगावकरांनी ऑॅगस्ट 1974ला बडगेची भेट घेतली, तेव्हा त्याने निर्भीडपणे सांगितले की,''सावरकरांविरुध्द साक्ष देण्यासाठी करण्यात आलेल्या मारहाणीला व दबावाला मी प्रखर विरोध केला. पण अखेर मी शरणागती पत्करून पोलीस म्हणतील तसे सांगण्यास तयार झालो.'' 13 ''मुंबईहून दिल्लीला जाताना मी सावरकरांना पाहिलेही नाही व सावरकर, नथुराम व आपटेला 'यशस्वी होऊन या' म्हटल्याचे ऐकलेही नाही''14 माफीचा साक्षीदार झाल्यानंतर बडगेला कारागृहात मांस, अंडी, गोडधोड, सिगरेट व दारू अशी विशेष अतिथीसारखी वागणूक मिळायला लागली. तसेच आजन्म वेतन (stipend) व मुंबई CID मुख्यालयाच्या आवारात एक छोटी अधिकृत सदनिका मिळाली.15
त्यानंतर बडगेचा नोकर व गांधीहत्येतील एक आरोपी शंकर किस्तैय्या ह्यालाही सावरकरांविरुध्द साक्ष देण्यासाठी त्याला पटविण्याचे काम बडगेवर सोपविले. या संबंधात शंकरने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, ''नगरवाला बडगेला भेटत असे व सांगत असे की, 'तू शंकरला शिकवलेस का? व बंदीपालाला म्हणत असे, 'जर बडगेने शंकरला शिकवले तर त्याला दारू दे.' बडगे मला काय सांगायचे हे शिकवू लागला, मी बडगेला म्हणालो, 'जर मला ह्यातील काहीही माहीत नाही, तर मी हे सगळे का सांगू?' बडगे म्हणाला की, 'तुला हे सगळे सांगावे लागेल, कारण इथून सुटण्याचा हा एकमेव मार्ग आहे.'' तो शंकरला लक्षपूर्वक शिकवू लागला व त्याच्याकडून साक्ष पाठ करून घेऊ लागला. एकेदिवशी नगरवाला आले व बडगेला विचारले की, ''तू शंकरचा पुरेसा सराव करून घेतला आहेस ना?' (आणि नंतर) मला हिंदुस्थानीमध्ये विचारून ते सर्व म्हणून दाखवायला सांगितले. मी त्यात 5-6 चुका केल्या.''
न्यायालयाने शंकरच्या बचावासाठी नेमून दिलेल्या वकिलाला शंकरने हे सर्व कळविले आहे हे जेव्हा बंदीपालाला कळले, तेव्हा तो बडगेवर प्रचंड संतापला व त्याची चांगली खरडपट्टी काढली आणि 'बडगेने त्याला बंदीपालासमोर थोबाडीत मारली.'16 अर्थात शंकरने न्यायालयात बडगेप्रमाणे खोटी साक्ष दिली नाही व परिणामत: माफीचा साक्षीदार म्हणून त्याचा मालक सुटला, पण शंकरला जन्मठेपेची शिक्षा झाली. अर्थात नंतर उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली. थोडक्यात, बडगे याला खोटी साक्ष देण्यास कसे भाग पाडण्यात आले, हे केव्हाच उघड झाले आहे.
प्रा. जैन व मदनलाल यांची साक्ष
ह्या खटल्यातील एक साक्षीदार जैन ह्यांच्या उलटतपासणीच्या वेळीही त्यांनी मान्य केले की, ''17 फेब्रुवारी 1948पर्यंत मी कोणालाही लेखी स्वरूपात काहीही कळविले नव्हते व 10 दिवसांनी दिलेल्या निवेदनातही मी असे म्हणालो नव्हतो की सावरकरांनी मदनलालला पाठविल्याचे त्याने (मदनलालने) मला सांगितले होते.'' मदनलालनेही, ''मला सावरकरांनी पाठविल्याचे सांगितले नाही व माझी जैनांशी सावरकरांविषयी कधीही चर्चा झाली नाही'' असे ठामपणे सांगितले व त्याने तसे न्यायालयासमोरही सांगितले होते. 20 वर्षांनंतर माळगावकरांनाही त्याने शपथेवर सांगितले की, ''मी जैन ह्यांच्याकडे सावरकरांचा उल्लेखच केला नव्हता.''17
तसेच मदनलालने प्रा. जैनांना, जैनांनी मोराराजींना, मोराराजींनी नगरवालांना सांगितलेली अशी सगळीच ऐकीव कथने होती व तीसुध्दा सुसंगत किंवा सुसूत्रित नव्हती, त्यामुळे न्यायालयाने त्यास ग्राह्य मानले नाही. आयोगाला 'भारतीय पुराव्याचा कायदा, 1872' लागू होत नसल्यामुळे अशी सर्व ऐकीव कथने आयोगाला पुरावा वाटला व त्यांचा आपला निष्कर्षासाठी उपयोग केला. सावरकरांच्या विरोधात वापरता येणारे प्रत्येक साक्षीदाराचे कथन ग्राह्य पुरावा म्हणून मानल्यामुळे आयोगाचे निष्कर्ष न्यायालयाच्या निर्णयापेक्षा वेगळे निघाले आहेत.18
आंबेडकरांनी सरकारला व भोपटकरांना दिलेली माहिती व सरकारचे विशेष वकील सी.के. दफ्तरी यांनी सरकारला व डोनोवनला दिलेली माहिती यात विलक्षण साम्य आहे. त्यामुळे सावरकरांचे निर्दोषत्व निःसंदिग्धपणे सिध्द होते.
संदर्भ :
  1. Kapur, Jeevan Lal, भाग 1, खंड 1, Report of Commission of Inquiry in to Conspiracy to Murder Mahatma Gandhi (1969), पृष्ठ 70
2  उपरोक्त, पृष्ठ 92
3  गांधीहत्या व सावरकर : न्यायालय व आयोगाचे निष्कर्ष परस्परविरुध्द कसे? : शेषराव मोरे, विचारकलह भाग 2, अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन, 2008, पृष्ठ 200-201
4      Kapur, भाग 1, खंड 1, पृष्ठ 3
5  उपरोक्त पृष्ठ 87
6      Kapur, भाग 2, खंड 4, पृष्ठ 303
7  उपरोक्त, पृष्ठ 301
8      Cinar, Anurupa, Gandhi's Assassination and Veer Savarkar : Setting the record straight, 22 Feb 2013, niticentral.com
9      Noorani, A.G., Savarkar & Hindutva : The Godse Connection, Left WordBooks, Delhi 2000, पृष्ठ 132 & also 'How Savarakar escaped the gallows', 30 Jan 2013, The Hindu
10 Kapur, भाग 2, खंड 4, पृष्ठ 317-318
11 मोरे, पृष्ठ 208
12 एका लढवय्याची अखेर : य.दि. फडके, 14 जून 1998, महाराष्ट्र टाइम्स
13 Malgonkar Manohar, The Men Who Killed Gandhi, Roli Books, 2014, पृष्ठ 333-334
14 उपरोक्त, पृष्ठ 350-351
15 उपरोक्त पृष्ठ 350
16 उपरोक्त पृष्ठ 334
17 उपरोक्त पृष्ठ 279
18 मोरे, पृष्ठ 207
(क्रमश: )
9960685559
मूळ लेखाची लिंक - http://www.evivek.com/Encyc/2017/6/3/Gandhiji-And-Savarkar

Wednesday, 7 June 2017

नग्नता,मैथुन, कला आणि घुसमट: भारत एक शोध -राजू परुळेकर


IMG_8667
कलेच्या संस्कृतीच्या विकासामध्ये आणि ईश्वराच्या अस्तित्वामध्ये वस्त्र किंवा झाकणे हे कदापी अभिप्रेत नाही.
जगभर देवदेवतांचे नग्न पुतळे आणि शिल्पे बनवली गेली आहेत. भारतामध्येही देवदेवतांची आणि अवतारांची नग्न चित्रे आणि पुतळे बनवण्याची परंपरा ग्रीकांच्या आधीपासून अस्तित्वात होती.
एवढेच नव्हे, तर जगातला, भारतातला सनातन धर्म- ज्याला आता ‘हिंदू’ असे म्हणतात, तो बहुदा एकमेव धर्म असावा ज्यामध्ये लिंग आणि योनी पूजेला असाधारण महत्त्व आहे.
इस्लाम वगळता जगातल्या सर्व धर्मांनी नग्नतेला आदर आणि दैवी शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. अनेक ग्रीक देवतांची नग्न शिल्पं किंवा ख्रिस्ती धर्मातील नग्न आणि अर्धनग्न शिल्प आणि चित्र प्रबोधनोत्तर (post renaissance) आपल्याला पाहायला मिळतात.
IMG_8665
भारतातील अनेक मंदिरात योनि व लिंग पूजा हही अनुक्रमे शक्ति व शिव पूजा मानली जाते. हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
IMG_8671
एम. एफ. हुसेन यांनी सरस्वती देवीचे नग्न चित्र काढल्यावर नग्नता म्हणजे संस्कृतीवरील आक्रमण असल्यासारखी ओरड हिंदू कट्टरवाद्यांनी सुरू केली.
त्यामध्ये दोन भाग होते-; एक म्हणजे चित्रकला, शिल्पकला व त्या संबंधीचा विचार, त्याची अॅनाटॉमी हे सारे समजून घेण्याची कट्टरवाद्यांची तयारी नव्हती आणि दुसरे म्हणजे या सर्वांना अचानक एम. एफ. हुसेन मुस्लीम असल्याचा साक्षात्कार झाला.
MF-Husain-007
खरं तर मक्बूल फिदा हुसेन हे पंढरपुरात जन्मलेले आणि भारतीय संस्कृतीची अस्सल जाण असणारे महान कलावंत होते. परंतु, एक हजार वर्षे इस्लामच्या गुलामीत राहिलेल्या भारताला इस्लामी संस्कृतीचा पराभव हा युद्धात फक्त ५० टक्के होऊ शकतो, उरलेला पराभव हा आपल्यासारखे त्यांना बनवण्यात आहे, त्यांच्यासारखे आपण बनण्यात नाही, याचा विसर पडला.
इस्लाम हा एक असा धर्म आहे, ज्याच्यामध्ये ‘द होली बुक’ (कुराण ए शरीफ) यावर प्रश्न उपस्थित करणे, वादाला आवाहन देणे किंवा स्वत:च्या मनाप्रमाणे अर्थ लावणे याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. याला ईश्वराविषयी किंवा पवित्र गोष्टींविषयी निंदात्मक बोलणे म्हणजे धर्मनिंदा (blasphemy) मानले जाते.
‘चार्ली  हेब्दो’ या नियतकालिकामध्ये प्रेषित महंमदांची नग्न चित्रे अनेकदा छापली गेली आहेत. डेन्मार्कमध्ये एका कार्टुनिस्टने प्रेषित महंमदांचं कार्टून छापलं होतं. या साऱ्यांना जगभराच्या मुसलमानांनी मृत्यूदंड फर्मावला.
IMG_8660‘चार्ली  हेब्दो’ नियतकालिकाचे संपादक स्टेफेन चार्ब याने अशा धमक्यांना भीक न घालता महंमदांची नग्न चित्रं आपल्या नियतकालिकामध्ये छापणं चालू ठेवलं. त्यामुळे या नियतकालिकावर पॅरिसमध्ये हल्ला करून संपादकासह अनेकांना मुस्लीम कट्टरवाद्यांनी ठार मारलं.
‘सैतानाची वचनं’ हे पुस्तक कुराण आणि महंमदाचा अपमान आहे, असं समजून सलमान रश्दी या लेखकाला कित्येक वर्षांपूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली आहे.
(ह्या लेखाच्या लेखकाने) स्वत: ‘चार्ली  हेब्दो’ या नियतकालिकामधील कार्टून्स ट्विटरवरून स्टेफेन चार्ब ह्यांच्या   मृत्यनंतर श्रद्धांजली म्हणून प्रसारित केली होती. ती लेखकाच्या  टाइमलाइनवर मागे जाऊन, वाचक पाहू शकतात.
तस्लीमा नसरीननेही कुराण, इस्लाममधील स्त्रियांची अवस्था, त्यांचे होणारे भयानक शोषण आणि लिंग व योनी यांना अपवित्र मानून झाकून ठेवण्याची प्रवृत्ती याविरुद्ध वेळोवेळी लेखन करून स्वत:वर स्वत:च्या देशातून निर्वासित होण्याची वेळ आणली. इस्लाम हा असा धर्म आहे, ज्यामध्ये एकाच वेळी ‘सेक्समॅनिया’ आणि ‘सेक्सचं दमन’ हे दोन्हीही सहअस्तित्व करून आहेत.
किंबहुना ते परपस्परावलंबी आहेत. जे झाकलं जातं, त्याचं अनिवार आकर्षण मनुष्याला वाटतं. कलेच्या बाबतीत झाकून ती दृग्गोच्चर करताच येत नाही. उदा. बुरख्यातील स्त्रीचं चित्र किंवा शिल्प किंवा कोणत्याही प्रकारचं कलात्मक अविष्करण करणं हे केवळ अशक्य आहे. धर्माचा उदय आणि कलेचा उदय हा बऱ्याचदा हातात हात घालून होत असतो आणि मुख्यत्वे करून त्या त्या धर्मातले ईश्वरी अवतार आणि देवदेवतांची चित्रं, शिल्प यातूनच कलेचा आविष्कार प्रत्येक धर्मात, प्रत्येक संस्कृतीत आणि प्रत्येक प्रांतात होत असतो. मायकेलअँजलो, लिओनार्दो द विन्सी पासून एम. एफ. हुसेन यांच्यापर्यंत अनेकांनी आणि इतर अनेक कलाकारांनी आपापल्या धर्मातील किंवा इतर धर्मातील व्यक्तिरेखा त्यांना जशा दिसतात, तशा रेखाटलेल्या आहेत. त्यांची तशी शिल्पं बनवलेली आहेत.
ईश्वरी अवतार मानवी फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही उभी  करता, मग ते चित्र असो वा शिल्प तेव्हा त्याची अॅनाटॉमी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. ही अॅनाटॉमी डॉक्टरइतकीच कुशलपणे चित्रकार, शिल्पकाराला शिकावी लागते. त्यामुळे नैतिक आणि अनैतिक (मॉरल आणि अमॉरल) असा विचार कलावंताच्या मनाला शिवत नाही. तो कायम ननैतिक  (amoral) असतो.
इस्लामच्या बाबतीत मूर्तीपूजा निषिद्ध आहे. कोणत्याही मानवी फॉर्ममध्ये ईश्वरी अंश चित्रित करणं निषिद्ध आहे. एवढंच नव्हे, तर प्रेषित महंमद आणि त्यांचे नंतरचे वारसदार यांचे चित्र निर्माण करणं किंवा पूजा करणं हेही निषिद्ध आहे, नव्हे ते मृत्यूदंडास पात्र आहे. मुसलमान हा पैगंबरांचा आदर करतो. पण इबादत (भक्ती) तो फक्त अल्लाहची करतो, जो अमूर्त आहे. प्रेषित महंमदांचे स्थान हे इस्लाममध्ये अल्लाहच्या दूताचे आहे. ते साक्षात ईश्वर किंवा ईश्वरी अवतार नव्हे. परंतु, ईश्वरी दूत असल्याने ते मुसलमानांमध्ये सर्वोच्च आदराला पात्र आहेत. इस्लाम स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर स्त्रीला दैवीपणाच्या जवळपास मानत नाही.
इस्लाममध्ये स्त्री देवता नाही. पैगंबराची पत्नी किंवा मुलगी यांच्याकडे आदराने पाहिले जाते पण देवतेच्या आसपास त्यांना स्थान नाही. इस्लाममध्ये स्त्री ही पुरुषाची मालमत्ता आहे पण त्याच वेळेला त्या मर्यादित परिघात तिला काही हक्कही देण्यात आलेले आहेत, ज्या हक्कांचा मुसलमान जणू काही मानवी हक्कांच्या पलीकडे तिला काही दिल्याचा गाजावाजा करत असतात, जे धादांत खोटे आहे. हिजाब, बुरखा आणि प्राप्त पुरुषाची सेवा हेच इस्लामच्या परिघातील स्त्रियांचे भागध्येय आहे.
या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर इस्लाममधल्या कुठच्या देवीचं किंवा देवाचं नग्न किंवा अर्धनग्न चित्र काढणं, शिल्प काढणं हे शक्यच नाही. कारण, मृत्यूदंडाची शिक्षा हा भाग जरी वगळला तरी चित्र, शिल्प, नग्नता, अर्धनग्नता जरी दाखवायचीच ठरवली तरी ती काल्पनिक आणि इस्लाम धर्मात वास्तविक आधारावर नसलेली करावी लागेल, ज्याची शिक्षा वास्तवाशी संबंध नसतानाही ‘चार्ली हेब्दो’प्रमाणे मृत्यूदंडाची मिळेल. इथे हे लक्षात घ्यायला हवं की, प्रेषित महंमदांचं चित्र, कार्टून किंवा त्या संदर्भातली नग्नता जर कुणी काढायची ठरवलीच तर तो सारा मामलाच काल्पनिक असतो. कारण अशी कुणी मूळ चित्रं किंवा कल्पनाचित्रं धर्मात उपलब्धच नाहीत. कारण ते निषद्ध आहे. त्यामुळे मॅडोना, व्हीनस, खजुराहोमधली चित्रं, कामाख्या मंदिरामधील नग्न जगन्मातेचं शक्तीपीठ या साऱ्या व अश्या प्रकारच्या इतर धर्मातील संकल्पनांशी इस्लामचा दुरान्वये संबंध नाही.
मक्बूल फिदा हुसेन यांनी श्रीगणेशाची काही अप्रतिम चित्रं काढलेली आहेत. त्यांना भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं अचूक ज्ञान होतं. देवी आणि देवता ज्यांची आपण प्राचीन मंदिरांमध्ये पूजा करतो, ती शिल्पं दगडांमध्ये कोरलेली नग्न शिल्पं आहेत. भारतात देवीला जगन्माता म्हटलं जातं. माता आणि मुलाच्या मध्ये नग्नतेचा मुद्दाच उपस्थित होत नाही. किंबहुना तो तसा झाला, तर उपस्थित करणाऱ्यामध्ये मातेसंबंधी कामुकतेची खोट आहे, असे मानण्यात यावे.
भारतामध्ये अनेक देवतांना मग त्या पुरुष स्वरूपात असो वा स्त्री स्वरूपात असो; पहाटेची अंघोळ घालताना त्या देवतांच्या मूर्ती नग्न असतात. पुजारी आपल्या हाताने दूध, अत्तर, पाणी, तूप, दही या पंचामृताने चोळून त्यांना अंघोळ घालतो आणि मग त्या देवतांना वस्त्रे चढवली जातात. अपवादानेच काही मूर्ती ज्या अर्वाचीन काळात बनलेल्या आहेत त्यांच्या अंगावर मूर्तीकारानेच वस्त्रे चढवलेली आहेत. पण ही वस्त्रे चढवण्या अगोदर चित्रकाराला किंवा शिल्पकाराला देव आणि देवीची अॅनाटॉमी उत्कृष्ट स्वरूपात साकारण्यासाठी मूर्ती किंवा चित्रांचा नग्न स्वरूपात विचार करावाच लागतो.
कलावंत हा नैतिक किंवा अनैतिक असत नाही. तो ननैतिक असतो. कलावंत म्हणजे पुजारी नव्हे. हुसेन यांनी सरस्वतीचं नग्न चित्र काढलं, ही हजारो वर्षांची परंपरा होती. त्यांनी मुसलमानांच्या धर्मात असे करून दाखवावे, असे त्यांना सांगणे ही मूर्खतेची परिसीमा आहे. कारण वर उल्लेखल्या प्रमाणे मुस्लीम धर्म हा या प्रकारच्या  मानवी कलाविचारांपासून पारखा आहे. त्यांची शिल्पं ही इमारतींमध्ये, वास्तूशास्त्रामध्ये प्रकट होतात. ज्या कलेला स्वाभाविक पणे मानवी मूल्य वा मानवी चेहरा नसतो. हे एक प्रकारचे कलात्मक मागासलेपणच आहे.
भारतामध्ये कॅलेंडर्स आणि शिळा प्रेससाठी देवदेवतांचा मोठा व्यापार करण्याची परंपरा राजा रविवर्मा या चित्रकाराने सुरू केली. राजा रविवर्मा हा चित्रकार म्हणून थोर होता, पण कलेच्या तत्त्वज्ञानानुसार तो एक कृतक आणि बुरसटलेला होता. त्याने अनेक देवता, ह्युमन मॉडेलचा वापर करून, त्यांना कपडे घालून पॉप्युलिस्ट बनवलं. शिळा प्रेसवर छापलेली मॉडेल्स देवदेवतांची चित्रे हिंदूंच्या घराघरांत लागली. त्यामुळे असा भ्रम पसरला की, कलावंताने देवदेवतांना कपडे घालणं, हे बंधनकारक आहे. वास्तविक, ज्या समाजामध्ये देवाचे आणि देवतांचे असाधारण असे दैवी लैंगिक अविष्करण शिल्प आणि चित्रांमधून होत होते, तिथे प्रबोधन युगाच्या जागी अंधारयुग पसरले.
कामाख्या देवी ही हिंदूंचं सर्वांत मोठं शक्तिपीठ मानतात. कामाख्या मंदिरात योनी पूजा ही अतिपवित्र आणि त्यातून येणारे रक्त हे शक्तिबीज मानले जाते.
महादेव शंकराच्या बाबतीत लिंगपूजा ही भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नग्नतेची भिती आणि पथ्य हा हिंदू धर्माचा भागच नव्हता. किंबहुना इस्लाममधील अशा प्रकारचे समज हे हिंदू उदारवादाच्या विरोधात होते. हिंदू कट्टरवाद्यांनी भारतात हिंदूंचा विजय आणि इस्लामचा पराभव एवढा ‘मनावर घेतला’ की, इस्लामची बंद संस्कृती हिंदू संस्कृतीच्या उदारतेमध्ये आणि ननैतिकमध्ये (अमॉरॅलिटी) विलीन करण्याऐवजी आपण त्यांच्याएवढेच कट्टर वागले पाहिजे, या खुळचट कल्पनेने हिंदू कट्टरवादी आपल्या मूळ नग्न आणि अद्भूत आविष्कार असलेल्या ननैतिक ईश्वरी कलेला कपडे पांघरून आणि बुरखे घालू लागले.
अलीकडच्या काळात तर देवतांच्या मूर्ती करतानाच शिल्पकार त्यात कपड्यांचे प्रावधान करतो. चित्रकारांचीही तीच गत झालेली आहे. मुळामध्ये नग्नतेला ते घाबरतात, ज्यांच्या मनात नग्नता आणि कामुकता यांच्यातला फरक स्पष्ट झालेला नसतो.
देवी ही आपण जगन्माता मानतो, शक्तिपीठ मानतो. तिच्यात व आपणात आई व मुलाचं नातं आहे, ही शिकवण आपल्याला आपल्या संस्कृतीतून मिळालेली आहे. जेव्हा आई मुलाला आणि मूल आईला नग्न पाहतं तेव्हाच दोघांचाही जन्म होतो.
IMG_8661
(कामाख्या मंदिरातील शक्ती देवीची मूर्ती योनिपुजा आणि शक्तीपीठ म्हणून भारतात अनन्यसाधारण स्थान या देवीला आणि मंदिराला आहे. )
कामाख्या देवीच्या मंदिरात शक्तिपीठ म्हणून योनी पूजा करताना तिच्या योनीतील रक्त (प्रतीकात्मक) आपण डोक्याला लावतो तेव्हा ते पीठ कामुक आहे, असे आपण मानतो का? की ती आपली संस्कृती आहे?
हुसेन यांनी सरस्वतीचे नग्न चित्र काढले, ते अतिशय कलात्मक आणि अष्टसात्विक भाव स्पष्ट करणारे होते. याउलट कलेच्या दृष्टिकोनातून पाहताना भारतमातेचे म्हणून जे एक चित्र आपण सातत्याने पाहतो, जिला अनेक पदरी साडी चापूनचोपून नेसवलेली असते आणि हळदीकुंकवाला आलेल्या सवाष्णीसारखी ती उभी असते आणि जिचे केस मोकळे सोडलेले असतात आणि एकंदरीत त्या चित्राचा पाहताना परिणाम तो अखंड भारत आहे, असाही होत नाही किंवा ती कुणाची माता आहे, असाही होत नाही. कलेचा अत्यंत बुरसटलेला आणि अर्थहीन असा अर्थ त्या साडी नेसलेल्या भारतमातेमधून प्रतीत होतो. आता कट्टरवाद्यांनी किंवा कोणत्या तरी माथेफिरूने तुमच्या गळ्यावर सुरी ठेवून तिला भारतमाता मानाच असे म्हटले तरी ही प्राचीन, अर्वाचीन आणि पोस्ट मॉडर्निझमच्या अर्थाने ते एक बोगस आणि अतिसुमार चित्र आहे.
हजार वर्षांच्या इस्लामच्या आक्रमणानंतर आपण त्यांना आपल्यासारखे बनवू शकलो नाही, उलट आपण त्यांच्यासारखे बनलो हे खरे आपले सांस्कृतिक नग्नता आहे. खरा प्रश्न ही नग्नता कुठे लपवायची, हा आहे.
नग्नता ही धर्मामध्ये त्याज्य नाही. सनातन धर्मामध्ये तर नाहीच नाही. इस्लाम आणि व्हिक्टोरियन कालखंड हा नग्नता कृतकपणे झाकण्याचा कालखंड मानला जातो. धर्म याचा खरा अर्थ प्रकृती असा होतो आणि प्रकृती ही ननैतिक असते.
दुसऱ्या बाजूने वस्त्रांचा आणि नैतिकतेचा काय संबंध? उदाहरणच घ्यायचे झाले, तर उष्ण आणि विषुववृत्ताजवळच्या कटिबंधातले लोक हे साधे आणि पातळ कपडे घालतात. तर शीत कटिबंधातील लोक हे लोकरीचे आणि विविध प्रकारच्या आवरणांनी युक्त असे खूप कपडे घालतात. याचा अर्थ जास्त कपडे घालणारे नैतिक होतात का?
वस्त्र हे नैतिकतेचं निर्देशक असतं, तर जास्त कपडे घालणारे अधिक नैतिक मानले जायला हवेत. जी गोष्ट आपण झाकतो तिची आपल्याला भिती वाटते आणि ती भिती आपल्या मनात असते.
इस्लाम हा भितीवर आधारित धर्म आहे. काही अब्राह्मनिक धर्म हे सुद्धा भितीच्या आधारावरच उभे आहेत. पण भारतात निर्माण झालेले धर्म हे भितीच्या आधारावर उभे नाहीत.
जैनांमध्ये तर दिगंबर पंथच आहे. तो पंथ अश्लील मानायचा का?
Acharya_Vidyasagar_04
एवढेच नव्हे, तर अनेक स्तूप, अनेक मंदिर, अनेक शिल्प यामधील देवदेवता नग्न स्वरूपात त्या काळच्या अज्ञात कलावंतांनी कोरून   काढलेल्या आहेत. त्या काळात आजच्या काळासारखे कट्टरवादी भारतात नव्हते म्हणून त्यांना त्यांची कला पूर्ण स्वरूपात प्रकट करता आली.
देव, अवतार हे ईश्वरी अंश असतात, ईश्वर नव्हे. ईश्वर जन्म घेत नाही, ईश्वर मृत्यू पावत नाही. त्याचा अंश ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, ते अवतार म्हणून आपण मान्य करतो.
Naga Sadhus Photo
अनेक साधू आणि साध्वी किंवा तंत्रसाधना करणारे साधू आणि साध्वी किंवा नागपंथीय साधू हे वस्त्रविहीन असतात. त्यांचा अश्लीलतेशी दुरान्वयेही संबंध नसतो.
हुसेन मुस्लीम असल्यामुळे मुद्दाम हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, असे ते इस्लामशी करतील का, असे विचारणे हे तद्दन बुद्धिहीनतेचे लक्षण आहे, ते यामुळेच. इस्लाम हा धर्म नव्हे. तो एक राजकीय ‘कल्ट’ म्हणजे जीवनशैली आहे. ज्याची धर्म ही दुसरी दुय्यम निकड (priority) आहे. एकंदरीत मानवी अस्तित्वाचा प्रवास हा एक शोधाचा प्रवास आहे, ज्यामध्ये अनेक कला येतात, संगीत येतं, शास्त्र येतं. क्रमच लावायचा झाला, तर खालीलप्रमाणे
१. ज्ञानयोग
२. अवतार/प्रेषित
३. धर्म
४. धर्माचे संघटन
५. धर्माच्या संघटनांच्या नावाने काम करतो, असे सांगून कृती करणाऱ्या राजकीय/अराजकीय संघटना.
असा क्रम लागतो.
खरा कलावंत हा ज्ञान, प्रेषित आणि धर्म यांच्या अस्तित्वामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर गुंतलेला असतो. त्याला धर्माच्या संघटना (उदा. शंकराचार्यांची पिठे, खिलाफत, व्हॅटिकन, वक्फ बोर्ड  वगैरे) हे काय म्हणतात याच्याशी देणेघेणे नसते. तशा प्रकारे तो कामच करू शकत नाही. या धर्माच्या संघटनांच्याही खालच्या स्तरावर धर्माच्या संघटनांच्या नावावर राजकीय/अराजकीय संघटना काम करत असतात. कोणताही खरा कलावंत त्यांना कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकत नाही (आणि त्याने देऊही नये). कारण दोघांची भाषा एकमेकांसाठी अगम्य असते. संख्येच्या बळावर कलावंत निष्प्रभ आणि पराभूत होऊ शकतो. परंतु त्याचे म्हणणे हे प्राकृतिक आणि अजरामर असते आणि त्याला पराभूत करणाऱ्यांचे म्हणणे हे कृतकतेने, कामुकतेने आणि ढोंगाने बरबटलेले असते. हे सारे लक्षात घेतले की, हुसेन काय किंवा चार्ली हेब्दो, तस्लीमा नसरीन यांच्या बाबतीत काय झाले असेल, हे आपल्या लक्षात येते.
देवदेवतांची चित्रे आणि शिल्पे जगभर सर्व संस्कृतींमध्ये (अर्वाचीन भारतीय संस्कृती धरून) केवळ नग्न स्वरूपातच चित्रित किंवा शिल्पित केली गेलेली नसून त्याही पुढे जाऊन प्रत्येक धर्मामध्ये काही अपवाद सोडला तर देवदेवतांची असंख्य मैथुन चित्रं आणि शिल्प निर्माण झालेली आहेत आणि ती दैवी मानली जातात. याचं मुख्य कारण प्राकृतिक दृष्टीने आणि ज्ञानाच्या पातळीवर मैथुन हाच निर्मितीचा प्रथम आणि अखेरचा बिंदू असतो आणि ते मैथुन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये  पुननिर्मित करण्याची दैवी देणगी कलावंताला लाभलेली असते. हे ज्यांना कळत नाही, ते कलावंताची हत्या करण्याकरिता सर्व ठिकाणी, सर्व संस्कृतीमध्ये टपून बसलेले असतात. ते मैथुनाचा, नग्नतेचा विरोध करत नसून निर्मितीची, प्रकृतीची आणि ज्ञानाची हत्या करत असतात. आणि याला पाठिशी घालणारी सरकारे जेव्हा जगभरच्या वेगवेगळ्या देशांत अस्तित्वात येतात, तेव्हा त्या देशाचा, त्या प्रांताचा आणि संस्कृतीचा ऱ्हास सुरू होतो.
नैतिकतेचा प्रकृतीशी, सृजनाशी आणि ज्ञानाशी काही संबंध नाही. ज्ञान, प्रकृती आणि निसर्ग हे ननैतिक आहे. नैतिकता हा कायदा होय. परस्परविरोधी असे लाखो नैतिक कायदे नग्नता आणि मैथुन या संदर्भात आहेत. नव्हे, तर प्रत्येक गोष्टीबाबतच आहेत. विषय बदलून उदाहरणच द्यायचं झालं, तर संजय दत्त याने हत्यारं बाळगल्या बद्दल पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा भारतात भोगली जी ब्रिटिशकालीन कायद्याप्रमाणे होती. तशा प्रकारे हत्यारं बाळगणं अमेरिकेत गुन्हा नसून अत्यंत सहज आणि सोपी बाब आहे. भारतात कायद्याप्रमाणे शिक्षा भोगल्यामुळे त्याला आता अमेरिकेचे दरवाजे कायमचे बंद झाले. शिक्षेच्या संकल्पना कश्या बदलतात आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतात हे दाखवण्याकरिता हे विषय सोडून उदाहरण घेतलं इतकच.
नग्नतेबाबत असंख्य प्रयोग जगभरच्या चित्रकार आणि शिल्पकारांनी केले आहेत. त्यात भारत प्रथम होता.
IMG_8662
खजुराहोसारखी मंदिरे, अजंठा-एलोरासारखी शिल्पे ही भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. धर्माच्या नावावर चित्रकारांना जर देवादिकांची नग्नता आणि मैथुन शिल्पे काढण्याचे बंद करायचे ठरवले, तर आपल्याला आपली संपूर्ण कलासंस्कृती आणि शिल्पसंस्कृती जी चार ते पाच हजार वर्षं जुनी आहे ती नाकारावी लागेल.
जैनिझम, बुद्धिझम, हिंदू सनातन धर्म नैतिकतेचे नियम म्हणून कलावंताला शिल्प किंवा चित्र काढताना नग्नता किंवा मैथुन शिल्प किंवा चित्र काढणे त्याज्य ठरवले नव्हते. कारण हे करत असताना प्राचीन महर्षींनी ज्ञान आणि दैवी अंश या पातळीवर सृजनाला पाहिले होते. नैतिकतेचे नियम हे कायद्यासारखे आहेत. कायदा हा सीमांनुसार बदलतो. केवळ देशाच्याच नव्हे, तर राज्याच्या सीमांनुसारही बदलतो. महाराष्ट्रात बीफ बॅन आहे, केरळात नाही. गुजरातेत दारूबंदी आहे, महाराष्ट्रात नाही. याचा अर्थ गुजरातेत दारू पिणे हा गुन्हा आहे किंवा महाराष्ट्रात बीफ खाणे हा गुन्हा आहे, पण बाजूच्या राज्यात नाही. भारतात परमिटशिवाय हत्यारं बाळगणं हा गुन्हा आहे, पण अमेरिकेत नाही. अनेक जमातींमध्ये आजही बहुपत्नी किंवा बहुपती प्रथा चालू आहेत. अशा प्रथा भारतात अनेक ठिकाणी आहेत, अनेक विमुक्त भटक्या जमातींमध्ये आहेत, तशा आधुनिक जगातही आहेत.
भारतात व्हिक्टोरियन काळातील गुलामीच्या काळात म्हणजे, राणी व्हिक्टोरियाचे साम्राज्य जगभर पसरले होते आणि त्यावरील सूर्य जेव्हा मावळत नसे तेव्हा ‘व्हिक्टोरियन मॅनरिझम’ नावाच्या एका ‘कोड ऑफ कंडक्ट’चा उदय झाला. ज्यामध्ये वागणे, बोलणे, जेवणे आणि अंगभर वस्त्र घालणे किंवा अंग संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घालणे, त्यातही स्त्री आणि पुरुषांनी जेवताना तशा प्रकारचे कपडे घालणे आणि काटे-चमचे वापरणे हे अभिजन संस्कृतीचे लक्षण मानले जाऊ लागले.
जेम्स कॅमेरूनच्या ‘टायटॅनिक’ चित्रपटात काही दृश्यांमध्ये या व्हिक्टोरियन मॅनरिझमचे नमुने पाहायला मिळतात. ज्यामध्ये एके ठिकाणी पुढे महान चित्रकार ठरलेला पिकासो याचाही उल्लेख सुमार किंवा क:पदार्थ असा आढळतो. प्रथम श्रेणीमधल्या ‘व्हिक्टोरियन अभिजनांमध्ये’ जे वातावरण होते त्याचा गुलाम भारतीय प्रजेवर दीर्घकालीन नकारात्मक असा गंभीर परिणाम झाला. व्हिक्टोरिया राणी आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटन, अमेरिका आणि ब्रिटिश सामाज्याच्या अमलाखाली असणारे अनेक राष्ट्रकुल देश हे या पगड्यातून बाहेर पडले. कला आणि संस्कृतीसाठी नैतिकतेची खोटी झापडे त्यांनी काढून टाकली.
व्हिक्टोरियन काळामध्ये ज्याने कमप्यूटरचा मूळ शोध लावला आणि ज्याने नाझींचा encrypted message decode केला तो Alan टुरिंग स्म्लैंगिक असल्यामुळे हा गुन्हा मानला गेला आणि त्याला होर्मोन्ल उपचार किंवा कैद असा पर्याय देण्यात आला. त्याने पुढे आत्महत्या केली. खर तर स्म्लैंगिकता हा आजार नव्हता, Alan टुरिंग पुढे कॉम्पुटर चा पितामह ठरला, त्याने लावलेल्या शोधामुळे हिटलर विरुद्ध्च युद्ध दोन वर्ष आधी सम्पुष्टात आल आणि इंग्लंडच्या राणीने, टुरिंगला मरणोपरांत माफी प्रदान केली.
पण ह्या उलट, प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये स्म्लैंगिकता हि कोणत्याही प्रकारची रोग भावना आहे असे मानले जात नसे.
IMG_8666
आधुनिक अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रवी शंकर ह्यांनी ११ डिसेम्बर २०१३ रोजी रात्री १०:०७ मिनिटांनी ट्वीटर वर ट्वीट करून स्म्लैंगिकता हा गुन्हा मानला जात नसल्याचे स्पष्ट केले होते. किंबहुना त्यांच्या मते भगवान अय्यप्पा हि हर-हरा च्या प्रतीकात्मक स्म्लैंगिकतेची निर्मिती मानली जाते.
पण भारतामध्ये व्हिक्टोरियन विचारसरणीचा परिणाम इतक्या खोल गुलामीत झाला की, भारतीय साहित्य (उदा. गीतगोविंद), भारतीय प्राचीन कला, इतिहास, शिल्प, दगडांमध्ये कोरलेली लेणी, कालिदासापासून राधागोविंदपर्यंत शृंगारिक लेखन, वात्सायनाचे कामशास्त्र हे पाश्चिमात्त्यांनी उचलले आणि स्वतंत्र भारताचा बहुसंख्य हिंदू हा कलेमध्ये व्हिक्टोरियन होण्याकरिता धडपडू लागला. आपल्या अभीजन मालकाचा गुलाम जसा वागतो, तशी भारताची विचारसरणी झाली. एके काळी भारतात ज्ञान आणि सृजन, कला आणि कल्पना यांचे स्थान धर्म, धर्माच्या संस्था आणि धर्माच्या नावावर चालवणाऱ्या संस्था याहून वरचे होते. स्वातंत्र्योत्तर काळात गुलामी मानसिकतेचे हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन, शीख, जैन व बौद्ध कट्टरवाद्यांनी कला, जी पायावर उभी होती, ती डोक्यावर उभी केली.
इथे परत स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात काही कलावंतांनी अभिजात मुलभूत संस्थेशी नाळ जुळवून घेण्यासाठी Bombay Progressive Artist’s Group, ज्यामध्ये एफ. एन. सुझा, एस. एच. रझा, एम. एफ. हुसेन, के. एच. आरा आणि एच. ए. गडे आणि यातील एकमेव शिल्पकार असणारे एस. के. बाकरे यांनी मिळून हा ग्रूप स्थापन केला. या ग्रूपमध्ये नंतर मनीष डे, रामकुमार, अकबर पदमसी आणि तय्यब मेहता हे सामील झाले. १९५० मध्ये वासुदेव गायतोंडे, क्रिशन खन्ना आणि मोहन सामंत (जे पुढे अमेरिकेत स्थायिक झाले) हेही सामील झाले. यांचा हा ग्रूप केवळ चित्रकला नव्हे, तर शिल्पकला आणि एकंदरीतच कलाविचार याविषयी भारताची हजार वर्षांची मोगल गुलामी परंपरा, दीडशे वर्षांची ब्रिटिश गुलामी परंपरा, १९४७ साली झालेली अखंड भारताची फाळणी आणि त्यानंतरचा अमानुष नरसंहार या पार्श्वभूमीवर सृजनाचे आणि कलेचे एक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बंड होते. त्याचे विवरण या ग्रूपने काही वाक्यांत जाहिरनामा स्वरूपात स्पष्ट केले होते. ते विवरण खालीलपमाणे :
“Paint with absolute freedom for content and technique, almost anarchic, save that we are governed by one or two sound elemental and eternal laws, of asthetic order, plastic coordination and colour composition”
१९५६ साली हा ग्रूप फुटला, तरीही भारताच्या मूळ कलात्मक सृजनशील नाळेशी जोडणारे हे बंड भारतीय कलाविश्वाला (लेखन असो, चित्र असो, शिल्प असो वा साधा लेख असो) कायमचे गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून नोंदवले गेले. कोणताही धर्म, धार्मिक संस्था, कोणत्याही धर्माच्या कट्टरवादी संघटना, सरकार/सरकारे किंवा प्रतिगामी गुलामी विचार करणारे गट हे कलावंताच्या स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाहीत, कारण हे स्वातंत्र्य अभिजात आणि प्राकृतिक आहे, याची जवळपास १२०० वर्षं तुटलेली नाळ भारताशी या बंडाने जोडली.
या ग्रूपमधील सुझा यांनी अनेक नग्न चित्रं वेगवेगळ्या रचनांमध्ये काढलेली आहेत. जन्माने ते कॅथॉलिक होते. जगभरच्या चित्रकारांनी खरं तर मूळ भारतीय परंपरेत अनुस्यूत असलेली दैवी नग्नता जगभर पसरवली. भारतात मूळ नग्न स्वरूपात असलेली चित्रं आणि शिल्पं ही गुलामीच्या आवरणाखाली कपडे घालून कॅलेंडरवर राजा रविवर्माने सादर केली. राजा रविवर्मा आणि दीनानाथ दलाल (दलाल हेसुद्धा एक मोठे चित्रकार होते) यांचे कॅलेंडरवरील देवी-देवता किंवा शिळा प्रेसमधून छापून आलेले देवी-देवता आपण पुजू लागलो तो म्हणजे आपल्या अपवृशीय दैवी परंपरांचा आणि कलावंतांचा निचांक होता. खरं तर राजा रविवर्मा आणि दीनानाथ दलाल यांच्या अगोदरही प्राचीन काळातसुद्धा मंदिरामध्ये शिल्पांना दगडी वस्त्रं घालण्याची अपवादाने पद्धत होती, पण ती मुख्य अट नव्हती.
खिलाफत, वक्फ बोर्ड, शंकराचार्यांची पिठे, व्हॅटिकन वगैरे वगैरे धर्माच्या संस्थांना कलेमध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार कधीच नव्हता, हे आधुनिक कलापरंपरेने पुन्हा पुन्हा बजावून सांगितलेले आहे. या आधुनिक परंपरेची जननी प्रबोधन काळानंतर युरोप ही ठरली. वास्तवात, हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत हे घडलेले होते. वर उल्लेखलेल्या प्रमाणे इस्लाममध्ये मनुष्य रूपात किंवा सगुण रूपात देव किंवा देवता यांची कल्पनाच अमान्य असल्यामुळे त्यांचे देव-देवता नग्न किंवा भग्न हे कसे दाखवणार?
खरा मुसलमान हा अल्लाची इबादत (प्रार्थना) करतो, प्रेषित महंमदांची नव्हे. त्यामुळेच प्रेषित महंमदाचेच मुस्लीम धर्मामध्ये चित्र उपलब्ध नाही किंवा त्याची पुजेसाठीची देवता अशी कल्पनाही उपलब्ध नाही. आज जे पाश्चिमात्त्य देशांमध्ये प्रेषित महंमदांचे कार्टून डेन्मार्क मध्ये काढले गेले किंवा चार्लि हेब्दोमध्ये छापले गेले ती केवळ कार्टुनिस्टची कल्पना होती, त्याचा महंमदांशी काही संबंध नव्हता. त्यातून निर्माण झालेली हिंसा ही धर्माच्या नावावर चालवणाऱ्या संस्थांना स्वत:च्या हिंसाचाराचा निकडतक्ता पुढे करण्याकरिता व स्वत:ची दहशत निर्माण करण्याकरिता मिळालेले कारण होते. त्याचा मुस्लीम संस्कृतीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे मुस्लीम चित्रं आणि शिल्पं परंपरेत राजेमहराजे, मशिदी-मिनार, महाल आणि इमारती यांची भव्य आणि नेत्रदीपक अशी प्रगती झाली. परंतु त्याला मानवी चेहरा नव्हता.
इस्लाम हे एक असे अपवादात्मक उदाहरण आहे, जिथे स्त्रीला चेहराच नाही, देवतांना चेहरा नाही, प्रेषिताला चेहरा नाही आणि ज्याची उपासना करायची आहे तो संपूर्णत: निर्गुण निराकार आहे. त्यामुळे कोणत्याही कलावंतासाठी पेच हा आहे की स्वर्गीय नग्नतेतील किंवा स्वर्गीय मैथुनातील दैवी तत्त्वं मुस्लीम धार्मिक इतिहासाचा आधार घेऊन निर्माण करणं केवळ अशक्यच आहे. पण याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची नग्नता किंवा मैथुन चित्रं किंवा मानवी शरीरसंबंध याचा कलात्मक आणि निरोगी आविष्कारच मुस्लीम समाजात नसल्यामुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाच्या मानसिकतेवर त्याचा निरोगी आध्यात्मिक प्रभाव पडला नसून सर्व धार्मिक शिक्षकांकडून, मुल्लामौलवींकडून इबादत केल्यानंतर सेक्सविषयक कोणकोणते फायदे पुरुषांना मिळणार आहेत, तेही केवळ भौतिक जगात नव्हे; तर मृत्यूनंतर मिळणार आहेत हे वारंवार मनावर ठसवलं जातं. भौतिक जगामध्ये किती बायका भोगता येतील, किती सेक्स गुलाम ठेवता येतील यापासून ते मृत्युनंतर ७२ हुरा कशा प्राप्त करता येतील, त्याचे तोडगे व उपाय काय याभोवतीच मुस्लीम मानस घुटमळत राहतं. याचा अर्थ नग्नता मैथुन शिल्पं, नग्न चित्रं, देवदेवतांच्या शरीरसंबंधातील वर्णनं आणि त्याची अभिजात कलेतील अभिव्यक्ती एखाद्या धर्मात नसेल, तर त्या धर्मातून कामुकता लोप पावायची सोडून ती उफाळून येते आणि सर्व शिकवण अचानक ‘सेक्स’ या एकाच विषयाभोवती फिरू लागते (जरी ती मूळ धर्मात अभिप्रेत नसली, तरी) याचं हे उत्तम उदाहरण आहे.
म्हणजे नग्नता आणि कामुकता, मैथुन यांच्या अभिव्यक्तीवरील बंदी ही माणसाला मुक्त करू शकत नाही. तर ती निरोगी कामुक बनवण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने कामुक बनवते, हेच या उदाहरणावरून दिसून येते. अनेक इस्लामी जिहादी, जिहादमधल्या मृत्यूनंतर आपल्याला कौमार्यभंग न झालेल्या ७२ हुरा भोगण्याकरिता मिळणार आहेत म्हणून केवळ आत्मघातकी पथकात दाखल होतात आणि सूसाइड बॉम्बर बनतात, हे उदाहरण स्वत:मध्ये पुरेसं बोलकं आहे. जेव्हा एम. एफ. हुसेन यांना कट्टरतावादी हिंदूंनी तुम्ही हिंदू देवदेवांची नग्न चित्रं काढली, तशी मुसलमानांची काढून दाखवा असे आवाहन दिले तेव्हा त्याचे उत्तर ते काय देणार होते? अर्थात, अभिजात कलावंताने, लेखकाने, विचारवंताने आणि शास्त्रज्ञाने आपल्या वाट्याला येणारा छळ निमूटपणे सहन करून आपले काम करावे आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या सर्वच धर्मातल्या अट्टल बदमाश आणि कट्टरवादी अज्ञानांना उत्तरं देण्यात वेळ वाया घालवू नये, हा अभिजाततेचा एक संकेत आहे. तोच हुसेन यांनी पाळला.
IMG_8669
(मध्य प्रदेशातील भोजशाला येथील संगमरवरी देवी सरस्वतीची मूर्ती . या देवतेची मूर्ती कर्झन वायलीने लुटून नेली.)
इथे सरस्वतीविषयी थोडेसे लिहायचे झाले, तर हिदू पुराणाप्रमाणे (मत्स्य पुराण) सरस्वती ही ब्रह्माची मुलगी जिची निर्मिती झाल्यावर स्वत: ब्रह्माला तिचे कामूक आकर्षण वाटल्यामुळे त्याने तिच्याशीच लग्न केले आणि या गुन्ह्याची (incest- एकाच कुटुंबातील सदस्यांशी किंवा जवळच्या नातेवाइकाशी लैंगिक संबंध ठेवणे) शिक्षा म्हणून शिवाने ब्रह्माचे एक डोके उडवले होते. चित्राचा हा पुढचा भाग हुसेन यांनी चित्रित केला असता, तर त्यांचे काय झाले असते, हे ब्रह्माच जाणो! शिवाय सरस्वती देवीची जवळपास पूर्ण नग्न किंवा अर्ध-नग्न भारतीय संस्कृतीत निर्माण झालेली शिल्प होती जी कट्टर वाद्यांना माहित नाहीत. त्यातली काही lord Curzon ने ब्रिटन मध्ये पळवून नेली.
केवळ भारतातच नव्हे, तर प्रबोधनपूर्व काळात युरोप आणि पाश्चिमात्त्य जगातसुद्धा नैतिकता, अध्यात्म, कला आणि शास्त्र या संबधीची आत्यंतिक खुळचट कल्पना जन्म घेत असते. त्याला ‘डार्क एज’ असे युरोपमध्ये नाव आहे. प्रबोधन (Renaissance) काळानंतर युरोप आणि पाश्चिमात्त्य जगातील देश बऱ्याच प्रमाणात या खुळचट कल्पानांमधून मुक्त झाले. परंतु भारतातील हिंदूवादी संघटना कलावादी विचार, कलेचे तत्त्वज्ञान, उच्च दर्जाची प्रतिभा आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांचा परिसस्पर्श न झाल्यामुळे मुस्लीम आक्रमणाच्या काळामध्ये स्त्रीला अधिकाधिक झाकण्याची प्रतिगामी पद्धत (जी पुढे व्हिक्टोरियन काळात चालू राहिली) हीच काहीतरी नैतिक आणि दैवी बाब आहे, असे विचार रूजले आणि फोफावले ज्याचे कलावंत, प्रतिभावंत, शास्त्रज्ञ बळी ठरू लागले.
आज आपण देवीदेवतांच्या पूजा करतो, मग ती भवानी माता असो की अंबामाता असो, विष्णू असो की, शंकर असो; या सर्व मूर्ती प्राचीन काळामध्ये नग्न स्वरूपात बनवलेल्या आहेत. देव आणि देवी यांना हिंदू धर्माप्रमाणे जगन्माता आणि जगत्पिता असे मानतात. मूल आणि आई, वडील आणि मूल यांच्यामध्ये नग्नता ही कामुकतेशी संबधित नसते, असा धार्मिक संकेत आहे, ज्या संकेताविरुद्ध आजच्या धार्मिक संघटना कार्यरत आहेत. महाभारतात आई आणि मुलामध्ये वस्त्र हे अहंकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानल्याची एक गोष्ट आहे.
गांधारीने आपल्या अंध नवऱ्यासाठी आयुष्यभर डोळ्याला पट्टी बांधून आपल्या डोळ्यातील प्रकाशऊर्जा बंद करून ठेवली होती. महाभारताच्या युद्धाअगोदर त्या उर्जेने आपल्या मोठ्या मुलाचे संपूर्ण शरीर संरक्षित करावे, म्हणून तिने दुर्योधनाला निर्वस्त्र व्हायला सांगितले. आजच्या कट्टरतावादी धार्मिक विचार करणाऱ्या संघटनांप्रमाणे विचार करणाऱ्या दुर्योधनाने गांधारी मातेचे शब्द ऐकून आपले गुप्तांग आणि मांड्या झाकतील, एवढेच कपडे अंगावर ठेवले आणि बाकी शरीर उघडले. गांधारीने जेव्हा डोळ्यावरील पट्टी काढून आपले नेत्र आपल्या मुलाच्या शरीरावर केंद्रित केले तेव्हा दुर्योधनाचे हे रूप पाहून तिने दु:खाने उसासा सोडला. तिच्या नेत्रातल्या उर्जेच्या कवचाचे संरक्षण दुर्योधनाच्या संपूर्ण शरीराला प्राप्त झाले, परंतु त्याच्या अज्ञान आणि अहंकाराच्या वस्त्रांमुळे आच्छादित असलेल्या त्याच्या मांड्या आणि गुप्तांग यांना आईच्या नेत्रातल्या प्रकाशउर्जेचं संरक्षण प्राप्त होऊ शकले नाही. ‘नग्न म्हणजे संपूर्ण नग्न असं मी तुला म्हटलं होतं,’ हे गांधारीने त्याला बोलूनही दाखवलं. महाभारताच्या अखेरीला दुर्योधनाचे नग्न न झालेले वस्त्राच्छादित त्याचे अवयव – मांड्या भिमाने गदेने फोडल्या आणि त्याचा शेवट झाला.
नग्नता ही निर्मितीची अंतिम पायरी आहे आणि मैथुन ही सृजनाची अंतिम पायरी आहे. त्यामुळे अभिजात शास्त्र आणि अभिजात कला या नैतिक किंवा अनैतिक असत नाहीत. त्या ननैतिक (amoral) असतात. डॉक्टरला किंवा कलावंताला झाकलेल्या शरीराची नैतिकता शिकवण्याने व त्याच्यावर या विचारांची दहशत निर्माण केल्याने व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या, मानव जातीच्या अस्तित्वाची, आरोग्याची आणि सांस्कृतिक पायाची हानी होते. केवळ हानीच होत नाही, तर त्याचे खच्चीकरणच होते.
या साऱ्याचा त्या त्या समाजावर गंभीर असा नकारात्मक परिणाम होतो. समाज आणि समाजमन निरोगी राहत नाही. झाडे, पाणी, पशुपक्षी आणि अतिशय दुर्मिळ झालेल्या भटक्या विमुक्त जमातींच्या नग्नतेत सहजता असते. त्यामुळे मन निरोगी बनून त्यातून कामुकता आणि हिंसाचार निर्माण होत नाही.
आदिवासींमध्ये अपदवादात्मकसुद्धा बलात्कार होत नाहीत.
याउलट नागर समाजात घरामध्येच दुर्बल घटकांवर, स्त्रियांवर घरामधीलच सबल आणि मोठी मंडळी अत्याचार आणि बलात्कार करताना आढळतात, त्याच्या बातम्याही येतात. जे घरात घडते तेच समाजातही घडते. मग आपण प्रश्न नेमका कुठे सुरू होतो, याचा विचार न करता कायदे अधिक कडक करा, अशी मागणी करतो. कायदे कितीही कडक केले, तरी अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण कमी होत नाही असे संख्याशास्त्र दाखवते.
त्याचे खरे मूळ धार्मिक टोळ्यांनी अभिजात सृजनशील कलावंतावर आणि बुद्धिवंतावर घातलेल्या कृतक बंधनात आहे. राजकीयदृष्ट्या सोयीचे नसले, तरीही हे सत्य पचवल्याशिवाय आपण अनुक्रमे अभिजात शास्त्र, अभिजात कला आणि सर्वात शेवटी खऱ्या अर्थाने अभिजात अध्यात्म (बाबा बुवा नव्हे)आणि शेवटी अभिजात ज्ञान निर्माण करू शकत नाही. उपनिषदांमध्ये ज्ञानाविषयी एक फार सुंदर बोधकथा आहे. ज्ञान हे अग्निसारखे असून ते अज्ञानाच्या गवताला जाळते आणि त्यानंतर अग्निच्याही अस्तित्वाचा विलय होतो. त्यामुळे अज्ञान संपल्यावर ज्ञान विलयाला जात असल्यामुळे अशा अभिजात ज्ञानाचा अहंकार उरत नाही, हा या बोधकथेचा अर्थ.
ज्या भूमीत उपनिषदे निर्माण झाली, त्या भूमीत अज्ञानाच्या गवताचे तण एवढे माजावे हे केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या धोक्याचे नसून व्यक्तिगत आणि राजकीय दृष्ट्याही घुसमटवून टाकणारे आहे.
हुसेन यांच्या चित्राची जी कथा झाली, तशीच वेगळी कथा सलमान रश्दी यांच्या किंवा तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकाची झाली आणि यामध्ये सरकार सहभागी होतं. सरकार याचा अर्थ कोणत्या एका पक्षाचे सरकार नव्हे, तर जे सत्तेत येईल ते सरकार. लेखकाने काय लिहावे, चित्रकाराने कोणती चित्रे काढावीत, लेखक आणि कलावंतांनी धर्माचा कसा अनुनय करावा, सत्य असले तरी बहुसंख्य लोक ज्याच्या विरोधात आहेत, ती गोष्ट चित्रित करू नये किंवा लिहु नये हे सारे सरकारे ठरवू लागली. धार्मिक गट, मग तो मुस्लीम असो, ख्रिश्चन असो, हिदू असो वा अजून इतर कोणत्या धर्माचा असो; यांच्या भावना आळीपाळीने कधी नाटकामुळे, कधी चित्रांमुळे, कधी पुस्तकामुळे कधी पेयामुळे, कधी खाद्यपदार्थांमुळे, कधी ध्येयामुळे तर कधी घोषणांमुळे दुखावल्या जाऊ लागल्या. अशा प्रकारच्या सप्तस्वातंत्र्यावर बंदी घालण्याची परंपरा आणि त्या विचारवंताला, लेखकाला, बुद्धिवंताला छळण्याची परंपरा ही कम्युनिस्ट, इस्लामिक आणि हुकूमशाही देशात नवी नाही. तिथल्या प्रचारयंत्रणा हे ‘प्रो- पीपल’ आहे म्हणजे, लोकांसाठी आहे असे सांगून करतात. भारतात संविधान प्रत्येक नागरिकाला खूप मोठे स्वातंत्र्य बहाल करते. ज्याचा तर्क दिलेला आहे किंवा अभिजात सदरात मोडते असे कोणतेही अस्तित्व, कृती भारतीय नागरिक करू शकतो. भावना दुखावणे, ही रंजक कल्पना आहे. भावना कशानेही दुखावू शकतात.
नुकतेच भाजप सरकार आल्यावर  ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे मुंबईत एका नाटकावर बंदी घालण्यात आली. त्याच वेळी बिहारमध्ये नितीश सरकारने दारूवर बंदी आली. महाराष्ट्रात बीफ खाण्यावर बंदी आली. तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’पासून ‘घाशीराम कोतवाल’ पर्यंतच्या नाटकांना झुंडशाहीला सामोरं जावं लागलं होतं. भारत हा सर्वांत जास्त बीफची निर्यात करणारा देश आहे. एम. एफ. हुसेन यांना आधुनिक भारताचे पिकासो असे संबोधले जाते. देशात दारूपेक्षा, बेगॉन पिऊन जास्त लोक लगेच मरतात, पण बेगॉनवर बंदी नाही. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतो, पण गळफासावर बंदी नाही. चित्रकलेचा प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी कला विद्यालयात अधिकृतरित्या नग्न स्त्री, पुरुषाला समोर झोपवून अॅनाटॉमीच्या तासाला न्यूड रेखाचित्र काढतो. तो त्याच्या विषयाचा, अभ्यासाचा भाग आहे. कला महाविद्यालयात मॉडेल म्हणून अॅनाटॉमीच्या तासाला नग्न स्त्री आणि पुरुष पोझेस देतात आणि हे विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याचे रेखाचित्र काढतात. डॉक्टरी शिक्षण घेत असताना नग्न स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराच्या आधारे याच अॅनाटॉमीचा अभ्यास, होऊ घातलेले डॉक्टर्स करतात. या साऱ्यातून त्या विद्यार्थी-विद्यार्थिनीं मध्ये किंवा मॉडेल्समध्ये कामुकतेची प्रचंड वाढ झालेली आढळून आलेली नाही. किंबहुना त्यांनी ते केले नाही तर समाजाला चांगले डॉक्टर्स, चित्रकार मिळणार नाहीत किंवा या शिकावू डॉक्टर्सना, या शिकावू चित्रकारांना ‘तुझ्या आईबहिणीला सांगशील का अशी पोझ द्यायला किंवा त्यांच्यावर असे प्रयोग करशील का,’ म्हणून कोणतीही धार्मिक संघटना प्रश्न विचारताना दिसत नाही!!!
या परस्परविरोधी गोष्टींची जंत्री इथे देण्याचं मूळ कारण हे की, कोणत्याही प्रकारचं moral policing हे मागासलेल्या समाजाचे लक्षण होय. आपल्या देशात ब्रिटिश कायदे आल्यावर या moral policing ला सरकारी पाठबळ लाभले. ब्रिटिश गेले, त्यांनी त्यांच्या देशातले कायदेही बदलले. परंतु १९५२ पासून जेव्हा निवडणुका होऊन त्याद्वारे आपले अस्सल भारतीय सरकार सत्तेत आले तेव्हापासून आजपर्यंत बंदी, moral policing, कलावंत, बुद्धिवंताची यातून होणारी अवहेलना, अटकसत्र प्रचंड वाढलेलं आहे किंबहुना ऊत आलेला आहे आणि आता तर त्याला राज्या-राज्यात पाठबळही मिळत आहे. मग राजकीय पक्ष कोणताही असो!  मतांसाठी लोकानुयाच्या वेगवेगळ्या कल्पना, प्रश्नाचा अभ्यास न करता उत्तर देण्याची उथळ वृत्ती, झुंडशाही करणारे जातीय आणि धार्मिक गट आणि १९ व्या शतकातला ब्रिटिश कायदा या सर्वांनी मिळून या देशातली ‘अभिजातता आणि जीनिअस’ मारून टाकलेला आहे. भारत हा राजकीय टोळ्यांचा देश बनलेला आहे आणि त्याला Draconian ब्रिटिश  कायद्याचा आधार आहे.
आज एखादा वात्सायन, कामशास्त्र लिहिल, हजारो कलावंत मिळून खजुराहोसारखी नग्न शिल्पं उभी करतील, त्यांना आवडेल ते ते खातील आणि हवा तेव्हा सोमरस पितील आणि या साऱ्याला सरकारची राजमान्यता (मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो) मिळेल, अशी कल्पना करून बघा. असं होऊ शकतं का, हा प्रश्न स्वत:लाच विचारून बघा! कोणतंही दमन हे लोकशाहीला मान्य नसतं. याला एक कारण आहे. दमन, प्रवृत्तीचं शमन न करता ती प्रवृत्ती भडकवते. आजही आपल्या समाजात समलैंगिकतेवर ‘उपचार’ करू असा दावा करणारे लोक आहेत! आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही आहे!!
असा देश आणि असा समाज प्राचीन सुवर्णयुगात जाणं शक्य आहे काय? किंवा आधुनिक महासत्ता बनणं, हे या प्रकारच्या मानसिकतेच्या पंखात बळ आणणारं आहे काय?
एम. एफ. हुसेन अखेरच्या काळात भारत सोडून गेले. ते हयात असताना त्यांच्याशी बोलताना एक वेगळीच गोष्ट कळली. कट्टरवादी टोळ्यांच्या झुंडशाहीला तोंड देताना हा अस्सल भारतीय कलावंत जेरीला आला होता. पण त्याने देश सोडला, तो त्यासाठी नव्हे. ते म्हणाले, भारतीय करप्रणाली, करअधिकारी माझ्या चित्रांच्या किमती विचारतात. एकाच आकाराच्या दोन चित्रांची किंमत वेगवेगळी किंवा कमी-अधिक का, हे मला सांगायला सांगतात. याचं  तर्कशुद्ध उत्तर एक कलावंत म्हणून मी देऊ शकत नाही आणि त्यामुळे मी जवळपास गुन्हेगार आहे, अशी वागणूक करअधिकारी देतात आणि हे चक्र अखंड चालू राहते. या छळाला कंटाळलेल्या एम.एफ हुसेन यांना कतार या देशाने आनंदाने आमंत्रण दिले आणि एम.एफ हुसेन यांनी कतारमध्ये आश्रय घेतला. पंढरपूरमध्ये जन्म घेतलेल्या आणि सिनेमांची पोस्टर्स रंगवून एके काळी उपजीविका करणाऱ्या या महान कलावंताने स्वत:च्या चित्रांच्या बळावर मिळवलेल्या पैशाच्या जोरावर कतारमध्ये गेल्यानंतर दुबईमध्ये एकरकमी पैसे देऊन लॅम्बॉर्गिनी ही गाडी विकत घेतली, जे भारतात त्यांना कधीही शक्य झालं नसतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन मात्र (निधर्मी) लंडनमध्ये झाले.
अनेक पातळ्यांवर झुंडशाही आणि सरकार यांनी हातमिळवणी करून वेगवेगळ्या धर्मांच्या आणि जातींच्या सहाय्याने टोळ्या करून अलौकिक प्रतिभावंत, कलावंत, लेखक आणि विचारवत यांची परवड स्वातंत्र्योत्तर (१५ ऑगस्ट १९४७ पासून) काळापासून आजपर्यंत चालू आहे, ती थांबवण्यासाठी कोणतीही व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतेही अलौकिक नेतृत्व काम करताना दिसत नाही. ही घुसमट अखेर एक दिवशी एकतर ज्वालामुखी बनेल किंवा या सपूर्ण समाजाला रसातळाला घेऊन जाईल.
ढोंगाला ऑक्सिजनचे सिलिंडर मिळतात आणि सत्याला घुसमटीचे चेंबर नशिबी येतात, तेव्हा हाडाला भेदून जाणारं अॅसिड लिहावं लागतं. हा त्या अॅसिडचा एक थेंब. हा थेंब जी जखम निर्माण करेल आणि जिथे जखम निर्माण करेल, ती अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील जखमेसारखी कधीही बरी होणार नाही. त्या जखमेवर लावायला तेल मागण्याची वेळही आता निघून गेलेली आहे!!
rajuparulekar1@gmail.com
(M) 9820124419

लिंक  https://rajuparulekar.wordpress.com/2016/04/18/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%AE/

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...